Ladjalgaon (लाडजळगाव)

लाडजळगाव, ता. शेवगाव जि. अहमदनगर


येथील स्थान लाडजळगांव गावाच्या उत्तरेकडे महादेव मंदीर आहे, त्याच्या उत्तरेकडे जवळच हे 1 स्थान आहे.


जाण्याचा मार्ग :

लाडजळगाव, शेवगाव-गेवराई मार्गावरील बोधेगावपासून दक्षिणेस 5 कि. मी. आहे. शेवगाव ते बोधेगाव 25 कि. मी. गेवराई ते बोधेगाव 39 कि. मी. शेवगावहून लाडजळगाव (मंगरूळ, हसनापूर, आंतरवाली मार्गे) 29 कि. मी. आहे. चकलांब्याहून पश्चिमेस लाडजळगावपायमार्गे 6 कि.मी. आहे. चकलांब्याहून लाडजळगावला जीपचा रस्ता आहे. लाडजळगावला जाण्यासाठी शेवगावहून एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान लाडजळगावच्या वायव्य विभागी सरकारी दवाखान्याजवळ पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे लिंगाचे लहान देऊळ होते. त्या देवळातील हे स्थान होय. आज हे देऊळ ‘श्रीदत्त मंदिर’ या नावाने ओळखले जाते.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उतरार्ध काळात चापडगावहून लाडजळगावला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून नागलवाडीला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


1. गावाच्या पश्चिमेचे आसन स्थान.


लाडजळगावची एकूण स्थाने : 2


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: