Koteshwar (कोटेश्वर)

कोटेश्वर (कोळेश्वर), ता. नेवासा, जि. अहमदनगर


येथील 5 स्थान जुने गळनिंबच्या पूर्वेस एक कि. मी. अंतरावर गोदावरी नदीच्या दक्षिण काठी भव्य मंदिरात आहेत.

सदर स्थानांवर जाण्याकरीता विशिष्ठ रस्ते असे नाहीत. कारण ही स्थाने पैठणच्या नाथसागराच्या बुडीत क्षेत्रात येतात. खरे तर येथे पूर्वी मंदीरे होती, काही आजही उपलब्ध आहेत. मात्र स्थानांवर जानारे रस्ते फक्त पाउस ज्या वर्षी कमी होइल त्या वर्षी मोठी गाडी, बैलगाडी, पायदळ, व लहान अवैधरित्या मासेमारी करणार्या लहान नावेतुन अवैधपणे जावे लागते... किंवा ...

असे असले तरी बरीच मंडळी येथे जातात. त्यासाठी MahanubhavDarshan.Com द्वारे सदर स्थानांवर जाण्याकरीता Nevigation द्वारे विशिष्ठ स्थान GoogleMaps वर निर्देशीत करण्यात आले आहे. गरजुंनी त्याचा उपयोग अवश्य करावा.... किंवा ... त्यासाठी नाथसागरातील महानुभाव तीर्थस्थान या पेजवर भेट द्यावी...

इ.श्री योगेंद्रदादा शेवलीकर,M.A. M.Phil. जाळीचा देव यांच्या मो.क्र. 7385901015 वा 8605275481 यावरुन जान्याचे रस्ते समजुन घ्यावे. योगेंद्रदादा यांनी त्या त्या गावात विशिष्ठ ओळखी करुण तेथील संपर्क क्रमांक मिळवलेले आहेत.)


जाण्याचा मार्ग :

दक्षिण गळनिंब येथून पूर्वेस अर्धा कि.मी. अंतरावर नदीच्या तिरी कोटेश्वर (कोळेश्वर) आहे.

जूने गळनिंब गावाच्या पूर्वेस दीड कि.मी. अंतरावर आणि नवीन गावाच्या २ कि.मी. अंतरावर गोदावरी नदीच्या दक्षिण काठी असलेल्या भव्य मंदिरात कोटेश्वर येथील स्थाने आहेत.


स्थानाची माहिती :

गळनिंब येथील वसती नंतर स्वामी दुसऱ्या दिवशी कोळेश्वर नावाच्या देवतेच्या मंदिरात आले. तेथे स्वामी एक महिना राहिले. आता हे मंदिर ‘कोटेश्वर’ या नावाने ओळखले जाते.

1. अवस्थान स्थान :

हे स्थान जुने गळनिंबच्या पूर्वेस एक कि. मी. अंतरावर गोदावरी नदीच्या दक्षिण काठी भव्य मंदिरात आहे. मंदिराच्या पायऱ्या चढून गेल्यावर उजव्या हाताला स्थान आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे कोळेश्वराचे देऊळ होते. येथे स्वामींना एक महिना अवस्थान झाले. येथे स्वामींचा त्रिकाळ पूजाअवसर, आरोगणा, निरूपण आणि निद्रा होत असे. येथूनच स्वामींनी परसनायकांना स्थिती दिली.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूचे या ठिकाणी एक महिना वास्तव्य होते. (उ. ली, 312, स्था. पो.)

येथील इतर लीळा : 1)परसनायकांना स्थिती देणे. (उ. ली. 313)

2) त्रिकाळ पूजाअवसर व आरोगणा येथे होत असे.

अवस्थान स्थानांच्या उत्तरेचे स्थान निर्देशरहित आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. मादने स्थान :

हे स्थान अवस्थान स्थानाच्या पूर्वेस आहे. (स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


3. उत्थानपिंड देणे स्थान :

हे स्थान मादने स्थानाच्या उत्तरेस आहे.

लीळा : मृत परसनायकांची किडडी उचलण्यापूर्वी त्यांना येथे उत्थानपिंड देण्यात आला. त्यावेळी सर्वज्ञ येथे उभे होते. (उ. ली. 313, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


4. आसन स्थान :

हे स्थान मुख्य मंदिराच्या वायव्येस देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे पिंपळाचे झाड होते. त्या झाडाखालील हे आसन स्थान होय.

लीळा : मृत परसनायकांच्या पार्थिव देहाला अग्नि दिल्यानंतर सर्वज्ञांना येथे आसन झाले. सर्व भक्तजन येथे येऊन दुःख करू लागले. त्यावेळी सर्वज्ञांनी या ठिकाणी भक्तजनांना संहार प्रकरण निरूपण केले. (उ.ली.313, स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


5. परिश्रय स्थान :

हे स्थान आसन स्थान देवळाच्या दक्षिणेस आहे. (स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


विद्यापीठ स्थानपोथी : कोळेश्वरी अवस्थान मांस १ । पूर्वाभिमूख देऊळ उत्तर विभागी पूर्वीली भिंतीसी उत्तर दक्षिण ओटाः तथा वायव्ये कोनी पूर्व पसीम ओटाः तेथ अवस्थानः आंगणि मादनें स्थान || जगतीचा दारवठा पूर्वामुख कोळेस्वरा उतरे पीपंळु: दारवठीया बाहीरी रिघता उजवीया हाता उथानपडू ॥ पिंपळा उत्तरे गंगे आंतु दहनः दक्षीणे परीश्रए।। कोळेस्वरीची स्थाने ||७|| विद्यापीठ स्थानपोथी: कोळेश्वरी अवस्थान दिस सात पाचः ।।: देऊळ पूर्वाभिमूखः उंबरवटः उत्तर विभागी पूर्वीली भिंतीसी उत्तर- दक्षीण ओटा अवस्थानाचाः।। अंगनी आदने स्थानः || जगतीचा दारवंठा पूर्वाभिमुखः।। दारवंठया बाहीरी उजवेया हाता दरडीखाली उथान पिंडु: परशरामबाः दरडीबासीः रामेश्वरबाः पावळुवंटी: परसनायकाचे सरणः कोळेश्वरा उत्तरे पिंपळु तेथ आसन ।। कोळेश्वरा दक्षीणे परीश्रयः।। स्थानेः३ः।।


अनुपलब्ध स्थान :

1. गंगेमध्ये परसनायकांना अग्नि देणे स्थान.


कोळेश्वरची एकूण स्थाने : 7


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: