Kakda (काकडा)

काकडा, ता. अचलपूर जि. अमरावती


काकडा येथील 2 स्थाने एकाच ठीकाणी आहेत - येथील 2 स्थाने गांवाच्या उत्तरेकडे 1 कि.मी.अंतरावर रस्त्याच्या बाजुलाच मंदीर आहे.


जाण्याचा मार्ग :

वडनेरहुन किंचित ईशान्येस काकडा 3 कि.मी. आहे. परतवाडा ते काकडा (पथ्रोट, सिंधी मार्गे) 35 कि. मी. काकडा येथे जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. असदपूर ते काकडा 9 कि.मी.


स्थानाची माहिती :

1. पोतकी खेळ करणे स्थान :

हे स्थान काकडा गावाच्या उत्तरेस एक कि. मी. अंतरावर सडकेच्या पश्चिमेस पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : पूर्वी या ठिकाणी तळे होते. खुबटा, सिंधी, बोपजय, आंबजय, वडनेर, काकडा या गावचे गोपाळ, गाई पाणी पाजण्यासाठी येथे घेऊन येत असत. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू एकांकात अचलपूरहन येथे आले. त्यांनी आपल्या जवळचे वस्त्र फाडून त्याचे लहान लहान तुकडे तयार केले. गोपाळांना चिंचोक्याच्या आसु व दामोटीचे दाम करण्यास सांगितले. मग सर्वज्ञांनी गोपाळांच्या सोबत लुटुपुटीचा दुकानदारीचा खेळ केला.(पू.ली.78,स्था.पो.)


2. आरोगणा स्थान :

हे स्थान पोतकी खेळ करणे स्थानाच्या दक्षिणेस पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा: गोपाळांच्या सोबत खेळ केल्यावर गोपाळांनी सर्वज्ञांना येथे आरोगणा दिली. (पू. ली. 79) त्यांनतर सर्वज्ञ येथून वडनेरला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा) वरील दोनही स्थान.


काकड्याची एकूण स्थाने : 2


  • Purvardha Charitra Lila – 78,79
  • Kakada : वडनेरां/वडनेरमार्गी कांटीवनी पोतकी खेळु :।।:
  • मग गोसावी दोनि हात सुडा श्रीमुकुटीं राखिलाः दोनि हात कटीप्रदेशी राखिलाः आणि वडनेर मार्गी कांटीवनी दुटी फाडुनि पोतुके केलीः सुडे केलें: मग काकडेयापासी कुकडाळे तळेः तेथ चै गांवीचे गोपाळः गाई पाणीयासि घेउनि आले होतेः गोसावी तेथ बिजें केलें: गोपाळ बैसले असतिः गोसावियांसि कांटी एकी तळी आसन जालें: तयातें म्हणितलें: ‘‘गोपाळ हो याः हें तुमसीं खेळैलः’’ तेही म्हणितलें: ‘‘आमसीं काइ खेळाल जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ना हें दुसी होइलः तुम्ही ग्राहिक होआः’’ तिहीं म्हणितलें: ‘‘जी जीः तरि काइसेनि घेवो? जीः आम्हां द्रव्य नाहीं:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘चिचोरियाचीयी आसू कराः बाबुळीचिया सेंगाचेया दामुणेयांचे दाम कराः’’ तिहीं मानिलें: मग तें चिचोरे आणू गेलेः मग तयाचीये जाडीचा तडवां केलाः दुसियांचिया परि दांडी घातलीं: तयाचीये डांगेची आडदांडी केलीः म्हणौनि श्रीकराचा अनुकार दाखविलाः गोसावी दुसी जालें: घाडिया घातलियाः पसारा मांडिलाः आणि तें चिंचोके घेऊनि आलेः मग दामुणेयाचे दाम केलेः चिंचोकेयाचिया आसू केलियाः तिहीं म्हणितलें: ‘‘जी जीः आम्हां लुगडी देयाः’’ गोसावी ऐसा श्रीकरू दाखवीतिः घडीया काढीतिः दाखवीतिः म्हणतीः ‘‘हें वस्त्र कैसें: पालवीं पाहाः प्रमाण पाहाः’’ मग गोसावी हातासन दाखवीतिः गोसावी बहुत सांघतिः गोपाळ तोकडेया मागतिः तिहीं आसू दिधलीयाः गोसावी दाम सारीतिः म्हणतिः ‘‘हे निवडकः हें फुटकः ये वाटावो लाभेः हें सोपः हें तुकमढः हें कटकः हें खरीः हें काटकः हें दाम घेयाः हें दाढेः हें कुडेः हें दुराइः’’ मग तें आणिक दाम देतिः तें गोसावी मांडियखाली घालीतिः यापरि तयांसि पोतुकें दिधलीं: ऐसें चिंचोराचे दामुणेयाचे पुंजे जालें: मग गोपाळातें म्हणितलें: ‘‘आतां तुम्हीं दुसी होआः हें ग्राहिक होइलः’’ मग गोसावी ग्राहिक जालें: तें दुसी जालें: गोसावी अवघेया वस्त्रोचां घडिया घेतलियाः मग तयासि आसू दाम मागुतिया दिधलीयाः ऐसा खेळ केलाः मग उरली वस्त्रें फाडुनि गोसावी चिंधिया केलियाः दोरीया वळिलियाः आणि गोफण केलीः तेंही कांटिया सोंकरिलियाः बाबुळे एकीवरि उभे ठाकलेः मग गोसावी भेलवंडिया वस्त्रे गुंडीति आणि गोफणीतिः ‘‘फू भोरडियेः झा भोरडियेः भोरडियाः तुइ भोरडियेःफुर भोरडियेः’’ म्हणौनि कांटीवन सोकरिलें: ऐसिया अवेघा चिरटिया सोंडिलियाः मग खाली उतरलेः गोपाळी गोसावियांतें आरोगणेचे विनविलें: ‘‘जी जीः गोसावी आरोगणा करावीः मग जावेः’’ गोसावी विनवणी स्वीकरिलीः मग गोपाळीं मोटा सोडिलीयाः बरवा बरवा पदार्थ निवडीलाः तो ओळगवीलाः आंबिली भाताचा काला केलाः तेथचि कुकडाळे तळेयाचिये पाळीवरि आरोगणा दिधलीः मग बिजें केलें: मग विळीचां वेळीं गोपाळ संतोखातें पावौनि आपुलालेया गावा गेलेः गोसावी वडनेरेया बिजें केलें :।।:



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: