Kannad (कन्नड)

कन्नड, ता. कन्नड, जि. औरंगाबाद


कन्नड येथील 3 स्थाने एकाच मंदीरात आहेत - कन्नड शहराच्या दक्षिणेकडे 'शितलामाता मंदीर' नावाने प्रसिद्ध असलेल्या भागात बोळीतून जावे लागते. येथे बाबाजींचा आश्रम आहे.


जाण्याचा मार्ग :

कन्नड हे गाव, औरंगाबाद धुळे राज्यमार्गावर औरंगाबादहून वायव्येस 57 कि.मी. आहे व चाळीसगावहून आग्नेयेस 33 कि.मी. आहे. (1) धुळे ते कन्नड 90कि.मी. (2) वेरूळ ते कन्नड 30कि.मी. 3) करंजखेड ते कन्नड 28 कि.मी. कन्नड येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

Google Map Location Link 👈 (किल्क करा) (खालील सर्व स्थान)

1. वसती स्थान :

हे स्थान कन्नड गावाच्या दक्षिण विभागी शीतलामाता गल्लीमध्ये दक्षिणाभिमुख देवळात आहे. मुख्य प्रवेशद्वार उत्तराभिमुख आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे ब्राह्मणाचे घर होते.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात हातनूरहून कन्नडला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. 378, स्था.पो.)


2. आरोगणा स्थान :

हे स्थान वसती स्थानापासून पूर्वेस 8 फूट 7 इंच अंतरावर आहे.

लीळा : सर्वज्ञांनी येथे ब्राह्मणाच्या पूजा आरोगणाचा स्वीकार केला. (पू.ली.378)


3. द्राक्षाचा घड स्पर्शणे स्थान :

हे स्थान वसतीस्थानापासून पूर्वेस 24 फूट अंतरावर पुढील सभामंडपात पूर्व भिंतीच्या कमानीत आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू रात्री आरोगणा झाल्यावर अंगणामध्ये शतपावली करीत होते. अंगणात द्राक्षाचा मांडव होता. द्राक्षाचे घड लोंबत होते. शतपावली करीत असताना येथे येऊन त्यांनी द्राक्षाच्या घडाला स्पर्श केला. (पू.ली. 175 तु.प्र.स्था.पो.)


अनुपलब्ध स्थान :

(1) गावाच्या दक्षिणेचे मळ्यातील आसन स्थान.


कन्नडची एकूण स्थाने : 4


  • Purvardha Charitra Lila –
  • Kannad : कनरडे ब्राम्हणागृहीं वसतिः द्राक्षीघडु स्पर्शणें :॥:
  • गोसावी कनरडेंसि बीजें केलेंः तेथ मळां आसन जालेंः तेथचि दुपाहाराचा पूजावसर जालाः आरोगणाः गुळुळाः विडा जालाः पहुडः उपहुड जालाः गोसावी आसनीं उपविष्ठ असतिः तवं ब्राम्हणु एकु तेथ आलाः श्रीचरणा लागलाः गोसावीयांतें विनविलेः जी जी गोसावी माझेया आवारासि बीजीं करावे जीः गोसावी विनती स्वीकरिलीः तयाचेया घरां गेलेः तेही आसन रचिलेः तेथ उपविष्ठ जालें अर्घपाद्य करौनि गंधाक्षत केलेः मग ओलणी ओळगविलीः मर्दनामादनेः पूजा जालीः भक्तिजानांसहित आरोगणा जाली: गुळुळा जाला: रात्री चांदने पडिलें होतेः गोसावी आंगीटोपरें करौनि आंगणी उभे राहिलेः दारीं द्राक्षाचां मांडौ होताः तयासि द्राक्षाचे घड लोंबत होतेः रात्री वेधे करितां गोसावींचियें श्रीमुकुटी द्राक्षघडु लागलाः गोसावी तो द्राक्षघडु श्रीकरें स्पर्शिलाः मग तेहीं ताटीं घालौनि एक घदु आनिलाः तो गोसावीयांसि ओळगविलाः गोसावी काहीं आरोगिलीं येरे भक्तिजनासि दीधलींः मग तेथ वसति जाली :॥:
  • (टिप – येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे १५ दिवस वास्त्व्य(अवस्थान) होते. त्यानंतर स्वामी हातनुरवरुण कन्नडला आले व कनाशीकडे निघाले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: