Kanadgaon (कानडगाव)

कानडगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद


येथील 1 स्थान - हे स्थान जुन्या ओसाड कानडगांवात स्त्री-पूरुषाच्या मंदीरात आहे. मंदीरातील चौक म्हणजे हे स्थान होय.


जाण्याचा मार्ग :

जुन्या नेवरगावहून पूर्वेस जुने कानडगाव 5 कि.मी. आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान जुन्या ओसाड कानडगावामध्ये उत्तराभिमुख त्रीपुरुषाच्या देवळात आहे. चौक नमस्कारी आहे. देवळात प्रवेश केल्यावर उजव्या हाताला (देवळाच्या वायव्य कोपऱ्यात) ओटा आहे. ती स्थानाची जागा नाही.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात भालगावहून कानडगावला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. 386 ख. प्र. स्था. पो. उ. प्र.) त्यानंतर ते येथून बगडीला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

(1) सिद्धनाथी गुंफे अवस्थान स्थान.

(2) सिद्धनाथी आसन स्थान.

(3) सिद्धनाथाच्या अंगणी मादने स्थान.

(4) गंगेतील खडकावरील आसन स्थान.

(5) सिद्धनाथाच्या देवळाच्या उत्तरेचे परिश्रय स्थान.

(6) भैरवी पूजा आरोगणा स्थान


कानडगावची एकूण स्थाने : 7


  • Purvardha Charitra Lila –
  • Kanadgaon : त्रिपुरुखी वसति :॥:
  • चौथा दिवसी गोसावी त्रिपुरुखी बीजें केलेंः विळीचाचा पूजावसर होयेः आरोगणाः जाली: गुळुळा जाला: विडा जाला: त्रिपुरुखी वसति जाली :॥:
  • (..येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे भिंगार येथे १५ दिवस वास्तव्य होते. त्यानंतर स्वामी पिंपळगाव-पापविनासिनि-सोनैये-भालगाववरुण येथे आले…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Kanadgaon : कानडगावीं सिद्धनाथीं अवस्थान :॥:
  • गोसावी कानडगावा बीजें केलेंः गंगा उतरौनि नृसिंहासि बीजें केलेंः हरीन अवलोकुनि गोसवी तेथचि हरीनाचि कथा निरुपिलीः मग तेथची विहरण जालेः तियेची पाळीसि सिद्धनाथाचे देउळ पुर्वाभिमुखः सिद्धनाथीं अवस्थान जालेः दिस तीनः जगतिचा दारवंठा पुर्वाभिमुखः रिगतां उजविया हाता गुंफा दक्षिनाभिमुख सिद्धनाथीं दोपाहारचा पूजावसर होयेः भैरवीं विळीचाचा पूजावसर होयेः आरोगणा होयेः व्याळी होयेः पहूड उपहूड होयेः गंगेमाजि लिंगाचीये देउळीये विहरण होयेः घाटी विहरण होयेः हरिनेश्वरी विहरण होये :॥:
  • (..येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे भिंगार येथे १५ दिवस वास्तव्य होते. त्यानंतर स्वामी पिंपळगाव-पापविनासिनि-सोनैये-भालगाववरुण येथे आले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: