Katol (काटोल)

काटोल, ता.काटोल जि.नागपूर


काटोल येथील २ स्थाने एकाच ठिकाणी गावातच पूर्वेकडे बुधवारी पेठेतील जी.प.शाळेजवळ आहेत.


जाण्याचा मार्ग :

काटोल हे शहर, नागपूरहन वायव्येस 57 कि. मी. आहे. मोर्शी ते काटोल (वरूड मार्गे) 77 कि. मी. आहे. भिष्णूरहून तळेगाव, धर्ती मूर्ति मार्गे काटोलला जाता येते. काटोल हे दिल्ली-नागपूर लोहमार्गावरील रेल्वेस्थानक आहे.


स्थानाची माहिती :

1. कांतेश्वर अवस्थान/वयस्तंभिनी विद्या स्वीकार स्थान :

हे स्थान काटोल शहराच्या पूर्व विभागी बुधवार पेठेत प्राथमिक शाळा क्रमांक 8 च्या पाठीमागे किल्ल्याच्या पश्चिम बाजूस पश्चिमाभिमुख देवळात
आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे उधळीनाथांचे निवासस्थान होते.


लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभुंनी एकांकामध्ये येथे द्वारावतीकारांचे शिष्य विद्यावंत उधळीनाथ यांच्यापासून वयस्तंभिनी विद्येचा स्वीकार केला. (पू.ली. 25)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. आरोगणा स्थान :

हे स्थान देवळाच्या उत्तरेस सुमारे 225 फूट अंतरावर जांब नदीच्या नैर्ऋत्य काठी आहे.


लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू नगरामध्ये भिक्षा करून येथे आरोगणा करीत असत. (लीळाचरित्र, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


निर्देशरहित स्थान :

1. अवस्थान स्थान मंदिराच्या उत्तर बाजूस परिसरातील ‘पानीपात्र’ नावाचे स्थान.

2. आरोगणा स्थान मंदिराकडे जाताना वाटेत पडणारे ‘मर्दना’ नावाचे स्थान.

3. आरोगणा स्थान मंदिराकडे जाताना वाटेत पडणारे ‘मादणे’ नावाचे स्थान.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

मर्दना मादने नावाची दोन्ही निर्देशरहित स्थाने

काटोल ची एकूण स्थाने : 2

निर्देशरहित स्थाने : 3


  • Purvardha Charitra Lila – 25
  • Katol  :  कांतिये श्रीचांगदेवराऊळांशिक्ष्यां भेटि :।।:  
  • एक दिस दादोस रीधपूरा निगालेः तयाउपरि गोसावी दादोसांतें म्हणितलें: ‘‘महात्मे हो तुम्हीं परमेस्वरपूरां कां जाता? श्रीप्रभुचेया दरीसना कां गा जा?’’ तवं दादोसीं म्हणितलें: ‘‘ना जीः तें आमचे परमगुरु म्हणौनि जावों जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ते वानरेयाचे परमगुरुः तुमचे परमगुरु तें कांतीयेसि असतिः’’ महादाइसीं पुसिलें: ‘‘ते कैसें जी?’’ याउपरि हें गोष्टि गोसावी सांघितलीः गोसावी कांतीयेसि एक सुडा कटीप्रदेशीं: एक सुडा श्रीमुगुटीं: ऐसें पाणिपात्र करावया नगरामध्यें दुर्गाचेनि खालिलें परिसरें बिजें केलें: तेथ द्वारावतिकारांचे अनुगृहित उधळीनाथः तें तेथचेया रायाचे राजगुरु होउनि वर्तत असतिः तें उपरियेवरि बैसले असतिः तेहीं उपरियेवरूनि गोसावियांतें देखिलें: मग आपुलेया शिक्ष्याते म्हणितलेः ‘‘देखिले गा पैल पुरूखः पुरूखीं कैसा पींडु उपेक्षीलाः’’ ऐसें म्हणौनि आपुलेया शिक्ष्याकरवी बोलाविलें: शिक्ष्य आलेः मग नम्रताची गोसावियांतें विनविलें: ‘‘जी रायाचे गुरु उधळीनाथः तेंहीं तुमतें बोलाउं पाठविलें असे जीः’’ गोसावियांसि तेथ बिजें करावाची प्रवृत्तिः मग गोसावी तयाचि विनवणी स्वीकरिलीः तेथ गोसावी बिजें केलें: तवं तें डोल्हारेयावरि बैसले असतिः गोसावियांतें येत देखौनि तेंहीं म्हणितलें: ‘एया पुरूखुः ऐसा पिंडः मां ऐसां कां उपेखीला बापेयाः’ उदास्याची प्रवृत्ति म्हणौनि गोसावी उगेचि होतेः मग तेहीं विद्या होती तें तेथौनीचि आपुलेनि सामथ्र्ये संक्रमूं आदरिलीः गोसावी न स्वीकरीतिः विद्या संक्रमेनाः मग तेहीं पोटीं म्हणितलें: ‘‘पुरूख हटिया असेः आमुचेया श्रीचांगदेवराऊळाची विद्या न संचरें ऐसां कव्हण असे? परि हें पुरूख रावो कीं देवो? हें नेणिजें:’’ तें डोल्हारेयावरूनि उतरलेः गोसावियांसि सिंहासनावरि आसन घातलें: गोसावी आसनी उपविष्ट जालें: मां तें खाली बैसले आणि श्रीमूर्तिचें चांग निरीक्षण केलें: तवं केशकळाप गुंतले तुटलें देखिलें: गवतकाडीया कुसळें रूतलीं देखिलीं: श्रीमूर्तिसि सर्वांगीं काटीयेचे ओरखंडेः तेथ अशूधाचे बींदु वाळलें असतिः तियें माणिकें झळझळीत ऐसें दिसतिः ऐसीं श्रीमूर्ति उपेक्षीली देखौनि मग गोसावियांसि आणिक आसन घातलेः पासी पुष्टिविभागीं बैसौनि उधळीनाथें आपुलेनि हातें काटेंकुसळें वेंचैनिः वीरगुंठी सोडौनिः नखवरि श्रीमुगुट विचरूनिः मागुती वीरगुंठी घातलीं: मग धुवटे वस्त्रें तिंबौनि सर्वांगीचे असुध बींदु पुसिलेः गोसावियांसि वस्त्रें ओळगवीलीं: सिंहासनी बैसविलें: मग तेहीं पुढे उभे राहुनि गोसावियांतें हात जोडूनि सेवकवृत्ति नम्रां होउनि विनविलें: ‘‘जी जीः आमतें वयस्तंबनी नांवः दृढपिंडकरणी विद्या असेः तिया पींडु धरेः पींडु दृढ होएः तीयेसि वळीतपळीती न ये जीः तियेसी सहस्त्र वरूषें आयुष्यः तें गोसावी स्वीकरावी जीः’’ ऐसें विनउनी श्रीचरणां लागलाः गोसावी श्रीमुकुटें मानिलें: मग स्वीकरिलीः आणि तें सुखीये जालें: महादाइसीं पुसिलें: ‘‘जी जीः गोसावी विद्या स्वीकरिलीः तें तयांसि काइ जालें? तें रीते ठेले जी? तयासि काइ दिधले जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तांची विद्या अपूर्ण होती तें एथौनि संपूर्ण केलीः’’ :।।: (हे गोष्टि गोसावी ढोरेस्वरीं दादोसांवरि सांघितलीः।।:)

Katol Sthan Darshan by Sarang Dhar || Jay Krishni Mahanubhav ||



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: