Kanlad (कानलाड)

कानळस, ता.निफाड, जि. नाशिक


येथे 2 स्थाने आहेत - कानळस गावाच्या नैऋत्येकडे गावाच्या जवळच गोदावरी नदीच्या काठावर आहे. दुसरे स्थान मंदीराच्या मागे काही अंतरावर आहे.


जाण्याचा मार्ग :

कानळस हे गाव, विंचूर-सावळेविहीर मार्गावरील कानळस फाट्यापासून पश्चिमेस 3 कि.मी. आहे. विंचूर ते कानळस फाटा 20 कि.मी. कोळपेवाडी ते कानळस फाटा 13 कि.मी. नांदूर ते कानळस फाटा (विंचूर मार्गे) 40 कि.मी. नांदूरहून आग्नेयेस कानळस (सारोळाथडी, खेडलेजुंगे, कोळगाव मार्गे) 16 कि.मी. आहे, कानळस फाट्यापर्यंत जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान कानळस गावाच्या नैर्ऋत्येस गावा लगतच गोदावरी नदीच्या उत्तर काठावर उत्तराभिमख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे एल्हणेश्वराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात नांदूरहून कानळसला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली.271,स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. आसन स्थान :

हे स्थान वसती स्थान देवळापासून नैर्ऋत्येस 83 फूट अंतरावर पूर्वाभिमूख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे अग्नीष्टिका होती.

लीळा : दुसऱ्या दिवशी प्रात:काळी सर्वज्ञ एल्हणेश्वराच्या देवळातून येथे आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. बाइसांनी सकाळचा पूजावसर केला. मग ते येथून चासला गेले. (पू. ली. 276, ख. प्र., स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


निर्देशरहित स्थान :

1. देवळाबाहेरील पश्चिम भिंती लगतचे स्थान.


2. देवळाच्या पाठीमागचे पायऱ्याचे स्थान.


अनुपलब्ध स्थान :

1. देवळाच्या पश्चिमेचे परिचय स्थान.


कानळसची एकूण स्थाने : 3


  • Purvardha Charitra Lila – 271
  • Kanalas : कांदळदीं लिंगाचा देउळी वसति :॥:
  • गोसावी कांदळदींसि बीजे केलेः बाइसीं गोसावीयांचा ठाइं आपुला प्रतीदिनीचा विधी केलाः मग तेथ एल्हनेश्वरीं वसति जालीः उदयाची गोसावि अग्निष्टिकेसि बीजे केलेः तेथ आसनः बाइसीं गोसावीयांसी उदयाचा पूजावसरु केलाः मग गोसावी तेथौनी बीजे केले :॥:
  • (.. येथे हे पहील्यांदा येने. स्वामी नासिक-अडगाव-सुकिना-नांदौरवरुण आले व सुरेगांवकडे निघाले.)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: