Khanepuri (खनेपुरी)

खनेपुरी, ता. जालना, जि. जालना

येथील 1 स्थान - हे स्थान खनेपुरी गावाच्या वायव्येस प्रकाश बनगे यांच्या शेतात आहे.

जाण्याचा मार्ग :

भाटेपुरीहून पश्चिमेस खनेपुरी दोन कि.मी आहे. जालना ते खनेपुरी (खरपुडीमार्गे) 11 कि.मी. आहे. खनेपुरीला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

हे स्थान खनेपुरी गावाच्या वायव्येस श्री. प्रकाश दत्तोपंत बनगे यांच्या शेतात उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे काटेरी झाड होते. त्या झाडाखालील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात कार्तिक शुद्ध तृतीयेला जालन्याहून खनेपुरीला आले. त्यांना येथे आसन झाले. येथूनच भारध्वज नावाचा पक्षी सर्वज्ञांची श्रीमूर्ति पाहून वेधला. (पू.ली. 485, स्था.पो) सर्वज्ञ येथून भाटेपुरीला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

खनेपुरीचे स्थान : 1

  • Purvardha Charitra Lila – 485
  • Khanepuri : मार्गी भारद्वाजा वेधु :।।:
  • तवं बाइसें नाथोबा भिक्षा करौनि आलीं: गोसावियांसि झोळीया दृष्टीपूता केलियाः आणि सवेचि गोसावी तैथोनि बिजें केलें: भारद्वाजु काटियेवरि वेधे मूर्तितें अवलोकित बैसला होताः गोसावी बिजें केलें: आणि तो उडौनि मागौता मार्गी बैसलाः गोसावी तो ठावो पातलेः आणि मागौता पुढां बैसलाः ऐसा केतुला एकु मार्गुवेर्‍ही अनुवर्जत आलाः मग वोहळापैलाडि मार्गी गोसावियांसि आसन जालें: बाइसीं चरणक्षाळण केलें: गुळळा जालाः विडा ओळगवीलाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘पुण्यमहात्मे हो हें पांखिरूं कव्हणीये ठाइंचें ऐसें जाणां ना?’’ तिहीं म्हणितलें: ‘‘जी जीः जिये काटीयेतळीं गोसावियांसि आसन होतें तियें काटीयेचें: तेथौनि येत असेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एथ माणुसां तरि माणुसां: गोरूवां तरि गोरूवां: पाखिरूवां तरि पाखिरूवां वेधु आतिः यातें देखति आणि पाठीं पाठीं येवोंचि लागतीः तें काइ पां:’’ तें उगेचि होतेः बाइसीं पुसिलें: ‘‘हें ऐसें काइ बाबा?’’ सर्वज्ञें म्हणितलें ‘‘बाइः हा वेधशक्तीचा खेळुः’’ मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘महात्मे हो आतां जाः’’ आणि निगौनि गेलें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि(जालना)ला आले. स्वामींचे हिवरळि(जालना)ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्यास(अवस्थान) होते. पुढे स्वामीं रावसगावकडे निघाले तेव्हा खनेपुरि येथे आसन झाले. तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Khanepuri : खवनापुरिये काटितळीं आसन :॥:
  • गोसावी खवनापुरियेसि बीजें केलेंः खवनापुरिये वायव्य कोना आश्रा इत काटियेतळीं गोसावीयांसि आसन जालेंः बाइसीं श्रीचरण प्रक्षाळिलेः गुळुळाः विडा जालाः नाथोबा कै गोसावीयांचेया दर्शणा आले होतें तें नेणिजेः मग बाइसें आणि नाथोबा भिक्षे खवनापुरिये गेलींः गोसावीयांजवळीं लखुदेवोबा बैसले होतेंः एर गोसावीयांचे भक्तिजन अवघे फांकले :॥:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि(जालना)ला आले. स्वामींचे हिवरळि(जालना)ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्यास(अवस्थान) होते. पुढे स्वामीं रावसगावकडे निघाले तेव्हा खनेपुरि येथे आसन झाले. तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Khanepuri : ठकला जनु अनुवादु :।।:
  • गोसावी लुखदेवोबातें म्हणितलें: ‘‘पुण्यमहात्मे हो हा अवघा जनु ठकला पडिला असेः कव्हणीं याचें ठक फेडिता नाहीं: तू कां ठकलासि ऐसें कव्हणीं म्हणतें नाहीं:’’ तें ‘‘जी जीः’’ म्हणौनि उगेचि होतें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि(जालना)ला आले. स्वामींचे हिवरळि(जालना)ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्यास(अवस्थान) होते. पुढे स्वामीं रावसगावकडे निघाले तेव्हा खनेपुरि येथे आसन झाले. तेव्हाची ही लीळा…)

या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: