Khed (खेड)

खेड, ता. मोर्शी जि. अमरावती


खेड येथील 10 स्थाने (श्रीगोविंदप्रभुबाबा व आमचे स्वामी) - येथील 8 स्थाने गावालगतच इशान्येकडे नदीपलीकडे व तलावाच्या काठावर शेतातील मंदीरात आहे. सर्व स्थाने एकाच भागात आहेत. व 2 स्थान गावाच्या सीमेलगत मनूबाई मंदिरात आहे.


जाण्याचा मार्ग :

कोळविहीरहून उत्तरेस खेड पायमार्गे 3 कि. मी. आहे. खेड हे गाव, परतवाडा-मोशी सडकेवरील खेड फाट्यापासून उत्तरेस 4 कि. मी. आहे. मोर्शी ते खेड फाटा 18 कि. मी. चांदूरबाजार ते खेड फाटा 12 कि. मी. कोळविहीर ते खेड फाटा 2 कि. मी. खेडला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. जानाळा तळे, श्रीगोविंदप्रभूचे क्रीडा स्थान :

हे तळे खेड गावाच्या ईशान्येस तीन फर्लाग अंतरावर नदीच्या पलिकडे आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा) जानाळा तळे-खालील आठ स्थान.

लीळा : श्रीगोविंदप्रभू या तळ्यामध्ये खेळ-क्रीडा करीत असत. (भी. प्र. 168, स्था. पो. उ. प्र.) 


2. आसन स्थान (श्रीप्रभू चरणांकित) :

हे स्थान जानाळा तळ्याच्या दक्षिण पाळीवर आहे. श्रीप्रभूच्या वेळी येथे जनकेश्वराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय. (स्था.पो.)


3. आसन स्थान (श्रीप्रभू चरणांकित) :

हे स्थान तळ्याच्या पाळीवरील आसन स्थानापासून दक्षिणेस सुमारे 200 फूट अंतरावर शेतात आहे. श्रीप्रभूच्या वेळी येथे वडाचे झाड होते. त्या झाडाखालील हे स्थान होय. (स्था, पो.)


4. वेदिका आसन स्थान :

हे स्थान तळ्याच्या पश्चिम काठावर बाभळीच्या झाडापासून दक्षिणेस 14 फूट अंतरावर आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभुंना येथे थोडा वेळ आसन झाले. (वि. स्था, पो. क्र. 892)


5,6,7,8. रामदरणेयाच्या तंबूतील मर्दना, मादने, पूजा, आरोगणा व वसती स्थान :

ही चार स्थाने वेदिका आसन स्थानाच्या पश्चिमेस श्री. साहेबराव देशमुख यांच्या शेतात आहेत.

लीळा : रामदरणा राजा झाडी प्रदेशातून सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंना अचलपूरला घेऊन जात असताना त्यांचा येथे एक दिवस मुक्काम झाला. या ठिकाणी त्यांना मर्दना, मादने, पूजा, आरोगणा व वसती झाली. (ए. ली. 61 ख प्र. स्था. पो.) परंतु कोणत्या लीळेचे कोणते स्थान आहे, हे निश्चितपणे सांगता येणार नाही.


खेड गावाच्या पश्चिमेचे श्री. देशमुख यांच्या संत्र्याच्या बगीचातील स्थान निर्देशरहित आहे व स्थानाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूची दोन्हीही लिंगे नमस्कारी नाहीत. 


9. श्रीप्रभू संबंधित मनुबाईची प्रतिमा :

खेड गावाच्या दक्षिणेस एक कि. मी. अंतरावर सडकेच्या पश्चिमेस मनुबाईच्या पूर्वाभिमुख देवळात मनुबाईची श्रीप्रभू-संबंधित प्रतिमा आहे. श्रीप्रभूनी या प्रतिमेशी खेळ केला. (स्थान पोथी)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


10. मनुबाईचा देऊळी चौकी आसन :

हे स्थान मनुबाई च्या देवळाच्या बाजूच्या मंदिरात आहे

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थाने :

1. तळ्यातील श्रीमुख, श्रीचरण प्रक्षाळणे

2. दुसाच्या वायव्येचे परिश्रय

3. काळीकेशी खेळ करणे

4. वनांत विहीर तिशी खेळ करणे

5. नगरेश्वरी पहुड


निर्देशरहित स्थान : 1


खेडची एकूण स्थाने : 15


  • Purvardha Charitra Lila –
  • : 



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: