Kharala (खराळा)

खराळा, ता.चांदुरबाजार जि. अमरावती


खराळा येथील 1 स्थान - खराळा येथील स्थान गांवातच इशान्येकडे आहे.


जाण्याचा मार्ग :

खराळा हे गाव, वलगाव चांदूरबाजार मार्गावरील खरवाडी गावापासून पूर्वेस 3 फाग अंतरावर आहे. वलगाव ते खरवाडी 22 कि. मी. चांदूरबाजार ते खरवाडी 6 कि. मी. खरवाडीपर्यंत जाण्यासाठी एस्. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

हे स्थान खराळा गावाच्या ईशान्येस गावालगतच पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे लिंगाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पैठणहून रिद्धपूरला जाताना तळवलेहून खराळ्याला आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. चांगदेवभटांनी सर्वज्ञांचे श्रीचरण प्रक्षाळण केले. गुळळा विडा झाला. मग सर्वज्ञ येथून रिद्धपूरला गेले. (पू.ली.164, स्था,पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)



खराळ्याचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila – 164
  • Kharala : खैराळां उपान्हौ त्यागु :।।:
  • गोसावी खैराळेया आलेः गावां पैलाकडें पूर्वे इशान्ये लिंगाचा देउळीं चौकीं आसन जालें: चांगदेवभटीं चरणक्षाळण केलेः गुळळा जालाः विडा ओळगवीलाः मग गोसावी नावेक पुढारें गावा इशान्ये खैराळेयाचां पैलीकडील आखरीं बिजें केलें: तवं तेथुनि माथेयावरूनि शाळेचा कळसु देखिला आणि गोसावी उभे राहीलेः उपान्हौ फेडिलियाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बटिकाः हें घेया परमेस्वरपूरः बटिकाः देखिलें गा परमेस्वरपूरः साळेचा कळसु दिसतु असेः एथ श्रीप्रभु राज्य करित असतिः करा नमस्कारूः’’ म्हणौनि श्रीकरें रीधपूर दाखविलें: आपण दोहीं श्रीकरीं ‘‘जयदेव’’ म्हणौनि नमस्करिलें: चांगदेवोभटींही जय केलें: ‘‘जयदेव’’ म्हणितलेः तवं सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बटिकाः एथौनि जैसेचि किजैल तैसेचि तुम्हीं कराल? बटिकाः एथौनि जय केलें: आणि तुम्हींही जय केलें: तुम्हां साष्टांग दंडवत लाभे कीः हें परमेस्वरपूर कैसेः आणि केवढेः एथ श्रीप्रभु राज्य करीत असतिः घाला घाला दंडवतः’’ तिहीं दंडवतें घातलीः मग गोसावी अवाहनीचि बिजें केलें: चांगदेवभटीं उपान्हौ काखें घातलियाः मग खैराळेयापासौनी श्रीप्रभुंचा महिमा निरूपीत निरूपीत बिजें केलें: तियेची दिसी श्रीप्रभु आमचीयां गोसावियांसि माल्हनदेवीवरी सामोरे आलेः देवतेसि खेळु केलाः आणि बिजें केलें: तवं आमचे गोसावी ‘‘ऐसें गा तें श्रीप्रभुः’’ ऐसें निरूपण करित करित माल्हनदेवीसि बिजें केलें: आणि माल्हनदेवीपासी उभे राहिलेः तवं तेथ श्रीप्रभुनि क्रीडा/कृडा करौनि बिजें केलें होतें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बटिकाः आतांची श्रीप्रभु आले होतेः आतांची निगालें: ये नव्हति श्रीप्रभुंचीं पाउलें: ये देखिली गाः’’ ऐसें म्हणौनि श्रीकरें दाखविले आणि चिमुटी पदरज घेउनि वंदिलें: चांगदेवभट रज उकरूं लागलें आणि गोसावी हास्य केलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बटिकाः हें ऐसें कुर्माचे कवंटें पर्येंत भेदुनि गेलें असेः तुम्ही काइ उकरित असाः बटिकाः एथ आसन घालाः’’ तेही म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ आसन घातलेः गुळळा जालाः विडा जाला :।।:



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: