Kajala (काजळा)

काजळा, ता. बदनापुर, जि. जालना


येथील 1 स्थान - हे स्थान काजाळा गावाच्या उत्तरेकडे दीड कि.मी. अंतरावर तलावाच्या काठावरील मंदीरात आहे.


जाण्याचा मार्ग :

काजळा हे गाव, जालना-अंबड मार्गावरील काजळा फाट्यापासून पश्चिमेस 4 कि.मी. आहे. जालना ते काजळा फाटा 12 कि.मी. अंबड ते काजळा फाटा 17 कि.मी. काजळा येथे जाण्यासाठी जालन्याहून थेट एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. जालन्याहून दक्षिणेस काजळा पायमार्गे (कुंभेफळ मार्गे) 11 कि.मी. आहे.


स्थानाची माहिती :

1. विहरण तथा वसती स्थान :

हे स्थान काजळा गावाच्या उत्तरेस चार फर्लाग अंतरावर तळ्याच्या ईशान्य काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे काजळेश्वराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू जालन्याहून येथे विहरणासाठी आले होते. आधल्या दिवशी तिकवनायकांनी सर्वज्ञांना उपहाराची विनंती केली होती. त्यानुसार ते उपहार घेऊन जालन्याला राजमढामध्ये आले. तेव्हा त्यांना समजले की, सर्वज्ञ काजळ्याला गेलेले आहेत. मग ते उपहार घेऊन येथे आले. नंतर सर्वज्ञांना दुपारचा पूजावसर झाला. भक्तजनांसहित आरोगणा झाली. त्यानंतर त्यांनी विश्रांती घेतली. सायंकाळच्या वेळेस तिकवनायक परत गेले. सर्वज्ञांनी भक्तजनांसहित येथेच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी ते जालन्याला परत गेले. (पू.ली. 476, स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1. देवळाच्या वायव्येचे परिश्रय स्थान.


काजळ्याची एकूण स्थाने : 2


  • Purvardha Charitra Lila – 476
  • Kajala : कांचराळां वस्तिः तिकवनायकाचां उपहारू स्वीकारू :।।:
  • एकु दीं तिकवनायकें गोसावियांतें उपहारालागी विनविलें: गोसावी विनती स्विकरिलीः आणि उदेयाचां पूजावसर जालेंयानंतरें हिवरळीये नैऋत्येदक्षिणें आश्राइत करंजाळें गव्हाणः क्रोशां तींचेनि मानें: तया उत्तरे वाव्यें आश्राइत तळें: तया नांव काचराळें: तेचि तपोवनः तेथ विहरणा बीजें केलें: मग तिकवनायक उपहार घेउनि मढासि आलेः सरिसा धाकुटा पुत्र होताः भक्तिजनातें पुसिलें: ‘‘गोसावी कव्हणीकडें बिजें केलें?’’ तिहीं म्हणितलें: ‘‘गोसावी काचराळेया बिजें केलें:’’ तें अनसारिखे जालें आणि म्हणितलें: ‘‘महात्मेयांतें काइ लटिकेंचि बोलिजे?’’ तैसेचि उपहारेंसीं काचराळेयासि आलेः तवं गोसावियांसि तपोवनीचां देउळीं चौकीं आसन असेः गोसावियांतें देखिलें आणि म्हणितलें: ‘‘महात्मेयांतें काइ लटिकेंचि बोलिजे? महात्मेयातें काइ लटिके बोलों ये?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘या याः नायकोः काइ श्रमलेति?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः आलां: अवघा श्रमु गेला जीः थोर श्रमला होता जीः’’ गोसावी तयांचीये डोइयेची पांटी उतरविलीः मग गोसावियांसि तेथचि चौकीं पूजावसर जालाः गोसावियांसि बाइसीं ताट केलें: आरोगणा जालीः गोसावियांचीये पांती भक्तिजनासहित जेवणें जालीं: गोसावियांसि गुळळा जालाः विडा जालाः पहूड जालाः उपहूड जालाः मग विळीचां वेळीं तिकवनायक गावांसि निगालेः ‘‘जी जीः तुम्हीं याल?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हे पाहे येइलः’’ मग गोसावियांसि तेथ तियेची देउळीं वस्ति जालीः उदेयांचि हिंवरळीये बिजें केलें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि(जालना)ला आले. स्वामींची हिवरळि(जालना)ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य(अवस्थान) झाले. काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. तेव्हाची ही लीळा…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: