Kolwihir (कोळविहीर)

कोळविहीर ता. मोर्शी जि. अमरावती


कोळविहीर येथील १ स्थान (श्रीगोविंदप्रभुबाबा) - गावातच आंबेडकर पुतळ्याजवळ आहे.


जाण्याचा मार्ग :

आष्टोलीहून किंचित् आग्नेयेस कोळविहीर पायमार्गे 3 कि. मी. आहे.
कोळविहीर हे गाव, परतवाडा-मोर्शी मार्गावर रिद्धपूरहन किंचित् ईशान्येस 5 कि. मी. आहे व मोर्शीहून नैर्ऋत्येस 20 कि. मी. आहे. डोमक ते कोळविहीर (तरोडा मार्गे) 5 कि. मी. आहे. कोळविहिरीला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. काटा श्रीकरे मोडणे स्थान :

हे स्थान कोळविहीर गावाच्या आग्नेय विभागी परतवाडा मोर्शी मार्गाच्या दक्षिणेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : एके दिवशी रिद्धपूरला राजमढामध्ये श्रीगोविंदप्रभूना आरोगणेसाठी ताट वाढले. गोविंदप्रभू आरोगणा करण्याकरिता बसले; परंतु लगेच तसेच ताटावरून उठून कोळविहिरीकडे चरणचारी धावत आले. पाठीमागून भक्तजनही धावत आले. येथे बाभळीचे झाड होते. तिचा काटा त्यांनी आपल्या श्रीकराने मोडून टाकला. मग रिद्धपूराकडे परतले. (गो. प्र. च. 100, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थाने :

1. देवळाचे चौकी आसन स्थान

2. मार्गी बाबुळा आंतु डाऊ तेथ आसन स्थान

3. डाऊवाशी खेळ करणे स्थान


कोळविहिरीची एकूण स्थाने : 4


  • Govind Prabhu Charitra Lila – 100
  • Kolwihir : कोळवीहीरीचा कांटा मोडणे :॥
  • कोळवीहीरीचा कांटा मोडणेः॥ एक दी गोसावियांसि ताट जालें : ताटी उपवीष्ट जाले : आणि तैसेचि ताटावरुनि बीजें केलें : चरणचार्य धांव घेतली : मागीला कडुनि भगत-जनी धाव घेतली : कोळवीहीरीचेया वेसी दारा समीप बाबुळ होती : तेथ गोसावी बीजें केलें : तीचा कांटा श्रीकरें मोडीला : मग म्हणीतलें : “मेला जाए : हा तो नव्हे म्हणे : आवो होयचि म्हणे :” म्हणौनि मोडोनि टाकीला :” आणि परतले. मग गोसावी बीजें केलें : मग एउनि आरोगणा केली : ॥१००॥



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: