Jamgaon (जामगाव)

जामगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद


येथील 1 स्थान - हे स्थान जुन्या ओसाड जामगांव गांवाच्या पश्चिमेकडे गढीवर आहे. कारखान्यापासून हे स्थान 2 कि.मी. अंतरावरच आहे.


जाण्याचा मार्ग :

जुने जामगाव, गंगापूर साखर कारखान्यापासून दक्षिणेस 2 कि.मी. आहे. गंगापूर ते गंगापूर साखर कारखाना 5 कि.मी. आहे. कारखान्यापर्यंत जाण्यासाठी गंगापूरहून एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. जुन्या बगडीहून जुने जामगाव पायमार्गे (विटभट्ट्या, पाण्याच्या लिफ्ट मार्गे) 3 कि.मी., आहे. जुन्या बगडीहून जुने जामगाव (नवी बगडी, गंगापूर साखर कारखाना मार्गे) 7 कि.मी. आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान गंगापूर साखर कारखान्याच्या दक्षिणेस 2 कि.मी. अंतरावर जुन्या ओसाड जामगावच्या पश्चिम विभागी गढीवर पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे सिंगेश्वराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पहिल्या वेळेस डोंबेग्रामहून जामगावला आले. त्यावेळी त्यांचे येथे एक रात्र वास्तव्य होते, (पू.ली. 302 ख. प्र.) व दुसऱ्या वेळेस बगडीहून जामगावला आले. त्यावेळीही त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. 388 ख.प्र.) आणि उत्तरार्ध काळात गावजोगेश्वरीहून जामगावला आले. त्यावेळीही त्यांचे येथे एकच रात्र वास्तव्य होते. (उ. ली. 244 ख. प्र., स्था. पो.)

पूर्वार्धातील पहिल्या वेळेच्या एक दिवसाच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ येथून देवळाण्याला गेले. व दुसऱ्या वेळेच्या एक दिवसाच्या वास्तव्यानंतर ते येथून गंगापूरला गेले. आणि उत्तरार्धातील एक दिवसाच्या वास्तव्यानंतर ते येथून बगडीला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


जामगावचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –
  • Jamgaon : जांबुगावी सिंगेश्वरीं वसति :॥:
  • (.. येथील लीळा नाही, फक्त लीळेची आदीच आहे.. येथे हे पहील्यांदा येने… स्वामी यावेळी डोमेग्राम-घोगरगाव-बागडीवरूण आले व म्हाळापुरकडे निघाले…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jamgaon : जांबगावीं सिंगेश्वरी वसति :॥:
  • (..येथील लीळा नाही, फक्त लीळेची आदीच आहे :॥: येथे स्वामी दुसर्यांदा आले. स्वामी यावेळी . स्वामीचे भिंगार येथे १५ दिवस वास्तव्य होते. त्यानंतर स्वामी पिंपळगाव-पापविनासिनि-सोनैये-भालगाव-भालगाव-बगडीवरुण येथे आले…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jamgaon : जांबुगावीं वस्ति :।।: (ता. गंगापूर)
  • (टिप – पूर्वार्ध परिभ्रनण काळातही जांबुगाव ता. गंगापूर येथे आलेले होते. उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामिंची येथे येन्याची स्वामींची ही दुसरी वेळ होइल…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: