Khopdi (खोपडी)

खोपडी, ता.सिन्नर, जि. नाशिक


येथील 3 स्थान खोपडी गावाच्या पूर्वेकडे सिन्नर-शीर्डी रोडवर उत्तरेकडे 1 कि.मी. अंतरावर आहेत.


जाण्याचा मार्ग :

खोपडी हे गाव, सिन्नर शिर्डी मार्गावर सिन्नरहन पूर्वेस 13 कि.मी. आहे. व शिर्डीहन (सावळेविहीर फाटा, झगडा फाटा, देडे वावी मार्गे) 47 कि.मी. आहे. नाशिक ते खोपडी 42 कि. मी. बेलापूर ते खोपडी ९२ कि. मी. खोपडी येथे जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. ‘श्रीदत्त मंदिर’ या नावाचा एस. टी. बस थांबा आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे व मंदिराच्या आग्नेयेस रस्त्याच्या पलीकडे महानुभाव आश्रम ही आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान खोपडी गावाच्या पूर्वेस एक कि.मी. अंतरावर सिन्नर-शिर्डी मार्गाच्या उत्तरेस पूर्वाभिमुख देवळात आहे. हे देऊळ ‘श्रीदत्त मंदिर’ या नावाने प्रख्यात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात वावीहून खोपडीला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (स्था.पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून सिन्नरला गेले.

देवळाच्या पाठीमागचे स्थान निर्देशरहित आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. गंधर्वनगर दरीसन स्थान :

हे स्थान वसती स्थानाच्या ईशान्येस 350 मीटर अंतरावर पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : बाईसा म्हणाल्या ” बाबा वेचावेया काहीच नाही” तेव्हा सर्वज्ञे डखलेवाते म्हणतीले या नगरात जा, आडकीत्ता गाहाण ठेवा आणि आडकीत्ता गाहान ठेवा कणीक, तांदुळ असे दाहा दामाच पदार्थ विकत आणले.बाईसांनी स्वयंपाक केला, भक्त जनासहीत सर्वज्ञांची आरोगणा झाली. तेव्हा कोणी एक ब्राम्हण आला सर्वज्ञांपूढा दाहा दाम देवले. व दंडवत करुन गेला. सर्वज्ञे म्हणतीले. “जागा डखलेया तयाचे दाम देया व आडकिता आणा” मग डखले गेले. तर तेथे नगर वगैरे काहीच नाही. आडकित्ता एका शीळेवर ठेवला होता तो घेऊन आले. (पु.ली 233)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


3. एरंडबन कथन स्थान :

हे स्थान वसती स्थानाच्या पूर्वेस 1 कि.मी. अंतरावर सड़केच्या उत्तर बाजूस पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : श्री सर्वज्ञ स्वामी रस्त्याने जाताना एरंडाचे बन होते, ते पाहून बाईसा म्हणाल्या “बाबा पलिकडे किती सुंदर आंब्आयाचे वन आहे.” यावर सर्वज्ञ उगेच होते. जवळ येऊन पाहतात तर ते एरंडाचे बन होते. सर्वज्ञ स्वामी विनोदाने म्हणाले “डखलेया बाईसाचे आंबेबन पाहिले का, कसे आंब्याचे घड लागले आहेत.” डखले व भक्तजन हसू लागले. यावर बाईसा डखल्यावर रागावल्या. या प्रसंगावर श्री सर्वज्ञांनी दूरदर्शीयाचा दृष्टांत निरुपण केला. (पु.ली 234)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


निर्देशरहित स्थान : 1


खोपडी ची एकूण स्थाने : 3


  • Purvardha Charitra Lila – 233
  • Khopadi : मार्गी पोफळफोडणा गहाण ठेवणें :।।: श्रीनगरमार्गी गंधर्वनगर दरीसन :।।:
  • उदयांचि तेथौनि गोसावी निगालेः श्रीनगरासि बिजें करितातीः मध्यें रान ओस असेः बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः वेचु सरलाः आणि गाव तरि जवळी कव्हणीचि न दिसेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः या उगीचिः’’ अवघे भक्तिजन मागा टाकुनी गोसावी पुढां बिजें केलें: तवं दुपाहारी मार्गी एक पव्हेयासी गोसावी राहिलें: तेथ गंधर्वनगर आकारिलेः मग बाइसें मुख्य अवघे भक्तिजन आलें: गोसावी डखलेयातें म्हणितलें: ‘‘या नगरांतु जाः पोफळफोडणा गहाण घालाः लागे तो वेच आणाः’’ डखले गेलेः हाटांत वाणियाचेया पसारां पोफळफोडणा गहाण घातलाः कणीकः तांदूळः ऐसा दहा दामाचा सर्व वेच घेउनि आलेः बाइसीं रंधन केलें: गोसावियांसि पूजावसर जालाः भक्तिजनासहित आरोगणा जालीः गुळळा विडा जालाः तवं कव्हणी एक ब्राम्हण आलाः गोसावियांपुढां दाहा दाम ठेविलें: दंडवत करौनि गेलाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जा गा डखलेयाः तयाचे देयाः पोफळफोडणा आणाः’’ तवं बाइसीं म्हणितलें: ‘‘नको देउः दहा दाम उदेया वेचावेया होतीलः श्रीनगरीहुनि दहा दाम तयाचे पाठउनी पोफळफोडणा आणउं: तो काइ केउतां जात असेः’’ तवं सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ते तैसेचिः जा गा डखलेयाः पोफळफोडणा घेउनि याः’’ डखलां पोटीं म्हणितलें: ‘काइ पां: गोसावी द्रव्येविण पाठवितातीः तरि काइ अपूर्व असैलः’ मग डखले गेलेः तवं नगर नाहीं: पोफळफोडणा एका सिळेवरि ठेविला होताः तो घेतलाः भवताले पाहाति तवं हस्तीः अश्व बैसलेयाची पाउलेः तांबुळाचें उगाळः पशूची मळमूत्रेः रंधनाची रक्षाः नगरी हें अवघेचि होतें: एर काहीचि न देखतिः इतुकेनि तया आश्चर्य जालें: येउनि गोसावियांपुढे सांघितलें: ‘‘जी जीः तरि तें काइ?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘डखलेयाः तें गंधर्वनगरः एथीचिया प्रवृत्ति रचीले होतें:’’ तें आइकौनि अवघेया भक्तिजना आश्चर्य जालें :।।:
  • (ही लीळा ‘खोपडी’ ते ‘सिन्नर’ गावांच्या रस्त्यातील ‘खोपडी’ लगतचि असल्यामुळे ‘खोपडी’ या ठीकाणी ही लीळा Upload केली आहे.)
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे वेरुळ-इटखेड-लासुर-छिन्नपापीं-डोमेग्रामी-सुराला-नाउरीं वरुण आले व पुढे स्वामींनी सिन्नरकडे प्रयाण केले. तेव्हाची ही लीळा.)
  • Purvardha Charitra Lila – 234
  • Khopadi : एरंडबन कथन :।।: / बाइसां एरंडबन उपहासु :।।:
  • मार्गी गोसावी बिजें करितातीः तवं पुढां एकी वोसे गावीं एरंडाचें बन होतें: तें बाइसीं दुरौनि देखिलेः आणि म्हणितलें: ‘बाबाः कैसें बरवें आंबेंयाचें बन दिसत असेः हें बन कव्हणीये गावीचें? केसणें आंबेंयांचे बनः’’ गोसावी उगेचि राहिलेः गावांपासी बिजें केलें: तवं एरंड वाढिनले असतिः मग गोसावी भक्तिजनाची वास पाहिली आणि म्हणितलें: ‘‘हे घेया गाः डखलेया बाइसांचें आंबेबन कैसें सासिन्नलेः कैसें आंबेंयाचें घड लागलें असतिः’’ इतुलेनि डखले हासों लागलें: आणि म्हणो लागलें: ‘‘कैसें आंबेंयाचें बनजीः जी बाइसाची बनें तियें ऐसीचिः बाइः बाइः हा आंबा कैसा वाणीएचां: हें देखिले पैल केसणे आंबें लागलें असतिः कैसें आंबेंयांचे घड लागलें असतिः’’ ऐसें विपलावो लागलेः बाइसें डखलेया कोपलीः ‘‘पोराः उगा अससि कीं नससिः बाबा पां ऐसें म्हणति तरि तुही म्हणसिः मां तू काइ म्हणौनि म्हणसि? पोरा डखलेया उगा नससि?’’ गोसावी नावेक हास्य केलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘यांसि जाली दुरादर्सीयाची परिः’’ डखलां म्हणितलें: ‘‘ते कैसी जी?’’ यावरि गोसावी दुरादर्साचा दृष्टांत निरूपीलाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘कव्हणी एकु वाटां जातु असेः तो दुरौनि वृक्षातें देखें: परि आमुकेयाचां वृक्षु ऐसें नेणें: नावेक साउमा जाएः मग म्हणें: ‘हा आमुकेयाचां वृक्षः’ परि तयाचे अशेष विशेष न देखेः ताखाली उभा ठाकेः मग तयाचे अशेष विशेष देखें:’’ ऐसें विनोद करीतसांते बाइसाचा श्रमु हरीलाः मग बिजें केलें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे वेरुळ-इटखेड-लासुर-छिन्नपापीं-डोमेग्रामी-सुराला-नाउरीं वरुण आले व पुढे स्वामींनी सिन्नरकडे प्रयाण केले. तेव्हाची ही लीळा.)
  • Purvardha Charitra Lila – 235
  • Khopadi : श्रीनगर दाखवणें :।।: / तथा श्रीनगर सांघणें :।।:
  • गोसावी श्रीनगरासि बिजें करीत असतिः पव्हेयापसिमे माथेयावरि उभे राहीलेः तवं बाइसीं अडवांगौनि बरवे रूखः देउळाचें कळसः बरवी देउळें देखिलीः मग पुसिलें: ‘बाबाः हें कव्हण नगर? कव्हणाचे?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः हें श्रीनगरः एथ सिंगणराय राज्य करीत होताः तें हस्तीचे कींकाटः घोडेयाचें हींसकार निसानांचें नादः माणुसांचा गजबजः ऐसा बोबाटाः कानी पडिलें नाइकीजेः’’ श्रीनगराजवळीं पातलेः तेथौनि श्रीनगरीचें कळस देखिलें: मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः हें देखिले श्रीनगरः’’ मग भक्तिजनातें म्हणितलें: ‘‘हें देखिलें गा श्रीनगरः देउळांचे कळसः’’ घोडेयाचे हींस ऐसें आइकतिः नगरापासी एकीं ठाइं गोसावियांसि नावेक आसन जालें: तेथौनि गोसावी डखलेयातें बिढारा पाठवीलें: तें भिलमढ पाहुनि आलेः मग गोसावियांपुढां सांघितलें: ‘‘जी जी भिलमढ दोनि असतिः परि भिलमढाहुनि भिलमढीं बरवी सुरवाडी बाहीरि बरवी पटिशाळ असेः’’ मग भिलमठियेसि बिजें केलें :।।:
  • (ही लीळा ‘खोपडी’ ते ‘सिन्नर’ गावांच्या रस्त्यातील ‘खोपडी’ लगतचि असल्यामुळे ‘खोपडी’ या ठीकाणी ही लीळा Upload केली आहे.)
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे वेरुळ-इटखेड-लासुर-छिन्नपापीं-डोमेग्रामी-सुराला-नाउरीं वरुण आले व पुढे स्वामींनी सिन्नरकडे प्रयाण केले. तेव्हाची ही लीळा.)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: