Khamgaon (खामगाव)

खामगाव, ता. गेवराई, जि. बीड.


येथील 1 स्थान - हे स्थान खामगांव गावातच नैर्ऋत्य विभागी कडे लहान मंदीरात आहे.


जाण्याचा मार्ग :

खामगाव, मलकापूर-सोलापूर राज्यमार्गावर गेवराईहून उत्तरेस 11 कि. मी. आहे व शहागडहून दक्षिणेस 1 कि. मी. आहे.


स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

हे स्थान खांबगावच्या नैर्ऋत्य विभागी पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे धाब्याचे घर होते.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात बागपिंपळगावहून खामगावला आले. त्यांना येथे आसन झाले. आरोगणा झाली. गुळळा, विडा झाला. (पू.ली. 525, स्था. पो.) त्यानंतर ते येथून शहागडला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


खामगावचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila – 525
  • Khamgaon : खांबगावीं धाबां पहुड आरोगणा:।।: उपाध्ये डोणी पाहो धाडणें :।।:
  • गोसावी खांबगावां बिजें केलें: गांवादक्षिणे धाबां: तेथ आसन जालें: बाइसीं चरणक्षाळण केलें: गोसावियांसि गुळळा जालाः विडा ओळगवीलाः पहूड जालाः उपहूड जालाः तवं डोणी न रीगेः मग गोसावी उपाध्यातें म्हणितलें: ‘‘बटिकाः डोणी पाहा जाः’’ तें गेलेः आलें: तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः डोणी पैलाडी गेलीः’’ मग गोसावियांसि तेथ आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः पुढति गोसावी उपाध्यातें म्हणितलें: ‘‘बटिकाः डोणी रीगतां पाहा जाः’’ ‘‘हो कां जीः’’ म्हणौनि उपाध्यें गेलेः तें टेंकावरि बैसौनि डोणी रीगतां पाहात होतें: डोणी रीगालीः इतुलेनि सांघो आलेः गोसावियांपुढें सांघितलें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेथुन स्वामी संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य(अवस्थान)होते. तेथुन स्वामी नंदापूर(नांदौर)ला आले. येथे स्वामींचे १५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. पूढे स्वामी नंदापूर(नांदौर)-बागपिंपळगाववरुण खामगावला आले…)
  • Purvardha Charitra Lila – 525
  • Khamgaon : डोणी आरोहणः कळादरीसनीं त्यागु देणें :।।:
  • गोसावी गंगे बिजें केलें: गोसावी डोणी आंतु आरोहण केलें: मग बाइसें मुख्यकरौनि अवघीं भक्तिजनें बैसलीं: मग तिहीं डोणी आवलिलीः मध्यें पातलीः आणि तिहीं तागा घालौनि नावेक मध्यें डोणि राहाविलीः नावेक स्थिर केलीः ऐसीं कळा गोसावियांसि दाखविलीः मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘येही एथ आपुली कळा दाखविलीः’’ मग पैल थडिया लाविलीः गोसावी डोणीवरूनि उतरलेः अवघीं भक्तिजनें उतरलीं: गोसावी तयांसि उचिता आलेः गोसावी बाइसांपासील पुडुवाटोवा मागितलाः आपुलेनि श्रीकरें मुदलाचिये वोटियेसि झाडौनि रीचविला :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेथुन स्वामी संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य(अवस्थान)होते. तेथुन स्वामी नंदापूर(नांदौर)ला आले. येथे स्वामींचे १५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. पूढे स्वामी नंदापूर(नांदौर)-बागपिंपळगाववरुण खामगावला आले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: