Kokamthan (कोकमठाण)

कोकमठाण, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर


येथे 3 स्थाने आहेत -
1. हे स्थान पायरीचे स्थानाच्या दक्षिनेकडे गोदावरी नदीच्या काठावर सिंगनेश्वर महादेव मंदीरात समोरच आहे.
2. दुसरे स्थान कोंकमठान गावाच्या उत्तरेकडे गोदावरी नदीच्या काठावर दमोदर मंदीराच्या बाजुलाच आहे.
3. तीसरे स्थान दमोदर मंदीरातील चौक म्हणजे हे स्थान होय.


जाण्याचा मार्ग :

कोपरगावहून आग्नेयेस कोकमठाण 4 कि.मी. आहे. पुणतांबा-कोपरगाव मार्गावरील कोकमठाण फाट्यापासून ‘कोकमठाण’ 3 कि.मी. आहे. संवत्सरहून दक्षिणेस कोकमठाण सव्वा कि.मी. आहे. कोकमठाणला जाण्यासाठी कोपरगावहून एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

हे स्थान कोकमठाण गावाच्या हद्दीत पाच पायरी स्थानाच्या दक्षिणेस गोदावरी नदीच्या दक्षिण काठावर सिंगेश्वराच्या (महादेवाच्या) पूर्वाभिमुख देवळापुढे आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात संवत्सरहून प्रथम येथे आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. दुपारचा पूजावसर झाला. आरोगणा झाली. गुळळा विडा झाला. पहुड, उपहुड झाला. मग ते येथून कोकमठाण गावात गेले. (पू. ली. 277)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. वसती स्थान :

हे स्थान कोकमठाण गावाच्या उत्तर विभागी दामोदराच्या देवळाच्या पश्चिमेस गोदावरी नदीच्या दक्षिण काठावर उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे आदित्याचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूचे येथे एक रात्र वास्तव्य होते. दुसऱ्या दिवशी ते येथून पुणतांब्याला गेले. (स्था, पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


3. आसन स्थान :

हे स्थान दामोदराच्या उत्तराभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे. चौकावर शाहबादी फरशी बसविलेली आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू सिंगेश्वराहून कोकमठाणला आल्यावर त्यांना प्रथम देवळाच्या चौकात थोडा वेळ आसन झाले. मग सर्वज्ञ माडापाशी गेले. एकाग्र दृष्टीने अवलोकन करून माडाच्या चारी कळसांना स्पर्श केला. त्यानंतर पुन्हा येथेच आसन झाले. (पू.ली. 277)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1. परिश्रय स्थान.

2. गंगेतील जळसेनी आसन स्थान.


कोकमठाणची एकूण स्थाने : 5


  • Purvardha Charitra Lila – 277
  • Kokamthan : कुंकुमठाणीं अग्निष्टिके वसति : माड अवलोकणें :॥:
  • तेथौनि गोसावी कुंकुमठाणा बीजे केलेः तेथ अग्निष्टिके वसति जाली :॥: गोसावी दामोदरा बीजे केलेः तेथ पटिशाळे आसन जालेः मग निखंब माडापासी बीजे केलेः माड अवलोकिलेः गोसावी माड ऐसे श्रीकारीं धरिलेः आणि ऐसे हालविलेः कोन्ही भक्तिजनीण गोसावियांते पुसिलेंः जीजी हे माड कोणें केलेः सर्वज्ञें म्हणितलें: हे माड भिल्लमरायाचिया राणियां भिल्लमायिया केलेः मग जळसेना बीजे केलेः तेथ शेषशय्यीं आसन जालेः :॥:
  • (..येथे हे पहील्यांदा येने. येथील विसृत लीळा नाही, फक्त एवढीच लीळा आहे…स्वामी नासिक-सुकिना-नांदौर-संवत्सरवरुण आले व पुणतांब्याकडे निघले..)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: