Jogaladevi (जोगलादेवी)

जोगलादेवी, ता. घनसावंगी, जि. जालना


येथील 1 स्थाने - हे स्थान जोगलादेवी गावाजवळच पश्चिमेकडे आहे.


जाण्याचा मार्ग :

जोगलादेवी हे गाव, तीर्थपुरी-साडेगाव मार्गावरील जोगलादेवी फाट्यापासून 3 कि. मी. आहे. तीर्थपुरी ते जोगलादेवी फाटा 4 कि.मी.
साडेगाव ते जोगलादेवी फाटा 4 कि.मी. साडेगावहून ईशान्येस जोगलादेवी पायमार्गे 3 कि.मी. आहे.


स्थानाची माहिती :

1. प्रात: पूजा आरोगणा स्थान :

हे स्थान जोगलादेवी गावाच्या नैर्ऋत्येस गावालगतच पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे देवताभुवन होते.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात कार्तिक पौर्णिमेच्या पाडव्या दिवशी सकाळच्या वेळेस रामसगावहुन जोगलादेवीला आले. येथे सकाळचा पूजावसर झाला. आरोगणा झाली. गुळळा, विडा झाला. मग सर्वज्ञांनी विश्रांती घेतली. दुपारच्या वेळेस सर्वज्ञ येथून साडेगावला गेले. (पू. ली. 504, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


जोगलादेवीचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila – 504
  • Jogaladevi : पाडीवां प्रयाण :।।: / पाडीवां प्रयाणी देवताभूवनी प्रातःपूजाः आरोगणा :।।:
  • गोसावी कार्तिकी पुनवेचा पाडीवेयाचां दिसीं थोरी पाहाटें तेथौनि प्रयाण केलें: बाइसें मुख्य अवघीं भक्तिजनें सवें निगालीः देवताभूवनी बिजें केलें: तेथ आसन जालें: उदेयाची पूजा जालीः आरोगणा जालीः गुळळाः विडाः पहूड जाला :।।:
  • (टिप – स्वामींचे रावसगाव येथे हे दुसर्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींचे हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्यास (अवस्थान) होते. पुढे ढाकेफळ येथे वसतिस थांबुन स्वामीं रावसगावला आले. स्वामीं रामसगावहुन जोगलादेवीला आले तेव्हाची ही लीळा…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: