Khadkuli-Chinch Kapat (खडकुली-चिंच कपाट)

खडकुली (चिंच कपाट), ता. गंगापूर, जि. औरंगाबाद


येथील 1 स्थान जाधववाडी येथील महात्म्यांनी चिंचकपाट येथे सिमेंटचा पोल उभा केला आहे. 

सदर स्थानांवर जाण्याकरीता विशिष्ठ रस्ते असे नाहीत. कारण ही स्थाने पैठणच्या नाथसागराच्या बुडीत क्षेत्रात येतात. खरे तर येथे पूर्वी मंदीरे होती, काही आजही उपलब्ध आहेत. मात्र स्थानांवर जानारे रस्ते फक्त पाउस ज्या वर्षी कमी होइल त्या वर्षी मोठी गाडी, बैलगाडी, पायदळ, व लहान अवैधरित्या मासेमारी करणार्या लहान नावेतुन अवैधपणे जावे लागते... किंवा ...

असे असले तरी बरीच मंडळी येथे जातात. त्यासाठी MahanubhavDarshan.Com द्वारे सदर स्थानांवर जाण्याकरीता Nevigation द्वारे विशिष्ठ स्थान GoogleMaps वर निर्देशीत करण्यात आले आहे. गरजुंनी त्याचा उपयोग अवश्य करावा.... किंवा ... त्यासाठी नाथसागरातील महानुभाव तीर्थस्थान या पेजवर भेट द्यावी...

इ.श्री योगेंद्रदादा शेवलीकर,M.A. M.Phil. जाळीचा देव यांच्या मो.क्र. 7385901015 वा 8605275481 यावरुन जान्याचे रस्ते समजुन घ्यावे. योगेंद्रदादा यांनी त्या त्या गावात विशिष्ठ ओळखी करुण तेथील संपर्क क्रमांक मिळवलेले आहेत.)


जाण्याचा मार्ग :

अ) औरंगाबाद – गंगापूर फाटा- भेंडाळा- भुईधानोरा- धनगरपट्टी(धनगरपट्टी ते आगरवाडगाव ३ कि.मी. आगरवाडगाव-खडकुली. आगरवाडगाव ते खडकुली 7 कि.मी.)

ब) औरंगाबाद – वाळुजगाव खडकुली. (सावखेडा ते खडकुली 6 कि.मी.) दहेगाव बंगला – शेंदुरवादा- सावखेडा

क) औरंगाबाद – ढोरेगाव- सावखेडा खडकुली 50 कि.मी.

ड) औरंगाबाद – वाळुजगाव-रांजणगाव-सेंदुरवादा-सावखेडा-खडकुली. 40 कि.मी.

इ) औरंगाबाद बिडकीन शेकटा सेंदुरवादा फाटा-मांडवा-सावखेडा-खडकुली. 35 कि.मी.

ई) पैठण ढोरकीन 74 जळगाव शेकटा सेंदुरवादा सावखेडा-खडकुली. 40 कि.मी.

उ) अहमदनगर-नेवासा-भेंडाळा किंवा ढोरेगांव मार्गे खडकुली.

टीप : अ क्रमांकांचा मार्ग इतर 6 मागपेिक्षा चांगला आहे. जाताना संपर्क करून जावे. श्री. संजयभाऊ मसरूक मो. 9404982774, श्री. आबासाहेब मसरुक मो. 9403079137 हे सोबत येतात किंवा त्यांचा मुलगा किरण यास सोबत देतात. नावेने/ होडिने खडकुलीला जावे लागते. संपर्क श्री. अशोक गव्हाणे (होडीवाले) मो. 9921987370 इतर मार्गाने आल्यास सावखेडा गावापासून आग्नेयेस 4 कि.मी. अंतरावर महानुभाव आश्रम आहे. तेथे सर्व व्यवस्था आहे. संपर्क तपस्विनी कपाटे आई मो. नं. 8605882561 खडकुली येथे जाण्यापूर्वी होडीवाल्याशी संपर्क करावा. कारण वारा, पाऊस असल्यास जाता येत नाही. खडकुलीला जाताना संगमेश्वर येथे जाण्यासाठी होडीवाल्याशी बोलून घ्यावे लागते.


स्थानाची माहिती :

खडकुली हे गाव नसून नदीच्या किनाऱ्यावर असलेली एक कपार आहे. त्यास चिंचकपाट / चिंचकपार या नावाने परिसरात ओळखतात. नाथ सागर/जायकवाडी प्रकल्प / पैठण धरण झाल्यावर हे ठिकाण पाण्यात बुडाले आता तेथे जाता येत नाही पण या ठिकाणचे स्मरण व्हावे म्हणून देवदत्त आश्रम जाधववाडी येथील महात्म्यांनी चिंचकपाट येथे सिमेंटचा पोल उभा केला आहे. या पोलपर्यंत होडीने जाता येते, पुढे जाऊ नये. पाणी कमी असल्यास चिंचेच्या झाडाचे खोड आजही दिसते.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

चिंचकपाट येथे फारमोठी कपार किंवा कोहकं होतं असा अर्थ काढणे कठीणच आहे. पण पाण्याच्या लाटांची धडक बसत असल्यामुळे तेथे थोडीसी कपार निर्माण झालेली होती. ही कपार ज्या टेकडीमध्ये तयार झाली त्या टेकडीची (ढगाची) उंची 30 ते 35 फुटापेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येते. “तेथ कपाटी आसन जालें” तेथे बाइसांनी मात्रा ठेवली. नंतर स्वामींनी तेथील “कपाटासी भिंती घालविलीयाः दोनी गुंफा केलिया:” चरित्रातील या उल्लेखावरून लक्षात येते की, तेथील कपाट म्हणजे उंच खडकाला किंवा डोंगराला कोरून तयार झालेले कोहकं हे फार मोठे नसावे. त्यामुळे गुंफा बांधून भिंती बांधाव्या लागल्या.

खडकुली येथे स्वामींनी “दोनी गुंफा केलीयाः” त्यापैकी “पूर्वामुखे गुंफे अवस्थान जालें:’ म्हणजेच पूर्व दिशेकडे प्रवेशद्वार असणाऱ्या गुंफेत अथवा विवरात स्वामींना अवस्थान झाले. गुंफेच्या समोरून नदी वाहत असे तर मागे पश्चिमेला भली मोठी उंच टेकडी होती. सावखेडगाव जुने सुद्धा खडकुलीच्या पश्चिमेलाच होते. या गावाचे पूनर्वसन झालेले आहे. गुंफेच्या आजुबाजुला चिंचेचे तीन विशाल वृक्ष होते. हे झाडं चार माणसांच्या कवळीत सुद्धा बसत नसत एवढे मोठे होते. उन्हाळ्यात त्याची घनदाट सावली मिळे तर पावसाळ्यात पावसापासून संरक्षण ही होत असे.

खडकुली येथे 3 स्थाने असल्याचे पंथातील आणि सावखेडगावातील अनेक वयोवृद्ध सांगतात. महानुभाव साधु खडकुली नमस करायला गेल्यावर तेथील माती किंवा चिखल काढण्यासाठी ज्या मजूरांना बोलावत ते सेवक आजही सावखेडगावात आहेत. त्यांच्याकडून बरीच माहिती उपलब्ध होते. खडकुली म्हणजे खडकातील गुंफेसारखी कपार ती सावखेडा जुने या गावच्या शिवारात आहे. ते गाव नाथसागरात बुडाले असून नवीन सावखेडा गावचे पुनर्वसन झाले आहे.

पंथात उपलब्ध असलेल्या पुरव्यांमध्ये सुद्धा 3 स्थाने असल्याचा फोटो येथे दिलेला आहे. या फोटोतील मुख्य ओटा हा “खडकुलीए अवस्थानः भटां अनुसरणः’ या लीळेचा आहे.

खडकुली येथे अनेक स्थाने असून 3 स्थाने असल्याचे फोटो मध्ये दिसते. येथेच आयार्च श्री नागदेव यांचे अनुसरण झाले असून स्वामींचा पुर्वार्ध परिभ्रमणकाळ संपून उत्तरार्ध परिभ्रमण काळ चालू झाला. खडकुली येथील एकूण स्थाने 27 आहेत.


खडकुली येथील महत्त्वाच्या लीळा :

1. सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचा पूर्वार्ध परीभ्रमण कालखंड खडकुली येथे संपला.

2. सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या उत्तरार्ध काळाचा प्रारंभ खडकुली येथूनच झाला. त्यांच्या संनिधानात अनेक शिष्य परिवार राहू लागले

3. आद्याचार्य श्रीनागदेवभट्ट यांचे संन्यास, दीक्षा, अनुसरण याच खडकुलीला झाले.

4. स्वामींच्या पूजावसरासाठी फुलांचे अलंकार बनवण्याचे अप्रतीम कौशल्य श्रीनागदेवभट्टांनी माळ्यापासून खडकुली येथे अवगत केले. सर्पदंश माळीया रक्षणे:’

5. खडकुली येथे स्वामींच्या ठाई दवनापर्व करण्यात आले. पंचपर्वामध्ये हे महत्त्वाचे पर्व आहे.

6. खडकुली येथे स्वामींनी महत्त्वपूर्ण सूत्र, दृष्टांत (उदा. सुरीएचा) इ. निरूपण केले.

7. पंचकृष्ण, नामाचे दहाठाय, क्रियापाक या प्रकरणांचा प्रकरणवश खडकुली येथील आहे.

8. आचार प्रकरणाचे सुरूवातीचे वचने, भिक्षेचा सरवळा (सरोळा) येथेच निरूपन केला.


अनुपलब्ध स्थान :

खडकुली येथील खालील पूर्वार्ध लीळांची स्थाने अनुपलब्द्ध आहेत –

1. सिवनेचा घाटी वस्त्र वेढणे स्थान, 2. संगमेश्वराच्या देउळातील चौकी आसन स्थान, 3. नरसिंहाच्या देउळातील आसन स्थान, 4. ढागावरील आसन स्थान, 5. ढगा उत्तरे दरडीसि लघु.परिश्रय स्थान, 6. ओता उत्तरे परिश्रय स्थान, 7. उदका विनीयोग स्थान.

खडकुली येथील खालील उत्तरार्ध लीळांची स्थाने अनुपलब्द्ध आहेत –

1. कपाटी गुंफे आसन स्थान, 2. पटिशाळेच्या ओट्यावरील आसन स्थान, 3. गुंफेच्या पाठीमागील आसन स्थान, 4. पटिशाळेच्या रिगता डावेया हातावरील आसन स्थान, 5. पटिशाळेच्या अंगणातील वेढे स्थान, 6. लखुदेवबा भेटि अनुवर्जीत बिजे करणे स्थान, 7. कपाटी आसन विहार स्थान, 8. खडकावरील आसन स्थान, 9. उदकात सांडोवा बांधणे स्थान, 10. अंगणात मादने स्थान, 11. परिश्रय स्थान, 12. भिक्षआवसर दाखवणे स्थान, 13. शिमगा शंपणे स्थान, 14. गोविंदावर कपाट पडले त्या प्रसंगी चरणचारी उभे राहुन क्रीया करवने स्थान, 15. सर्पदंश माळी रक्षणे स्थान, 16. भट्टा रुदन निषेध स्थान, 17. खडकावर चरणचारी उभे राहणे स्थान, 18. लघुपरिश्रय स्थान, 19. गंगेपैलाडी शेतातील विहरण स्थान, 20. कोहकी आसन स्थान, 21. मर्गजेशी आसन स्थान, 22. डोहा काठी आसन स्थान.


विद्यापीठ स्थानपोथी : खडकालीए अवस्थान : मांस आउठ ।। हिराइसा ।। मांस ३ : गुंफेपुर्वे खडक || गुंफेचीए पटिसाळे : इंद्रभटां फुटा प्रदान ।। गोसावियासी बाहीरीला पटीसाळे : रीगतां डावेया हाता: तेथ दाइंबा भेटि ||२|| भुतानंदाचिया पुरीया : गोसावियासी बाहीरीली पटिसाळेवरि आसन जालें ||३|| पटीसाळे बोणेबाइयांची भेटि: पटिसाळे ||४|| सारंग पंडीतांचि भेटि ||५|| माळ पटीसाळे | माहाजना भेटि ||६|| वीद्वांसां पटिसाळे भेटि । दैवाद्य निरूपण ।।७।। वीद्वांसा गुणकार्येनिरूपण ||८|| गोसावियासी खडकावरि आसन जालें : मार्तंडा प्रमाण ||९|| खेइगोइ भेटि ||१०|| ग्रहसारंगपाणि भेटि ||११|| गांगाइसां भेटि ||१२|| आपलोची भेटि ||१३|| लुखदेओबासांची भेटि ||१४|| राणाइसांची भेटि ||१५|| कामाइसां भेटि: सोवासनी म्हणणें ||१६|| लाहीदेओभटां पटिसाळे भेटि: बीढारावरि बीढार (कथन) ||१७|| || सोध : गोसावी दक्षीणे बीजें केलें : तथा हीराइसा ।। गुंफे पूर्वेबीजें केलें || पाठी गुंफेसि पुर्वेपसीमे बीजें केले : पांडा १० तेथ आसन जालें । गुंफे पसीमे मार्ग ॥ वाव्ये परीश्रए । गुंफेवरि ढगु || ढगावरूनि भवीस्य नगर सांधणें | गुंफे पसीमें पांडां १५ : खडकावरि भट रूदन | गोसावियासि बाहीरीले पटिसाळे आसन जालें : तेथौनि भट रूधीपूरा पाठवणें || रूदनाचीया खडका दक्षीणे सांडोवा ॥ तेथचि होळी | गुंफे पुर्वेपांडा १५ : गोवींद कपाट | गुंफे दक्षीणे मादनें स्थान || ।। सांडोव्या दक्षीणे कोहळें : (कें) || एक म्हणति सांडोवेया पुर्वेपांडा १५ : कोहळें ।।

विद्यापीठ स्थानपोथी: मग थडीया थडीया कपाटे पाहात खडकाळीए बीजे केले: तेथ कपाटी आसन झाले हुरडा आरोगनाः ।।: गोसावीयास खडकाळीये अवस्थानः।। कपाटासी भीती घालुनी दोनी गुफा करविलीया पुर्वाभिमुखे गुफे अवस्थान ।।011


शिवना नदीच्या काठावरील दोन स्थाने :

संगमेश्वर येथून स्वामी खडकुली येथे जात असताना एरी देवळीये: (एकी वासना लींगाचीए देवळीए: बीजे केले तेथ हुरडा आरोगणा जाली:) उत्तरामुखे आसन जाले: मग परतले: खडकाळीए बीजे केलें:” म्हणजेच स्वामी खडकुलीला आले. ही स्थाने आता नदीच्या पाण्याच्या धारेमध्ये आहेत. त्यामुळे तेथे जाता येत नाही.

लीळा : 1. शिवनेच्या घाटीवस्त्र वेढणे.

2. उपाध्याः विष्णुभटा भेटी.

3. कपाटी आसन: हुरडा आरोगण.

4. अवधुता स्कंदारोहणी सीवना उतरणे.


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: