Karadgaon (करडगाव)

करडगाव, ता. घनसावंगी, जि. जालना


येथील 1 स्थान - हे स्थान करडगांव गावाच्या पश्चिमेकडे गावालगतच दुधाना नदीच्या काठावरील मंदीरात आहे.


जाण्याचा मार्ग :

जालना-अंबड सडकेवरील लालवाडी फाटा पेट्रोल पंपापासून (राणीउंचेगाव,पानेवाडी,सरपगव्हाण,येवला, रांजणी मार्गे) करडगावला जाता येते. जालना-मंठा सडकेवरील विरेगाव फाट्याहन (कौठा,रांजणी मार्गे) करडगावला जाता येते. करडगाव, मनमाड-हैदराबाद लोहमार्गावरील रांजणी रेल्वेस्थानकापासून पश्चिमेस 5 कि.मी. आहे. जालना, व परतूरमधील रांजणी हे रेल्वेस्थानक होय. करडगाव, येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान करडगावच्या पश्चिम विभागी दुधना नदीच्या पूर्व काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात गाढेसावरगावहून करडगावला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली, 523, ख.प्र. स्था.पो.को.शा.प्रत)

दुसऱ्या दिवशी ते येथून अहिरमलला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


करडगावचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –
  • Karadgaon : करडगावी वस्ति :।।:
  • करडगावी वस्ति :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. येथील लीळा नाही, फक्त लीळेची आदीच आहे…स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि(जालना)ला आले. स्वामींचे हिवरळि(जालना)ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्यास(अवस्थान) होते. पुढे स्वामीं रावसगावकडे निघाले तेव्हा येथे वसतिस थांबले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: