Karanjkhed (करंजखेड)

करंजखेड, ता. कन्नड, जि. औरंगाबाद


येथील 4 स्थाने 3 ठीकानी आहेत -
1) अवस्थान व मादने स्थान - हे 2 स्थान एकाच ठीकाणी करंजखेड गावाच्या पश्चिमेकडे बाजारपेठ भागात गावातच मंदीर आहे.
2) आसणस्थान - हे 1 स्थान करंजखेड गावाच्या पूर्वेकडे शेतात रस्त्याचे बाजुला मंदीर आहे.
3) विहरणस्थान - हे 1 स्थान करंजखेड गावाच्या उत्तरेकडे शेतात रामेश्वर मंदीराचे बाजुला आपले मंदीर आहे.


जाण्याचा मार्ग :

करंजखेड हे गाव, सिल्लोड चाळीसगाव मार्गावर सिल्लोडहून किंचित् वायव्येस 42 कि.मी. आहे. व चाळीसगावहून पूर्वेस 51 कि.मी.आहे. चारनेर ते करंजखेड (घाटनांद्रा मार्गे) 31 कि.मी. आहे. चारनेरहून नैर्ऋत्येस करंजखेड लोहगाव, टाकळीअंतर नेवपर मार्गे) 16 कि.मी. आहे. हा पायमार्ग आहे. कन्नड ते करंजखेड 28 कि.मी. आहे. करंजखेडला जाण्यासाठी एस.टी, बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. अवस्थान स्थान :

हे स्थान करंजखेड गावाच्या पश्चिम विभागी जुन्या बाजारपेठेत उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथेच बाजारपेठ होती. या ठिकाणी पानुनायकांचे दुसरे घर होते.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात चारनेरहून करंजखेडला आले. त्यांचे या ठिकाणी दोन महिने वास्तव्य होते. (पू.ली.438,स्था.पो.) दोन महिन्यांच्या वास्तव्यानंतर ते येथून निल्लोडला गेले.

येथील इतर लीळा :

(1) पानुनायकांची वाताच्या दु:खातून मुक्तता करणे. (पू.ली. 439)

(2) दादोस, भटोबास, इंद्रभट, आबाइसे, गौराइसे इत्यादी भक्तजनांनी सर्वज्ञांना पविते अर्पण करून पवित्याचे पर्व साजरे केले. (पू.ली. 441, 455)

(3) घोंगडे विणण्याच्या प्रसंगावरून रामदेव ऊर्फ दादोस यांना जळमांडवीचा दृष्टांत निरूपणे. (पू.ली. 447)

(4) प्रकाशदेवा गर्वा अनुवाद, (पू.ली. 448)

(5) भटोबास आणि इंद्रभट यांना देवगिरीला पाठविणे. (पू.ली. 450)

(6) प्रकाशदेवा नीर्गमनी सीके उपहास, (पू.ली. 451)

(7) वर्मस्पर्श नरक होतात, याविषयी लखुबाइसांना निरूपण करणे. (पू.ली. 452)

(8) भटोबास आणि लखुबाइसा भांडणप्रसंगी भटोबासांना रागविणे. (पू.ली. 453)

(9) दाइंबाप्रति पाटनीयां सारिखा वाटनीयां कथन. (पू.ली. 454)

(10) इंद्रभटांना पविते देणे. (पू.ली. 455)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. मादने स्थान :

हे स्थान देवळाच्या सभामंडपात आहे. (स्था.पो.)


3. आसन स्थान :

हे स्थान करंजखेड गावाच्या पूर्वेस दोन फर्लाग अंतरावर देवमळी शेताजवळ नेवपूर रस्त्याच्या उत्तर बाजूला पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे वडाचे झाड होते. त्या झाडाखालील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू चारनेरहून आल्यावर प्रथम त्यांना येथील वडाच्या झाडाखाली आसन झाले. मग त्यांनी येथून बाइसांना गावामध्ये बिहाड पाहण्यासाठी पाठविले. (पू.ली. 438, स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


4. विहरण स्थान :

हे स्थान करंजखेड गावाच्या उत्तरेस एक फलांग अंतरावर पूर्णा नदीच्या पलीकडे रामेश्वर देवळाच्या ईशान्येस पूर्वाभिमुख देवळात शेतात आहे.

लीळा : पाठकत्यागु परिहासु (पू.ली. 449, स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

(1) आरोगणा स्थान.

(2) आबाइसा मयोर लेखणी म्हणणे स्थान.

(3) आवाराच्या दारवठ्यातील भटा भेटी स्थान.

(4) परिश्रय स्थान.

(5) प्रकाशदेवाच्या गुंफेतील आसन स्थान.

(6) नदीच्या वाळवंटातील प्रकाशदेवा भेटी स्थान.

(7) रामतीर्थांच्या देवळाच्या चौकातील आसन स्थान.

(8) वानरा नामकरण स्थान.

(9) रामनाथाच्या ईशान्येच्या विहरण स्थानाच्या पलीकडचे परिश्रय स्थान.

(10) भटा होडे अदृश्य होणे स्थान.

(11) सेंदुराळा विहरण स्थान.

(12) पेमलदरा विहरण स्थान.


करंजखेडची एकूण स्थाने : 16


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: