Khadkuli-Sangmeshwar 3 (Shri Chakradhar Mandir) (खडकुली-संगमेश्वर 3) (भव्य चक्रधर मंदिर)

खडकुली श्रीचक्रधर मंदिर : (संगमेश्वर तिसरे), ता. गंगापूर, जि. अहमदनगर


सावखेडा गावापासून 6 कि.मी. अंतरावर एका उच्च टेकडीवर (बेटावर, ढगावर ) कैवल्यवाशी प.पू.प.म.क्रांतदर्शी, श्रद्धेय आचार्यप्रवर श्री. नागराजबाबा मोठे यांनी दोन मजली भव्य श्रीचक्रधर मंदीराची इ.स. 2000 मध्ये स्थापना केली आहे.

सदर स्थानांवर जाण्याकरीता विशिष्ठ रस्ते असे नाहीत. कारण ही स्थाने पैठणच्या नाथसागराच्या बुडीत क्षेत्रात येतात. खरे तर येथे पूर्वी मंदीरे होती, काही आजही उपलब्ध आहेत. मात्र स्थानांवर जानारे रस्ते फक्त पाउस ज्या वर्षी कमी होइल त्या वर्षी मोठी गाडी, बैलगाडी, पायदळ, व लहान अवैधरित्या मासेमारी करणार्या लहान नावेतुन अवैधपणे जावे लागते... किंवा ...

असे असले तरी बरीच मंडळी येथे जातात. त्यासाठी MahanubhavDarshan.Com द्वारे सदर स्थानांवर जाण्याकरीता Nevigation द्वारे विशिष्ठ स्थान GoogleMaps वर निर्देशीत करण्यात आले आहे. गरजुंनी त्याचा उपयोग अवश्य करावा.... किंवा ... त्यासाठी नाथसागरातील महानुभाव तीर्थस्थान या पेजवर भेट द्यावी...

इ.श्री योगेंद्रदादा शेवलीकर,M.A. M.Phil. जाळीचा देव यांच्या मो.क्र. 7385901015 वा 8605275481 यावरुन जान्याचे रस्ते समजुन घ्यावे. योगेंद्रदादा यांनी त्या त्या गावात विशिष्ठ ओळखी करुण तेथील संपर्क क्रमांक मिळवलेले आहेत.)


जाण्याचा मार्ग :

सावखेडा गावापासून 6 कि.मी. अंतरावर एका उच्च टेकडीवर (बेटावर, ढगावर ) कैवल्यवाशी प.पू.प.म.क्रांतदर्शी, श्रद्धेय आचार्यप्रवर श्री. नागराजबाबा मोठे यांनी दोन मजली भव्य श्रीचक्रधर मंदीराची इ.स. 2000 मध्ये स्थापना केली आहे.


स्थानाची माहिती :

1. संगमेश्वरी विहरण स्थानः

श्रीचक्रधर मंदिरातील हे मुख्य स्थान आहे. स्वामी विहरणासाठी आल्यावर येथे आसन होत असे.

2. भविष्यनगर कथन हे स्थान :

मंदिराच्या समोर आहे.

3. मर्गजा बोलावणे स्थान :

हे स्थान मुख्य मंदिराच्या नैऋत्य दिशेस.

4. आसन स्थान :

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


सावखेडा गावापासून 6 कि.मी. अंतरावर एका उच्च टेकडीवर (बेटावर, ढगावर ) कैवल्यवाशी प.पू.प.म.क्रांतदर्शी, श्रद्धेय आचार्यप्रवर श्री. नागराजबाबा मोठे यांनी दोन मजली भव्य श्रीचक्रधर मंदीराची इ.स. 2000 मध्ये स्थापना केली आहे. चार ओट्यांचे बांधकाम करून मंदीरे बांधली या मंदीरांचा उद्घाटन सोहळा 29 एप्रिल 2004 रोजी संपन्न झाला. त्यावेळी पंथातील जेष्ठ श्रेष्ठ आचार्य उपस्थित होते. त्यांनी हे स्थान वंदन करून येथे मोठा भेटकाळ अवसर संपन्न झाला. त्यांनी येथील स्थान महात्म्य प्रवचनातून सांगितले.

आचार्य श्रीनागदेवभट्टांच्या अनुसरण स्थळाचे प्रतिक या स्वरूपात खडकुली या ठिकाणाचा विचार करण्यापेक्षा आपण त्याचा संगमेश्वर म्हणून विचार करु. सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी खडकुली येथे साडेतीन महीने राहीले. “खडकुलीए अवस्थान : मास आउट:” तर हिराइसांच्या मते “मास ३ :” (स्था. पो.) या मताला श्री. सारंगधर पूजदेकर दुजोरा देतात “केला मास विहार तीन सदये’ (तीर्थ माळीका) म्हणजेच तीन किंवा साडेतीन महिने स्वामी येथे राहिले. या प्रदीर्घ कालखंडात स्वामी अनेक ठिकाणी गेले. विहरण झाले. आसन झाले. नागदेव भटांना बहुत निरुपण येथेच केले. असे महत्वाचे ठिकाण जलाशयात गेल्यामुळे नमस करण्यास उपलब्ध नाही.

खडकुली परीसरातील एकूण स्थानांची संख्या स्थानपोथीत २७ सांगितलेली आहे. त्यापैकी सिद्धेश्वर (संगमेश्वर), शिवनेच्या घाटी, ढगावर, गायवाडा संगमेश्वर येथे काही स्थाने होती तर स्थान पोथीनुसार काही स्थाने संगमेश्वर येथे होती. हे संगमेश्वर तिसरे संगमेश्वर आहे. पहिल्या दोन्ही संगमेश्वरचा उल्लेख झाल्यावर पुन्हा संगमेश्वर हे नाव हस्तलिखित संग्रहालय वाम्बोरी येथील लीळाचरित्र्याच्या पोथीत आढळते असे प.पू.ई. श्री. हंसराजदादा खामनीकर यांनी सांगितले. त्यावरून संगमेश्वर (तिसरे) म्हणजेच आताची खडकुली (श्री चक्रधर मंदीर) होय.

श्रीचक्रधर मंदिर येथे साधक तथा भक्त दर्शनार्थ येतात त्यावेळी या मंदिरात मुक्कामी थांबतात. आचार्य श्रीनागदेवभट्ट यांच्या अनुसरणाची आठवण आणि स्वामींच्या प्रसन्न मनोधर्माची प्रचीति तेथे आजही येते. या भूमीचा कणं कणं श्रीस्वामींच्या पदस्पर्शाने पवित्र झालेला असल्याने तेथे मांगल्य निर्माण झालेले आहे. म्हणूनच या ठिकाणी अतीव प्रसन्नता लाभते. शिवाय होडीने पाण्यातून येण्या-जाण्याचे समाधान लहानथोरांच्या स्थान वंदनात आनंदाची भर घालते. या ठिकाणी दरवर्षी वर्धापणदिनाचा भव्य सोहळा संपन्न होतो. आचार्य श्रीनागराजबाबा, आचार्य त. सुभद्राबाईजी (आत्याबाई) साहित्याचार्य श्री. संतोषमुनीजी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाने येथील विकास कार्य प्रगतीपथावर आहे.


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: