Khambale (खंबाळे, मांडलिक स्थान)

खंबाळे, ता. नाशिक जि. नाशिक


येथील मांडलिक मंदिर, नाशिक-त्र्यंबक मार्गावर खंबाळे गावात रोडच्या कडेलाच आहे


जाण्याचा मार्ग :

खंबाळे हे गाव, नाशिक-त्र्यंबक मार्गावरील अंजनेरी फाट्यापासून पूर्वेस 3.5 कि.मी. आहे. नाशिक ते खंबाळे 19 कि.मी, त्र्यंबक ते खंबाळे 10 कि.मी. खंबाळे ला जाण्यासाठी नाशिक व त्र्यंबकहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


मंदिराची माहिती :

नमस्कारी माधान :

हे मंदिर नाशिक-त्र्यंबक मार्गावर खंबाळे गावात रोडवरच मंदिर आहे. रोडवरून मंदिर दिसते.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

सत्य, अहिंसा, शांती, सामता, मानवता आणि जिवोध्दाराचे अमूल्य विचार देत देत परब्रह्म परमेश्वर अवतार भगवान श्री चक्रधर स्वामी वैशाख शके 1191 मध्ये नाशिकहुन गंगापुर अंजनेरी मार्गे त्र्यंबकेश्वर येथे आले. तेथील पाच दिवसाच्या निवास काळात श्रीचक्रधर स्वामी त्र्यंबकेश्वर मंदिर, ब्रह्मगीरी (गोदावरी उगमस्थान) गुप्त त्र्यंबक, गंगाव्दार, कुशावर्त येथे गेले. तेथे त्यांचे आसन झाले. ही भूमी त्यांच्या निवासाने पावन झाली. गोदावरीच्या उगमाजवळील आसनस्थानी मंदिर आहे.

मांधान विशेष : मुळ त्र्यंबकेश्वर मंदिरात स्वामी गेले असता गाभाऱ्यात जातांना डाव्या हाताला भिंतीत पाषाणाचे आयाताकती कुंड होते. प्राचीन भाषेत त्याला मांधान असे संबोधित असत. स्वामींनी भत्तांकडून पान सुपारीचा वीडा घेतला व मांधानात विसळला. स्वामींच्या कर स्पर्शाने हे मांधान पवित्र झाले. संदर्भ (पुर्वार्घ लिळा क्र. 250 त्रीयंबक अवस्थान, वीडा वाणे)

गोसावी त्रीयंबकाचे या देऊळासी विजे केले. माधानी वीडा धुतलाः त्रियंबकासी वीडा वाइला. जगती आतु वाव्यं कोणा आश्राईत गुंफाः तेथ गोसाविसांसि अवस्थान जालेः दिस पांच

जुन्या महादेव मंदिरात असलेले स्वामींच्या करस्पर्शाने पवित्र झालेले हे मांधान जेंव्हा मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात आला तेंव्हा तेथील व्यवस्थापक कै. मौनीबाबा यांचे कडुन ना.जि. महानुभाव समितीत प्राप्त झाले. त्याचा शोध घेणे स्थापना करणे यासाठी प्रा. बापुराज आण्णा सुकेणेकर, प.पु.श्री.मनोहर शास्त्री सुकेणकर बाबा , प.पु. अर्जुन आप्पा सुकेणकर, अंजनगांवकर सर प.पु.श्री गोपीराजशास्त्री सुकेणेकर, प.पु.महंत श्री सायराजबावा लोणारकर यांचे मोलाचे सहाय्य लाभले.
या पवित्र मांधान विशेषाची स्थापना सन 1997 मध्ये श्री शंकरराव दादा मोरे त्यांच्या वस्तीवर (नाशिक त्र्यंबकरस्ता) खंबाळे, ता.त्र्यंबकेश्वर करण्यात आली.




या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: