Lasur (लासुर)

लासुर, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद


येथील १ स्थान - हे स्थान लासूर गावाच्या दक्षिणेकडे गावापासून दीड कि.मी.अंतरावर शिवना नदीच्या काठावरील दत्त मंदीरात आहे.


जाण्याचा मार्ग :

लासूर हे गाव गंगापूर-कन्नड सडकेवरील लासूर रेल्वेस्थानकापासून वायव्येस 3 कि.मी. आहे. फुलशिवऱ्याहून वायव्येस लासूर (गवळीशिवरा, लासूर रेल्वे स्थानक मार्गे) 11 कि.मी. आहे. मनमाड-हैद्राबाद लोहमार्गावरील औरंगाबाद व रोटेगावमधील लासूर हे रेल्वेस्थानक आहे. लासूरला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान लासूर गावाच्या दक्षिणेस चार फलांग अंतरावर शिवना नदीच्या पश्चिम काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे जोगेश्वरीचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय. आज हे देऊळ ‘श्रीदत्त मंदिर’ या नावाने प्रख्यात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात विटखेड्याहून लासूरला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. 230, स्था.पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून बाजारघोगरगावला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


लासूरचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –
  • Lasur  :  लासुरीं वसति :॥: 



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: