Lakhpuri (लाखपूरी)

लाखपुरी, ता. मूर्तिजापूर जि. अकोला


लाखपूरी येथील 1 स्थान लाखपूरी गावाच्या उत्तरेकडे लक्षणेश्वराचे पूरतन मंदीर आहे, या मंदीराच्या चौकात हे स्थान आहे. चौक नमस्कारी आहे. ( येथील पूजारी/लोक विचारल्यास सांगतात)


जाण्याचा मार्ग :

लाखपुरी हे गाव, मूर्तिजापूर-दर्यापूर मार्गावर मूर्तिजापूरहून उत्तरेस 12 कि. मी आहे व दर्यापूरहून दक्षिणेस 12 कि. मी. आहे. अकोला ते लाखपुरी (सरळमार्गे) 42 कि. मी. आहे. लाखपुरी येथे जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. यवतमाळ-अचलपूर लोहमार्गावरील मूर्तिजापूर व दर्यापूरमधील लाखपुरी हे रेल्वेस्थानक आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान लाखपुरी गावाच्या वायव्य विभागी लक्षणेश्वराच्या (महादेवाच्या) पूर्वाभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे. चौकावर शाहबादी फरशी बसविलेली आहे. आज हे देऊळ, ‘लक्षेश्वर’ या नावाने प्रचलित आहे. चौकात नमस्कारी जागेला चंदन लावले असते. व फुल ठेवले असतात. किंवा पूजारी विचारल्यास सांगतात.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पैठणहून रिद्धपूरला जाताना येळवणहून लाखपुरीला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली.150 ,स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून शिंगणापूरला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1. देवळाच्या पश्चिमेचे परिश्रय स्थान


लाखपूरीची एकूण स्थाने : 2


  • Purvardha Charitra Lila – 150
  • Lakhapuri : लाखापूरीये वसति :॥:
  • मग गोसावी लाखापुरीयेसि बीजे केले : लखनेश्वरीं चौकी आसन जालेः बाईसीं चरणक्षाळण केलेः मग गोसावि चांगदेवभटाते खेळो पाठविलेः बटिका खेळो जाः तेही म्हणीतलेः हो का जीः आणि खेळो गेलेः बाईसीं उपहार निफजउ आदरिलाः दुपाहाराचा पूजावसरु जालाः मग आरोगणा जाली : गुळुळाः विडाः पहुडः उपहुड जालाः लाखापुरीयेसि लखनेश्वरीं वसति जालीः उदयाचि गोसावि परिश्रयो सारुनि बीजे केले :॥:



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: