Khokar (खोकर)

खोकर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर


येथील 1 स्थान - हे स्थान खोकर गावाच्या वायव्येकडे सहकारी संस्थेच्या लगतच मंदीरात आहे.


जाण्याचा मार्ग :

खोकर हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील खोकर फाट्यापासून दक्षिणेस सव्वा कि.मी. आहे. श्रीरामपूर ते खोकर फाटा 9 कि.मी. नेवासा
ते खोकर फाटा 23 कि.मी. भोकर ते खोकर फाटा 2 कि.मी. भोकरहून नैर्ऋत्येस खोकर पायमार्गे 3 कि.मी. आहे. खोकरला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान खोकर गावाच्या वायव्य विभागी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या इमारतीजवळ उत्तराभिमुख देवळात आहे. हे देऊळ, ‘महानुभाव श्रीदत्त मंदिर’ या नावाने ओळखले जाते.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू बेलापूरहून उत्तरापंथे जाताना येथे आले. गावातल्या लोकांनी कणीक, तांदूळ, तप इत्यादी पदार्थ आणून दिले. मग भटोबासांनी स्वयंपाक केला. सर्वज्ञांना आरोगणा दिली. नंतर सर्वजांनी येथे निद्रा घेतली. सकाळी उठून उत्तरापंथे प्रयाण केले. (उ. ली. 650, स्था, पो. उ. को. प्रत)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


खोकरचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –
  • Khokar : खोकरीं वडातळीं आसनः लिंगाचां देउळीं वस्ति :।।:
  • खोकरीं वडातळीं आसनः लिंगाचां देउळीं वस्ति :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि पैठण येथुन वृद्धासंगम येथे आले. येथील जोगेस्वरी येथे स्वामींचे दोन महीणे अवस्थानानंतर स्वामि चापडगाव-जवळगाव-नागलवडी-चकलांबा-सेकटा-चकलांबा- पारेगाव(घोगस)-खरवंडी(कासार)-एळी-आव्हाणे(बु)-भोंकर असा मार्ग क्रमण करित खोकर येथे आले व वस्तीस थांबले तेव्हाची ही लीळा…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: