Khadkuli-Sangmeshwar 2 (Gaywada) (खडकुली-संगमेश्वर 2) (गायवाडा)

संगमेश्वर (गायवाडा), ता. गंगापूर, जि. अहमदनगर


संगमेश्वर हे महादेवाचे प्राचीन मंदिर असून नाथसागरामुळे त्याची पडझड झाली. हल्ली येथे त्या मंदिराचे अवशेष पाहावयास मिळतात. मात्र या मंदिराचा चौक उपलब्ध आहे. येथे खडकुलीहून नावेने जाता येते. 

सदर स्थानांवर जाण्याकरीता विशिष्ठ रस्ते असे नाहीत. कारण ही स्थाने पैठणच्या नाथसागराच्या बुडीत क्षेत्रात येतात. खरे तर येथे पूर्वी मंदीरे होती, काही आजही उपलब्ध आहेत. मात्र स्थानांवर जानारे रस्ते फक्त पाउस ज्या वर्षी कमी होइल त्या वर्षी मोठी गाडी, बैलगाडी, पायदळ, व लहान अवैधरित्या मासेमारी करणार्या लहान नावेतुन अवैधपणे जावे लागते... किंवा ...

असे असले तरी बरीच मंडळी येथे जातात. त्यासाठी MahanubhavDarshan.Com द्वारे सदर स्थानांवर जाण्याकरीता Nevigation द्वारे विशिष्ठ स्थान GoogleMaps वर निर्देशीत करण्यात आले आहे. गरजुंनी त्याचा उपयोग अवश्य करावा.... किंवा ... त्यासाठी नाथसागरातील महानुभाव तीर्थस्थान या पेजवर भेट द्यावी...

इ.श्री योगेंद्रदादा शेवलीकर,M.A. M.Phil. जाळीचा देव यांच्या मो.क्र. 7385901015 वा 8605275481 यावरुन जान्याचे रस्ते समजुन घ्यावे. योगेंद्रदादा यांनी त्या त्या गावात विशिष्ठ ओळखी करुण तेथील संपर्क क्रमांक मिळवलेले आहेत.)


जाण्याचा मार्ग :

खडकुली-संगमेश्वर

संगमेश्वर हे महादेवाचे प्राचीन मंदिर असून नाथसागरामुळे त्याची पडझड झाली. हल्ली येथे त्या मंदिराचे अवशेष पाहावयास मिळतात. मात्र या मंदिराचा चौक उपलब्ध आहे. येथे खडकुलीहून नावेने जाता येते.


स्थानाची माहिती :

हे स्थान संगमेश्वर मंदिराच्या चौकाच्या दक्षिणेस आहे. सध्या तेथील चौकामध्ये देवदत्त आश्रम येथील महात्म्ये प.पू. श्री. गोपीराजदादा, पू. श्री. रविराजदादा अंकुळनेरकर यांच्या प्रयत्नाने सिमेंट काँक्रीटचा पोल (खंबा) उभा केलेला आहे. महानुभाव आश्रम वाम्बोरी येथील महात्म्यांनी पू.श्री. अतुलमुनीकाका यांच्या प्रयत्नाने चौकामध्ये सिमेंटचा कोबा करून ओटा बांधलेला आहे.

गोदावरी तथा शिवाना नदीच्या संगमावर असलेले हे संगमेश्वर गायवाडा संगमेश्वर म्हणून ओळखल्या जाते. स्वामींच्यावेळी येथे गायवाडा असून ढगावर म्हणजे उंच टेकडीवर देवतेचे प्राचीन मंदिर होते. या मंदिराला दोन दरवाजे असून एक खिडकी होती. या मंदिराच्या चौकात स्वामींना थोडावेळ आसन झाले.

1. आसन स्थान :

सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी पूर्वेच्या मुख्य प्रवेशद्वाराने संगमेश्वराच्या मंदिरात आले. “संगमेश्वराचे देऊळ पूर्वामूख” ‘रिगता डावेया हाता:’ म्हणजे स्वामींनी प्रवेश केल्यावर त्यांच्या डाव्या बाजूला आणि देवतेच्या उजव्या बाजूला स्वामींना थोडावेळ आसन झाले. हे आसनस्थान मंदिरातील दक्षिणेच्या खिडकीकडील भिंतीसी आहे. म्हणूनच तेथे ओटा बांधलेला आहे.

लीळा : पैलाडी संगमेश्वरी आसन :

मग पैलाडिया संगमेश्वरा बीजे केलें: तेथे चौकी नावेक आसन जालें: मग परते खडकाळीए बीजे केले: नावेक अवस्थान जालें:

(पू.ली. 626 ली.च. संपा. देवदत्त प्रकाशन जाधववाडी)

त्याचप्रमाणे

मग गोसावी संगमेश्वरासी बीजे केले: चौकी नावेक आसन जालें: 591 शा. प्रत पू. ली.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानपोथी : संगमेश्वराचे देऊळ: पूर्वामूख || दोनि दारवढे || एकु उतरामूखः ।। एकु पूर्वामुख || दक्षीणे खीडकी || संगमेश्वराचा चौकी ।।

विद्यापीठ स्थानपोथी : संगमेश्वर पूर्वाभिमूखः ।।: स्थानेः२ः ।।0।।


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: