Khandgaon (Lohsar) (खांडगाव-लोहसर)

खांडगाव (लोहसर), ता. पाथर्डी, जि. अहमदनगर


येथील स्थान खांडगांव गावाच्या उत्तरेकडे जवळच नाल्याच्या काठावरील मंदीरात हे 1 स्थान आहे.


जाण्याचा मार्ग : खांडगाव, पांढरीचा पूल ते करंजी मार्गावर पांढरीच्या पुलाहून 17 कि. मी. आहे. व करंजीहून वायव्येस 6 कि. मी. आहे. (करंजी हे गाव, नगर-पाथर्डी मार्गावर आहे व पांढरीचा पूल नगर-औरंगाबाद मार्गावर आहे) मिरीहून दक्षिणेस खांडगाव पायमार्गे (कडगाव, राघोहिवरा मार्गे) 11 कि. मी. आहे. खांडगावला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

हे स्थान खांडगावच्या उत्तरेस अर्धा फाग अंतरावर ओढ्याच्या उत्तर काठी श्री. वाळेकर यांच्या शेतात पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात मिरीहून खांडगावला आले. त्यांना येथे आसन झाले. साधाने कणेराची फुले वेचून आणली. सर्वज्ञांची पूजा केली. मग सर्वज्ञांनी आरोगणा केली. साधाला पुढे केळीपिंपळगावला पाठविले. त्यानंतर थोडी विश्रांती घेऊन सर्वज्ञ येथून केळीपिंपळगावला गेले. (उ. ली. 211 तु. प्र. स्था., पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


खांडगावचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: