Jamgaon (जामगाव)

जामगाव, ता. पारनेर, जि. अहमदनगर


हे स्थान जामगांव गावाच्या वायव्येकडे ओढ्या जवळ सिंगेश्वराच्या (महादेवाच्या)  मंदीर आहे. या मंदीरातील सभामंडप/चौक म्हणजे 1 स्थान होय.


जाण्याचा मार्ग :

जामगाव, अहमदनगरहून नैर्ऋत्येस 27 कि. मी. आहे व लोणीहून उत्तरेस 6 कि. मी. आहे. पारनेर ते जामगाव 11 कि. मी. आहे. जामगावला जाण्यासाठी अहमदनगर लोणी व पारनेर येथून एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान जामगावच्या वायव्येस गावालगतच ओढ्याच्या पश्चिम काठावर सिंगेश्वराच्या (महादेवाच्या) पूर्वाभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी असून त्यावर शहाबादी फरशी बसविलेली आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात लोणीहून जामगावला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (उ. ली. 289, स्था, पो.) त्यानंतर ते येथून नागापूरला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1. देवळाच्या उत्तरेचे परिश्रय स्थान.


जामगावची एकूण स्थाने :2


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: