Kadethan Br. (कडेठाण बु.)

कडेठाण बु., ता. पैठण, जि. औरंगाबाद


येथील 1 स्थान - हे स्थान कडेठान(बु) गावाच्या पश्चिमेकडे गावालगतच महालक्ष्मी मंदीर आहे, या मंदीराचा चौक म्हणजे स्थान होय. (नमस्कारी चौकाभोवती आडासारखी गोल 2 फूट उंचीची भिंत बांधली आहे त्यामुळे स्थान ओळखता येते.)


जाण्याचा मार्ग :

पैठणहून ईशान्येस कडेठाण (ढोरकीन, बालानगर मार्गे) 40 कि.मी. आहे. औरंगाबाद अडूळ, रजापूर मार्गे कडेठाणला जाता येते. तसेच पैठणपाचोड मार्गावरील हर्षी फाट्यावर उतरून कडेठाणला पायी जाता येते. हर्षी फाट्याहून उत्तरेस कडेठाण (हर्षी, रांजणगाव मार्गे) 7 कि.मी. आहे. कडेठाणला जाण्यासाठी पैठण व औरंगाबाद येथून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान कडेठाण गावाच्या वायव्य विभागी महालक्ष्मीच्या पूर्वाभिमुख देवळापुढे चौकात आहे. चौक नमस्कारी आहे. नमस्कारी चौकाभोवती आडासारखी गोल 2 फूट उंचीची भिंत बांधली आहे. उत्तर बाजूने नमस्कार करण्यास जागा आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पैठणहून रिद्धपरला जाताना रहाटगावहून कडेठाणला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (प.ली.141.स्था.पो.) दुसऱ्या दिवशी सकाळी ते येथून राजूरला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1) देवळाच्या उत्तरेचे परिश्रय स्थान.

2) रहाटगाव ते कडेठाण मार्गीचे आसन स्थान.


कडेठाण चे स्थान : 3


  • Purvardha Charitra Lila –
  • Kadethan : कडेठानीं महालक्ष्मिये वसति :॥:
  • कडेठान गावां आग्नेय कोनीं मळाः तेथ वृक्षा एका तळीं गोसावीयांसिं आसन जालेः तेथचि दुपाहाराची आरोगणा जाली : पहूड जालाः उपहूड होउनी मग गोसावी गावांउत्तरें वायव्यें पूर्वाभिमुख महालक्ष्मिचेंया देउळा बीजे केले : बाहिरीली मंडपीं चौकीं गोसावीयांसिं आसन जालेः मग विळीचांचा पूजावसर जालाः आरोगणा जाली : वसति जाली :॥:



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: