Katsur (काटसूर)

काटसुर, ता. मोर्शी जि. अमरावती


येथील 4 स्थाने (श्रीगोविंदप्रभुबाबा) 2 ठीकानी आहेत - येथील 2 स्थाने काटसूर गावांच्या मधोमध उंचावर/गढीवर मंदीरात आहेत. तर 2 स्थाने काटसूर गावांच्या पश्चिमेकडे मंदीरात आहेत, गढीवरूण ही स्थाने दिसतात.


जाण्याचा मार्ग :

अंतोऱ्याहून उत्तरेस काटसूर पायमार्गे 3 कि. मी. आहे. चांदूरबाजार ते काटसुर (मार्गे बेलोरा) 14 कि. मी. अमरावती ते काटसुर (मार्गे चांदूरबाजार, बेलोरा) 52 कि. मी. काटसुरला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

Google Map Location Link 👈 (किल्क करा) खालील चारही स्थाने

1. श्रीगोविंदप्रभूचे अवस्थान स्थान :

हे स्थान काटसुर गावाच्या मध्यभागी उंच गढीवर पूर्वाभिमुख देवळात आहे. गढीवर चढून जाण्यासाठी गढीच्या उत्तर बाजूने 27 पायऱ्या आहेत.

लीळा : श्रीगोविंदप्रभू अंतोऱ्याहन काटसुरला आले. त्यांचे या ठिकाणी तीन दिवस वास्तव्य होते. (स्था. पो.) तीन दिवसांच्या वास्तव्यानंतर श्रीप्रभू येथून नांदगावला गेले.


2. मादने स्थान :

हे स्थान देवळाच्या वायव्य विभागी बाहेरील बाजूस आहे (स्था. पो.)

देवळाच्या पाठीमागील मादने स्थानाच्या पश्चिमेची दोन स्थाने अवांतर मांडलेली आहेत. त्याला ग्रंथाधार नाही.


रूपनायकांच्या आवारातील स्थाने

रूपनायकांच्या आवारातील स्थाने गढीच्या वायव्येस गावाच्या पश्चिम विभागी आहेत. गढीवरून स्थाने दिसतात. ही स्थाने सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू चरणांकित आहेत.

3. वसती स्थान :

हे स्थान आवारात उत्तर विभागी आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे रूपनायकांचा आवार होता.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभुंचे एकांकात दाभेरी येथे वास्तव्य असताना एके दिवशी रूपनायकांची भेट झाली. त्यांनी सर्वज्ञांना विनंती करून काटसुरला आणले. येथे सर्वज्ञांना पूजा आरोगणा झाली. एक रात्र मुक्काम झाला. (पू. ली. 40, स्था.पो.)

4. मादने स्थान :

हे स्थान वसती स्थानापासून दक्षिणेस 33 फूट 4 इंच अंतरावर आहे. (पू. ली. 40, स्था. पो.)


अनुपलब्ध स्थाने :

1. आड अवलोकणे स्थान.

2. परिश्रय स्थान


काटसुरची एकूण स्थाने : 6


  • Purvardha Charitra Lila – 40
  • Katsur : रूपनायका भेटि :।।:
  • हे गोष्टि गोसावी जोगेस्वरी पाणिपात्रप्रदानी साधांवरि सांघितलीः।: साधाते सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘साधें हो मामेयाचा घरीं जेवाल की भिक्षा करौनि जेवाल?’’ मग साधीं म्हणितलेः ‘‘हा जीः गोसावी मामेयातें केवी जाणति?’’ यावरि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘साधें हों: हें पूर्वि दाभवीहिरीसि होतें: रूपनायक तें साधांचे मामेः तयांचें एक घर रीधपूरीं होतें: एक घर कांटसरां होतें: गोसावियांसि दर्भेस्विराचेया बाळाणेयांवरि आसन असेः तवं रूपनायक आलेः गोसावियांते देखिलें आणि दरीसनासवेचि वेधलेः दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलें: गोसावियांते विनविलें: ‘‘जी माझेया गावांसि बिजें करावे जीः’’ गोसावी मानिलें: आपुलेया गावां कांटसुरेयासि घोडेया वाउनी घेउनि गेलेः श्रीचरण प्रक्षाळन केलेः गोसावियांसि वोलनी दिधलीः मर्दना जालीः मार्जनें जालें: पूजा केलीः आरोगणेलागी विनविलें: मग गोसावियांसि ताट केलें: तद्भावी दुधातुपा वाटी भरूनि ताटावरि ठेविलीः मग दुधातुपाची आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः तेथ तेयांचांची घरीं वस्ति जालीः मग उदेयांसीचि तेथौनि बीजें केलें: साधी म्हणितलें: ‘‘हा जीः तो पूजा करूं केवी जाणे?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तें आगमिक पूजा करूं जाणतिः’’ :।।: (हे गोष्टि गोसावी जोगेस्वरी पाणिपात्रप्रदानी साधांवरि सांघितलीः।।:)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: