Jalna Sthan (जालना स्थान)

जालना, ता. जालना, जि. जालना

जालना येथील 5 स्थाने 3 ठीकानी आहेत -
1. राजमढी अवस्थान - येथील 2 स्थाने - जालना शहराच्या मधोमध 'मस्तगढ' नावाने प्रसिद्ध असलेल्या भव्य मंदीरात आहेत. याला दत्त मंदीर म्हणुन ओळखतात. येथे आश्रम सुद्धा आहे.
2. वनदेव आसनस्थान - येथील 2 स्थाने - जालना शहरातील सत्र न्यायालयाच्या पाठीमागे असलेल्या मंदीरात आहेत. येथेही आश्रम आहे. (हे स्थान दत्त मंदीर पासून 2 कि.मी.अंतरावर आहे.)
3. नागाविहीर आसनस्थान - येथील 1 स्थान - जुन्या जालना शहरातील संजयनगर नावाने प्रसिद्ध असलेल्या भागात नागाविहीर नावाचे अन्य ठीकाण आहे. नागाविहीरीच्या काठी असलेल्या सरईत आहे/आहेत, चंदन लावलेले असते त्यामुळे स्थान ओळखता येते. (हे स्थान दत्त मंदीर पासून 2 कि.मी.अंतरावर आहे, तर वनदेव पासूनही 2 ककि.मी.अंतरावर आहे.)

जाण्याचा मार्ग :

जालना हे शहर, मलकापूर-सोलापूर राज्यमार्गावर आहे; औरंगाबाद ते जालना 63 कि.मी; सिल्लोड ते जालना ६५ कि.मी; बुलढाणा ते जालना 109 कि.मी; बीड ते जालना 103 कि.मी. शहागड ते जालना 59 कि.मी; जालना ते खनेपुरी (खरपुडी मार्गे) 11 कि.मी. आहे; मनमाड-हैदराबाद लोहमार्गावरील जालना हे रेल्वेस्थानक आहे. जालना येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाची माहिती :

1. राजमढी वसती तथा अवस्थान स्थान :

हे स्थान जालना शहरातील मस्तगढ विभागात पश्चिमाभिमुख देवळात आहे. मुख्य प्रवेशद्वार दक्षिणाभिमुख आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे ‘नरसिंह’ मढ होता. त्या मढातील हे स्थान होय. आज हे देऊळ ‘श्रीदत्त मंदिर’ या नावाने प्रख्यात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात दाभाडीहून जालन्याला आले. प्रथम त्यांचा येथे एक रात्र मुक्काम झाला. (पू.ली. 458, स्था,पो) दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वज्ञ येथून वनदेवाकडे गेले. त्यांचा ग्रामांतर करण्याचा विचार होता; पण तेथे आबाइसा व उमाइसा यांची भेट झाली. मग सर्वज्ञ म्हणाले, “अभ्यागत आलेले आहेत, आता आम्ही ग्रामांतर करीत नाही.” मग सर्वज्ञ पुन्हा येथे आले. त्यांचे या ठिकाणी 2 महिने वास्तव्य होते. (पू.ली. 459, स्था.पो.)

येथील इतर लीळा : (1) माहादाइसाच्या उपहाराचा स्वीकार करणे. (पू.ली.464)

(2) उमाइसाच्या उपहाराचा स्वीकार करणे. (पू.ली.466)

(3) माहादाइसाविवादे तीकवनायका जैत. (पू.ली. 470)

(4) भटविवादे तीकवनायका जैत. (पू.ली. 471)

(5) लखुदेवबांच्या उपहाराचा व वस्त्रांचा स्वीकार करणे. (पू.ली. 473)

(6) परमेश्वराच्या संबंधित वस्तू वंदनीय का असतात? याविषयी भटोबासांना निरूपण करणे. (पू.ली. 474)

(7) माहादाइसाला परिसाचे दोन दृष्टान्त निरूपणे. (पू.ली. 477)

(8) भटाकरवी क्षौर करवणे. (पू.ली. 479)

(9) माहादाइसाच्या विनंतीवरून भक्तजनांसहित दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करणे. (पू.ली. 480)

(10) भाऊबीजेच्या दिवशी भटोबास, माहादाइसे, हंसराज या तिघांना रिद्धपूरला पाठविणे. (पू.ली. 481)

(11) माहादाइसाच्या वस्त्राची अंगी भटोबासांना रिद्धपूरला जाताना देणे. (पू.ली. 482)

(12) एल्हाइ भाऊबीज करणे. (पू.ली. 483)

अवस्थान स्थानाच्या नैर्ऋत्येचे स्थान निर्देशरहित आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा) (क्र. 1 व क्र 2)

2. मादने स्थान :

हे स्थान अवस्थान स्थानाच्या पूर्वेस पश्चिमाभिमुख पडवीत आहे. (स्था.पो.)

3. वनदेवाच्या चौकातील आसन स्थान :

हे स्थान महानुभाव श्रीदत्त मंदिरापासून 1 कि.मी. अंतरावर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या पाठीमागे पश्चिमाभिमुख देवळात आहे.

लीळा : राजमढामध्ये प्रथम एक रात्र मुक्काम झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे आले. या ठिकाणी त्यांना आसन झाले. (पू.ली. 459, स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा) (क्र. 3 व क्र 4)

4. पूजा आरोगणा स्थान :

हे स्थान देवळाच्या ईशान्यविभागी आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे लिंगाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभुंना येथे पूजा व आरोगणा झाली. मग त्यांनी येथेच विश्रांती घेतली. सायंकाळच्या वेळेस ते येथून राजमढाकडे गेले. (पू.ली. 459, स्था.पो.)

5. नागाविहीर, आसन स्थान :

हे स्थान जुन्या जालना शहरातील संजयनगरजवळ नागाविहिरीच्या उत्तर काठावर आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आश्विन शुद्ध नवमीच्या दिवशी येथे विजनाकरिता आले होते. त्या वेळी सर्वज्ञांना येथे आसन झाले. या विहिरीतून देवता आल्या. त्यांनी सर्वज्ञांच्या श्रीचरणांवर मस्तक ठेवून नमस्कार केला. डोक्याच्या केसांनी श्रीचरण झाडले. मग त्या सर्वज्ञांची आज्ञा घेऊन नगरामध्ये गेल्या. दुपारी तिकवनायकांनी उपहार आणला. पूजावसर केला. नंतर सर्वज्ञांनी आरोगणा केली. दिवस मावळेपर्यंत सर्वज्ञ येथेच होते. मग राजमढाकड़े गेले. (पू.ली. 484, तळटीप स्था.पो.)

दोन महिन्यांच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू कार्तिक शुद्ध तृतीयेला येथून खनेपुरीला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

अनुपलब्ध स्थाने :

1. वनदेवाच्या पूर्वेचे पाटसरेयावरील आसन स्थान.

2. वनदेवाच्या पटीशाळेतील आसन स्थान.

3. राजमढाच्या दक्षिण सोंडीवरील दिवाळी सणाचे मादने स्थान.

4. पुर्व सोंडीवरील आपलो भेटी स्थान.

5. पटीशाळेवरील रिगता डाव्या हाताचे आसन स्थान.

6. पटीशाळेवरील रिगता उजव्या हाताचे आसन स्थान.

7. तुळसीया आंगुळीव्यथा हरणे स्थान.

8. राजमढाच्या ईशान्येचे परिश्रय स्थान.

9. महालक्ष्मीच्या देवळाच्या चौकातील आसन स्थान.

10. भटा माहादाइसा अनुवर्जन स्थान.

11. गावाच्या ईशान्येच्या सिद्धनाथाच्या देवळातील आसन स्थान.

12. संगमेश्वराच्या देवळातील आसन स्थान.

13. रामनाथाच्या देवळातील आसन स्थान.

14. लिंगाच्या देवळातील आसन स्थान

जालन्याची एकूण स्थाने : 19

  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : एल्हाइ भाउबीज करणें :।।: / भाउबीजें एल्हाइविनती स्वीकारें मोदक करवणें :।।:
  • गोसावियांसि गावां निगावेयाची प्रवृत्तिः गोसावी बाइसाकरवी ग्रामांतराची आइती करविलीः गोसावियांतें अवघीचि रहावितें होतीं: परि गोसावियांसि निगावेयाची प्रवृत्तिः गोसावी कोण्हाचेनि न र्‍हातिचिः तवं तिकवनायकें आपुली ब्राम्हणी आणि कन्या एल्हाइसें गोसावियांतें राहावेया धाडिलीः तिये एल्हाइसें महादाइसांतें बोळउनी आलीं: आणि महादाइसीं निगतां एल्हाइसांते म्हणितलें होतें: ‘‘एल्होः तूं गोसावियांतें रहाविजसुः ऐसें म्हणः ‘जी मीं गोसावियांचा ठाइं भाउबिज करीनः’ ऐसें सिकविलें होतें: मग एल्हाइसीं ओली फुटेयाचा पदर हातीं घेवुनी विनविलें: ‘‘जी जीः मीं गोसावियांचा ठाइं भाउबिज करीनः’’ म्हणौनि फुटेया पीळा घेतलाः ‘‘जी जीः आजी गोसावी राहावें जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘लाडू कराल तरि हें राहील?’’ तिया म्हणितलें: ‘‘करीन जीः’’ मग गोसावी तयाचि विनति स्वीकरिलीः गोसावी राहिलेः गोसावी पुसिलें: ‘‘बाइः तुमतें काइ असे?’’ तिया म्हणितलें: ‘‘जी जीः मातें च्यारि दाम असतिः तयाचे मीं गोसावियांसि लाडू करीनः’’ मग गोसावी तियेसी वीधि विहिलाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आपणचि करावेः पुसों लाभेः करउं न लभेः आपणचि कांडावेः आपणचि गहुं दळावेः आपणचि सोजी काढावीः आपणचि सेव वळावीः आपणचि सेव तळावीः आपणचि लाडू बांधावेः दाखउं लाभेः परि करउं न लभेः’’ मग ‘‘हो कां जीः’’ म्हणौनि तिहीं मानिलें: तें जे जे करीति तें ते बाइसापुढा दाखवितें जातिः न ये तें पुसते जातिः बाइसें म्हणति तैसेचि करीतिः ऐसें लाडु बांधलेः मग दुरडीये घालौनि पालवे झाकुनि घेउनि आलीः गोसावियांपुढें दुरडी ठेविलीः उघडिलीः दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलीः आणि पासी बैसलीः मग बाइसीं हात पाहिलेः तवं दोन्हीं हात फोडीं भरलें: कुंकूं ऐसें जालें असतिः बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः बटिकीचे दोनि हात फोडीं भरले असतिः’’ मग गोसावी तियेचां हातीं श्रीमुखीची पीकी घातलीः आणि तयातें म्हणितलें: ‘‘बाइः दोन्ही हात घासाः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘होकां जीः’’ मग दोन्हीं हात घासविले घासिलेः इतुलेनि जाळु निवर्तलाः निके जालेः फोड फुटलेः हींवसे जालेः तें लाडु गोसावी आपुलेया विनियोगा नेलें: मग बाइसीं गोसावीयांसि लाडू तुप वाटा घालूनी ओळगवीलेः गोसावियांसि आरोगणा जालीः गुळळा जालाः तवं मागिलीकडुनि उपहार आलाः बाइसीं गोसावियांसि दुपाहारीचा पूजावसर केलाः ताट केलेः गोसावियांसि आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः मग गोसावियांसि पहूड जाला :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : भटः महादाइसें रीधपूरा पाठवणें :।।:
  • एक दिसीं गोसावीयांसि ऐसीं प्रवृत्ति उपजली जें महादाइसासि रीधपूरां पाठवावें: हंसराज पूर्वि श्रीप्रभुचिये सेवे राहाविलीं होतीः तें एथचि आलीः तयासि गोसावी भटां महादाइसांचा सांगात लाविलाः तियेंही निगालीः निगतां समयी गोसावी महादाइसांसि वीधि विहिलाः ‘‘बाइः तेथ भितरीं निद्रा न किजेः श्रीप्रभुगोसावियांसि न पुसत भले तो पदार्थ न ओळगवावाः श्रीचरणांवरि वाडुवेळ माथां न ठेवावाः सन्मुखा न बैसावेः श्रीप्रभुची प्रवृत्ति भंगो नेदिजेः महात्मेयासांगातें यांवें नाहीं: महात्मेयांसांगातें जावें नाहीं:’’ मग गोसावी बाइसातें म्हणितलें: ‘‘ बाइः तें वस्त्र आणाः’’ लखुमदेवबाये गोसावियांसि सोळा दामाचें वस्त्र वाइले होतें: तें बाइसीं धुनी ठेविले होतेः तें आणिलेः गोसावी श्रीकरीं घेउनि महादाइसाचां हातीं दिधलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘वानरेयाः श्रीप्रभु प्रसन्न देखावे तेव्हेळी हें वस्त्र वावें:’’ भटीं म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ मग पृथकाकारें क्षेमाळिंगनें दिधलीं: तेही गोसावियांसि दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलें: तैसीचि महादाइसें बाहीरि निगालीः गोसावी हंसराजातें बोलाविलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हंसराजाः या आरूतीं: ए एथीचेया प्रवृत्ति एकत्र उठीति बैसतिः परि तुम्हीं मनीं झणें काही आनौनि आन घेयाः या दोनि सकर्डीया गाइ असति हो ये एथचेया संवादें सवेतवं उठिती बैसतिः ये सोयरीः झणें तैसैनि तैसें घेयाः वरि निकेंचि घेयाः’’ महादाइसें बाहीरि ‘गोसावी काइ हंसराजयासि विशेष निरोपु देत असति?’ म्हणौनि आइकों ठेलीः आइकीलें: मग आपुला जीवीं म्हणों लागलीं: ‘‘गोसावियांसि आमुची कणव थोरी असेः’’ तैसींचि हंसराज आलीं: दुःख करूं लागलीः महादाइसीं पुसिलें: ‘‘हां हंसराजाः गोसावी काइ निरोपु दिधला?’’ तिया म्हणितलें: ‘‘काइसा निरोपु आइः माझी प्रकृति दोषरूपः दोषज म्हणौनि गोसावी तुमचां परिहारू दिधलाः’’ सर्वज्ञें म्हणितलें तें अवघेचि सांघितलें: तें महादाइसीं भटापासी सांघितलें: मग भटांसि आणि महादाइसासि थोर सुख जालें: ‘गोसावीयांसि आमची थोरी कणव असेः’ मग तियें निगालीः गोसावी महालक्ष्मींचेया देउळाउत्तरे पांडा दाहावेर्‍ही अनुवर्जित बिजें केलें: राहिलें: गोसावी बीजेंचिये दिसीं भटः महादाइसें: हंसराजः दादोसः परमेस्वरपूरासि पाठविलीं: मग तिये पेणोवेणा रीधपूरासि गेलीः श्रीप्रभुंसि दरीसन जालें: दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: एकु दी श्रीप्रभु प्रसन्न देखौनि पूजा केलीः तें वस्त्र ओळगवीलें: भटीं महादाइसीं म्हणितलें: ‘‘स्वीकरीजो जीः गोसावी धाडिले असे जीः’’ श्रीप्रभु म्हणितलें: ‘‘ऐया माझा होए म्हणेः आवो मेला जाः पांगुरावे म्हणेः न पांगुरावे म्हणें: पांगुरावेचि म्हणेः’’ म्हणौनि श्रीप्रभु पांगुरलें: ऐसें सातपांच दीसु श्रीप्रभु गोसावी प्रावर्ण केलें: मग एकु दिसी महादाइसाचां हातीं दिधलें: आणि श्रीप्रभु म्हणितलें: ‘‘आवो मेली घे घे म्हणेः घे ना म्हणेः हें तेथ न्यावे म्हणेः’’ मग महादाइसीं तें वस्त्र घेतलें: धुनि परवंटीं बांधलेः तो श्वेत फुटाः मग मास एक श्रीप्रभुचा सन्निधानी होतीं :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : महादाइवस्त्राची आंगी भटां देणें :।।:
  • एकु दीं गोसावी महादाइसातें पुसिलें: ‘‘बाइः हें तुमचें वस्त्र केतुले एक दी पांगुरलें: मग आंगी सिविलीः मग आंगी लेइलें: आतां हें आंगी वानरेशासि दीजो?’’ महादाइसीं म्हणितलें: ‘‘हो काः दीजो कां जीः’’ महादाइसां थोर सुख जालें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘घेया गा वानरेयाः’’ भटीं आंगी घेतलीः लेइलें: श्रीचरणां लागलें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : महादाइसीं माहात्मेयां दिवाळी सणु करवणें :।।: / महादाइकृत सहभृत्य दीपावळी स्वीकारू :।।:
  • एकु दीं दीपावळी सणु आलाः तियें दिसीं विळीचां महादाइसीं गोसावियांतें विनविलें: ‘‘जी जीः मीं गोसावियांचां ठाइं दिवाळी सणु करीनः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः अवघेयां दिवाळी आलीः अवघेया महात्मेयांसहित कराः तुमतें असे तें तुम्हीं कराः न पूरे तें बाइसातें मागाः’’ तिया म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ महादाइसीं सांजवेळें पाणीयाची सामुग्री केलीः चिकसा तेल उमाइसांचिये घरूनि आणिलें: मग थोरे पाहानपटीं गोसावियांसि उपहूड जालाः महादाइसीं गोसावियांसि बरवें आसन रचीलेः जोन्हळेयाचां चौक भरीलाः जोन्हळेयाची सओि भरीलीः गोसावी परिश्रयोसारिलाः उदका विनियोगु करौनि आसनीं उपविष्ट जालें: भक्तिजना बैसों घातलेः पाटू पासवडीलाः भक्तिजन गोसावियापुढें बैसलेः महादाइसीं गोसावियांसि ओवाळणी केलीः भक्तिजना वोवाळीलेः गोसावीयांसि विडा ओळगवीलाः भक्तिजनासि तांबोळें दिधलीः गोसावी विडा स्वीकरिलाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘घेया गा तांबोळेः’’ भक्तिजनीं तांबोळे घेतलीः मग गोसावियांसि वोलनी ओळगवीलीः गोसावीयांसि महादाइसीं मर्दना दिधलीः उरला चिकसा तयांतु आणिकु घालूनि भक्तिजनासि दिधलाः भक्तिजनीं एकमेकांचीं आंगें उटिलीं: गोसावीयांसि श्रीमुकुटीं तेल ओळगवीलेः उरलेया तेलाआंतु आणिक तेल घालूनि भक्तिजनासि दिधलेः भक्तिजनीं एकमेका माथे माखिलेः मग गोसावियांसि पूर्विल सोंडी तिकडें पाटसरां उत्तरामुख आसनः गोसावियांचां श्रीमुकुटीं भोगी ओळगवीलीं: पीळा निगालाः तयांतु आणिक भोगी घातलीः मग भक्तिजनासि दिधलीः भक्तिजनी एकमेकीं माथां भोगी घातलीः गोसावियांसि मार्जनें जालें: महादाइसें गाडु ढाळीतिः बाइसें श्रीमुकुट चोखीतिः श्रीमूर्ति प्रक्षाळीतिः भक्तिजन सोंडीयेतळीं रीगौनि गोसावियांचेनि उदकें न्हातिः मार्जनयांचा अवसानीं श्रीमुकुटावरि गाडु ढाळीतां गोसावी दोन्ही श्रीकर श्रीमुकुटावरि ठेवीतिः दोहीं कोंपरांचेनि उदकें धारा लागति तयातळी बैसौनि भक्तिजन न्हातिः ऐसें गोसावियांसि मार्जनें जालें: गोसावी आणिकें बहुते पाणीयें भट न्हाणिलें: तयांचें केस बहुत म्हणौनिः मागौते पडदणियासहित न्हालेः मग महादाइसीं आखेवाणे आणिलें: गोसावियांतें ओळगवीलेः गोसावी आणिकी वस्त्रें वेढिलीं: महादाइसीं पाट पासवडीलाः गोसावी आसनीं उपविष्ट जालें: गोसावियांसि चंदनाचां आडा रेखिलाः कुंकूम अक्षेता लाविलीयाः श्रीकंठमाळाः मुगुटमाळाः वस्त्रें ओळगवीलें: भक्तिजनासि चंदनाचे टिळे केलें: अक्षेता लाविलीयाः मग गोसावियांसि ओवाळणी जालीः भक्तिजनां ओवाळणी केलीः गोसावियांसि विडा ओळगवीलाः भक्तिजना तांबुळें दिधलीः गोसावी तांबुळें घेयावेया अनुज्ञा दिधलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तांबुळें घेया गाः’’ मग भक्तिजनी तांबुळें घेतलीं: मग दिसु निगालाः बाइसीं आपुला नेमस्तु पूजावसरू केलाः आणि गोसावी सिध्दनाथाचेया देउळाकडें विहरणा बिजें केलें: सिद्धनाथाचां देउळासि गोसावियांसि चौकीं आसन जालें: गोसावी भक्तिजनाप्रति निरूपण केलें: बाइसीं उपहारू निफजविलाः गोसावी विहरणौनि बिढारा बिजें केलें: महादाइसीं दुपाहारीयाचा पूजावसरू केलाः गोसावियांसि ताट केलें: भक्तिजना ठाये केलेः गोसावियांसि आरोगणा जालीः भक्तिजना सहपंक्ती जेवणें जालीः विडेतांबुळें जालीः महादाइसीं गोसावियांतें ओवाळीलेः भक्तिजनातें ओवाळीलें: ऐसां गोसावियांचां ठाइं महादाइसीं भक्तिजनासहित दीपावळी सणु केला :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : हिंसानिमीत्ते बिजें करणें :।।: (नागावीहिर, जालना)
  • एकु दीं गोसावियांसि पश्चातपहारीं उपहूड जालाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः आजी हें नगराबाहिरी बिजें करीलः’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘ते कां बाबा?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः आजी खांडे महानवमीः आजी नगरामध्यें घरोघरीं हिंसा वर्तेलः हिंसा वर्ते तियें स्थानीं महात्मेया असो ने कीं बाइः भोगसमो लोटलेया सायंकाळी नगरामध्यें यावेः हें नगरामध्यें असैल तरि देवता नगरामध्यें विचरो न ल्हातिः रात्रीं एथ देवताची विनति आली होतीः मग एथौनि तयातें म्हणितलें: ‘तुम्हीं नगरांत याः मग हें बाहीरि बिजें करीलः’’ यावरि गोसावी एकांकीची घोडाचुडी सिष्याची लीळा सांघितलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः अवघी मात्रा घेयाः’’ बाइसीं मात्रा घेतलीः विसदेओ घेतलाः श्रीचरणीं उपान्हौ ओळगविलीयाः गोसावी भक्तिजनासहित गावांपसिमें बिजें केलें: चौबारीं भांडारीं नागावीहिरीः तियें वीहिरीचिये वरिली रवणीएवरि गोसावी चरणचारी उभे राहिले असतिः बाइसें आंतुली रवणीएवरि आसन रचीलेः गोसावी आसनीं उपविष्ट जालें: वीहिरीआंतुनि देवता निगालीयाः तिया गोसावियांपासी आलीयाः दंडवत घातलें: श्रीचरणां लागलीं: माथांचा केशीं श्रीचरण झाडिलें: मग गोसावियांसि अनुज्ञा मागितलीः तिया नगरांतु गेलियाः बाइसीं पुसिलें: ‘बाबाः नगरांतु गजंबु काइसा होतु असे?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः देवताचां:’’ बाइसीं पुसिलें: ‘‘तरि बाबा काही देखिजेतिना?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तिया आपणेयातें देखो नेदीति कीं:’’ मग बाइसीं अग्नि पेटविलाः उष्णोदक केलें: गोसावियांसि उष्णोदक ओळगवीलेः गोसावियांसि गुळळा जालाः श्रीमुख प्रक्षाळण केलें: बाइसीं श्रीचरण प्रक्षाळिलेः मग चंदन उगाळिलेः गोसावियांसि उर्ध्वपोंड्र टिळा लाविलाः अक्षेता लाविलीयाः कापूरासहित विडा ओळगवीलाः पूजा केलीः धुपार्तिः मंगळार्ति केलीः दंडवतें घातलीं: तवं तिकवनायक आलेः दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलें: तेही उपहारालागी विनविलेः गोसावी विनंति स्वीकरिलीः मग गेलेः दुपाहाराचीए आरोगणेंलागी उपहार घेउनि आलें: बाइसीं मागुतीं पूजावसराची आइती केलीः तिकवनायकें गोसावियांसि पूजा केलीः धूपार्तिः मंगळार्ति केलीः मग गोसावियांसि भक्तिजनासहित आरोगणा जालीः गुळळा जालाः कापूरेंसहित विडा ओळगवीलाः गोसावी तयासि पाठवणी दिधलीः तिकवनायक भाजनें घेउनि गेलेः गोसावी पहूड स्वीकरिलाः मग गोसावियांसि उपहूड जालाः गोसावी निश्चळ आसन स्वीकरिलें: भक्तिजनें दिवस मावळेतवं श्रीमुर्ति अवलोकितें निश्चळ बैसलीः विळींचां वीहिरीदक्षिणें गोसावी परिश्रयासि बिजें केलें: परिश्रयोसारिलाः बाइसीं उष्णोदक ओळगवीलेः गोसावी उदकां विनियोग केलाः मग म्हणितलें: ‘‘बाइः आतां चालाः मात्रा घेयाः देवताचां भोगसमो जालाः’’ मग गोसावी नगरांसि बीजें केलें: तवं तिया वीहिरीचिया देवता नगरांतुनि आलीयाः वेशीद्वारीं भेटि जालीः मग श्रीचरणां लागलीयाः माथाचां केशीं श्रीचरण झाडिलेः मग तिया गेलियाः गोसावी नगरांतु राजमढां बिजें केलें: मग बाइसीं रात्रीचां पूजावसर केलाः व्याळी जालीः गोसावी आसनीं उपविष्ट जालें: बाइसीं सकापूरा फोडी ओळगविलीयाः विडीया करौनि दिधलीयाः मग गोसावी वेढे केलेः बाइसीं शयनासन रचीलें: गोसावी आसनीं उपविष्ट जालें: काही परावर निरूपण केलें: मग पहूड स्वीकरिला :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : भटां क्षौर प्रवृत्यंतरें निराकरणें :।।:
  • एकु दिसीं गोसावियांसि क्षौर जालें: वरिकांसि पाठवणीं दिधलीः भट पाठीमोरे बैसले असतिः गोसावी तयांपासी बिजें केलें: आंगिचियां बाहिया वरूतिया केलियाः भटाची वेणी धरिलीः मानेवरि श्रीचरणु ठेविलाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बोलावा गा वारीकुः करा क्षौरः आणी गाः आणी गा वस्तराः आतां तुझा कोण राखैल?’’ भटीं म्हणितलें: ‘‘जी जीः माझा श्रीचक्रधरू राखैलः’’ आणि सोडिलेः मग भटासि उमटलें: जें ‘गोसावी मजकरवी क्षौर करवीत असतिः’ मग दिसां दों चैं म्हणितलें: ‘‘जी जीः मीं क्षौर करीनः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आतां असो द्याः तुमचें परमेस्वरपूरां जाणें होत असेः तेथं तुमचेया प्रत्यया ये तें कराः’’ आणि भट उगेचि राहिले :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : भटांकरवि क्षौर करवणे :।।: / यूकोपद्रो कथन :।।:
  • गोसावी पूर्वि भटातें क्षौरं करवीत होतेः परि भटोबास तेधवा क्षौर न करीतिचिः एकु दिसीं गोसावियांसि उदेयाचां पूजावसर जालेयानंतरें गोसावी आसनीं उपविष्ट असतिः सभा घनदाट बैसली असेः गोसावियांचीये श्रीकंठीं उ डसली होतीः तें गोसावी ऐसीं चिमुटिया धरिलीः श्रीकरीं घेउनि ऐसीं तळहातावरि घातलीं: अवघेयां पुढां दाखविलीः मग म्हणितलें: ‘‘एथ सकेशियांचा उपद्रवोः देखिलें गाः क्यें बिढार घेतलें असे?’’ भटीं म्हणितलें: ‘‘जी जीः’’ गोसावियांचां हेतु भटां नुमटेचिः म्हणौनि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘वानरेयाः क्षौर करा गाः’’ तें उगेचि होतें: मग गोसावी तें उ भटाचां हातीं दिधलीः तवं भटीं म्हणितलें: ‘‘हे कव्हणी ठाइं घालूं जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘चिंधीए घालुनि निरूपद्रवी स्थानीं ठेवाः’’ मग भटोबासीं चिंधीये घालुनि निरूपद्रवी स्थानीं ठेविली :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : एल्हाइं मठावरी वाणें :।।: / एल्हाइं मढा आरोहणीं आश्चर्य दाखवणें :।।:
  • एकु दिसीं महादाइसें गोसावीयांचेया दरीसना निगालीं: एल्हाइसें धाकुटीं असतिः तेहीं म्हणितलें: ‘‘आइः राहे हो मीं गोसावियांचिया दरीसना येइनः’’ महादाइसें ‘होए’ म्हणौनि राहिलीः तियें परिवंटे साउलें नेसतें होतीं: तें उजू नेसलीः मग महादाइसीं पुसिलें: ‘‘एल्होः ऐसें तू कव्हणाकारणें वेठत अससि?’’ तिया म्हणितलें: ‘‘ना मीं श्रीचांगदेवोराऊळां गोसावियांलागी वेठत असेः’’ तेणें शब्दें महादाइसें तोखलीं: थोर सुख जालें: उचलिलीं: पोटयेसि आळींगलीं: मग गोसावियांचिया दरीसना आणिलीं: गोसावी मढावरि भक्तिजनासहित बिजें केलें: पाठलाकडौनि महादाइसें वळघलीः एल्हाइसें ओळघत होतीः तवं वळघवेनाः तियें नावेक आंगे स्थूळ होतिः म्हणौनि तें टेकां न वळघवेः एल्हाइसें मढां भवंती भवंतिः ‘‘जी जीः मज वळघवेना जीः मीं वरि येइनः’’ मग गोसावी पूर्विलीये सेवटींहुनि पसिम कोनटावेर्‍हीं बिजें केलें: एल्हाइसें तो शब्दु म्हणतें चालौनि कोनटावेर्‍हीं गेलीं: तेथ गोसावी फुटेयाचा पालौ लोंबता घातलाः पदरयाचिया दसिया काही आंगुळीयां लागलीयाः काही न लगतिचि आणि गोसावी फुटा वरौता ओढिलाः तैसींचि वरि आलीं: आणि तयां आश्चर्य जालें: मग एल्हाइसीं म्हणितलें: ‘‘हें काइ जीः काही धरिलें: काही न धरेः आणि वरि आलीयेः’’ आणि महादाइसां आश्चर्य जालें: आणि महादाइसीं म्हणितलें: ‘‘हें काइ जीः काही दसिया नखीं लागलीयाः काही न लगतिचि आणि कैसी जी वरि आलीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः आर्ति करौनि एथीची दसीचि धरिली पूरेः परि जीव एथीची दसीही न धरीतिः मां एथौनि काइ करावेः’’ यावरि गोसावी वानरियेचा दृष्टांत निरूपीलाः ‘‘हो कां जीः’’ :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : भटविवादें तिकवनायका जैत देणें :।।:
  • एकु दिसुं उदेयांचि भटीं: तिकवनायकें नदीसि धोत्रें धुतलीं: मग सिद्धनाथाकडें निगालेः गोसावियांचें गुणकथन करीतां तिकवनायकें म्हणितलें: ‘‘नागदेयाः नागदेयाः आमचे गोसावी साक्षात सिद्धनाथुः’’ भटीं म्हणितलें: ‘‘ब्र्रह्मादिकां निसरबोडीः तेथं तुझा सिद्धनाथु कोणें ठाइं लागेः गोसावी तवं साक्षात परब्रम्हः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘हें तू म्हणत अससि कीं गोसावी?’’ भटीं म्हणितलें: ‘‘गोसावीः’’ तिहीं म्हणितलें: ‘‘गोसावी जरि ऐसें म्हणति तरि मीं डोइ बोडुनि धोत्र फाडुनि उत्तरापंथें जायें:’’ तैसेचि दोघै विवादत गोसावियांपासी आलेः दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलें: पासी बैसलेः मग तिकवनायक गोसावियांपुढें सांगो लागलेः मागील अवघें सांघितलें: ‘‘जी जीः तरि गोसावी काइ? ऐसें सांघावें:’’ गोसावी तिकवनायकाचें मानिलें: ‘‘तुम्हीं म्हणत असा तेंचिः’’ यावरि तिकवनायकें बाहे आफळीलीः ‘‘हा होए कीं मीं तिकवदेवोः’’ म्हणौनि दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलें: मग हरीखैजत निगालेः मग भटीं म्हणितलें: ‘‘जी जीः गोसावी कैसें सिद्धनाथ?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हां गाः हा ब्राम्हणु साभिमानियां असेः धोत्र फाडुनि डोइ बोडुनि उत्तरापंथें जाये तें निकें कीं हें नावेक सिद्धनाथ होए तें निकें?’’ एतुलेनि भट बुझौनि गेलेः मग उगेचि राहिलेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुम्हीं यातें म्हणा ब्रम्हादिकां निसरबोडी तेथ तुझा सिद्धनाथ कोठे लागे? ऐसें सांगावे नाहीं: दोही ओठां टाळें घालावेः’’ भटीं म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुम्हीं म्हणा ब्रम्हादिका निसरबोडी तें तैसेचिः परि जाणौनि नेणें तो सदैवुः जैसा व्यवहारा धन असोनि आपणेया धन नाहीं म्हणें तैसा ठावों:’’ भटीं म्हणितलें: ‘‘जी जीः तरि गोसावियांचें महत्व आणि नाम कव्हणाप्रति बोलावे?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘झाडितां झडेनाः तोडितां तुटेनाः तयाप्रति बोलावें:’’ ‘‘हो कां जीः’’ म्हणौनि भट श्रीचरणां लागलें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : जोगीवेषें मनभूली क्रीडा/कृडा :।।:
  • एकु दिसीं गोसावियांसि उदेयाचां पूजावसर जालेयानंतरें गोसावी मळेयातं महालक्ष्मीचेया देउळा विहरणा बिजे केलें: गावांपूर्वे मढाअंाग्ने महालक्ष्मीचें देउळ होतें: तेथ तीन मढ होतें: तिहीं मढां एकचि जगतिः एका मढापूर्वेः एका मढांदक्षिणे महालखुमीएचां मढः तेथ गोसावियांसि चौकीं आसन जालें: तवं तेथ जोगी एकु होताः तो नगरांत गेला होताः कडासनः गळकंथाः खापरिः काठीः आधारीः ऐसें तेणें तेथ ठेविले होतीं: तें गोसावी देखिलें: गोसावी आपुलीं वस्त्रें चौकीं ठेविलीं: विभूती श्रीमुख माखिलें: भस्म आंगी लाविलें: भस्मरा उधळिलाः गळकंथा श्रीकंठी घातलीः एके श्रीकरीं खापरिः एके काठी घेतलीः आणि गोसावी उत्तरामुख उभे ठेलेः मग फागडा म्हणितलाः ‘‘करधृत खर्पर भिक्षापात्रं: भस्मविधुळीत विलसित गात्रं: नित्यम् अचळम् चित्तम् मंदम्ः मनसो विगळीत परमानंदम्ः मनभूली रे: मनभूली रेः मनभुली जोगीयाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः मागिल सिद्ध साधक अवधूत येणें वचनें भिक्षा करीतिः’’ मग इतुलेनि गोसावी कडासनावरि आसन केलें: आणि टाळी लाउं आदरिलीः तवं बाइसें महादाइसें भियों लागलीं: ‘‘फेडिजो बाबाः फेडिजो बाबाः’’ ऐसें गोसावियांतें वेळां दोनिचारि म्हणितलें: मग तें गोसावी फेडिलें: श्रीमुख प्रक्षाळण केलें: मग आपुली वस्त्रें प्रावर्ण केलीं: मग बिढारा बिजें केलें: गोसावियांसि मर्दनामार्दने जालें: दुपाहारचा पूजावसरः आरोगणा जालीः गुळळा विडा जालाः मग पहूड स्विकरीला :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : आबैसां मूर्तिनिरीक्षणी समुद्रप्रांत मानणें :।।:
  • एकु दिसीं आबैसीं वैजोबासि निरोपु पाठविला होतां: ‘जे तुम्हीं घोडेनिसि साउमे यावेः उमाइसें मासोपवासा बैसो पाहातें असतिः’ म्हणौनि वैजोबा घोडेनसि साउमे आलेः गोसावियांसि दरीसन जालें: दंडवत घातलेः श्रीचरणां लागलें: पानेपोफळें गोसावियांसि ओळगवीलीः श्रीमूर्ति अवलोकीत पुढां बैसलेः मग गोसावी क्षेम वार्ता पुसिलीः तवं वैजोबाये म्हणितलें: ‘‘जी ये उमाइसें मासोपवासी बैसति म्हणौनि जी मीं यातें न्यावया आलोः’’ मग गोसावियांसि विळीचा पूजावसर जालाः तो पाहिलाः मग गोसावियांसि रात्रीं व्याळी जालीः पांती वैजोबासि जेवण जालेः मग वैजोबा बिढारां गेलेः एरी दिसीं एकादसीचां दिसी पूजावसरां आलेः पूजावसर जालाः आबैसीं गोसावियांतें विनविलें: ‘‘जी जीः आम्हीं गावां जावुनी तेथ उमै मासोपवासीं बैसती तरि गोसावी मातें पडिताळावेः’’ गोसावी मानिलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तुम्हीं चालाः हें मागिलाकडौनि येइलः’’ गोसावी सपूजीत आसनीं उपविष्ट असतिः मग वैजोबाये पुसिलेः ‘‘जी उमाइसें मासोपवासी बैसते असति तरि आतां आम्हीं निगौनि जीः’’ म्हणौनि वैजोबायें: आबैसीं: उमाइसीं दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: आणि निगालीः मग निगता गोसावी भक्तिजनातें म्हणितलें: ‘‘हे कव्हणीकडें जाइलः तरि तुम्हीं ओळखाल?’’ कोण्हीं काही म्हणें: कोण्हीं काही म्हणें: आबैसातें सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हे तेथ येइल तरि तुम्हीं यातें ओळखाल?’’ आबैसीं म्हणितलें: ‘‘हे काइ जीः आम्हीं आपुलेया गोसावियांतें कैसें नोळखोः जी जीः आम्हीं आपुलेयां गोसावियांतें समुद्राचां प्रांती ओळखौनिः’’ गोसावी उगेचिः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ओळखाल किरूं: सिहाणी असाः’’ तें गोसावी रावंसगावीं उमचविलें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : महादाइंसेंविवादें तिकवनायका जैत देणें :।।:
  • तिकवनायक तें वायनायकाचे जावाइः महादाइसां वडील बहिणी उमाइसें तयांचे भातारः एल्हाइसांचे पीतें: तें निच गोसावियांचे दरीसना येतिः एकु दिसीं तयांचां घरीं श्राद्ध जालें: विळीचां गोसावियांते उपहारालागी विनवावेया आलेः गोसावियांसि दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलेः मग गोसावियांतें उपहारालागी विनविलें: गोसावी विनती स्वीकरिलीः मग तें गेलेः एरी दींसीं गोसावियांसि पूजावसर जालाः धूपार्ति मंगळार्ति जालीः आरोगणे उसीर जालाः म्हणौनि महादाइसें घरा गेलीः आणि म्हणितलें: ‘‘हे काइ तिकवनायको? गोसावियांसि आरोगणें उशीर जालाः आझुइं कैसें ताट न्या ना?’’ तिकवनायकें म्हणितलें: ‘‘ब्राम्हणांसि संकल्प देवों: मग गोसावियांसी ताट नेवों:’’ महादाइसीं म्हणितलें: ‘‘आधीं तुझे ब्राम्हण जेवीतिः मग गोसावियांसि ताट नेसिः’’ ऐसें म्हणौनि महादाइसें भितरीं गेलीं: तेहीं म्हणितलें: ‘‘तरी होए आणि काइः’’ महादाइसांसी न मानेचिः गोसावियांलागी ताट वोगरीलेः घेउनि आलीं: गोसावियांसि आरोगणा जालीः मग मागुतें ताट घेउनि गेलीं: तवं तिकवनायकें म्हणितलें: ‘‘रूपाइसें: ताट सतसारिलें कीं नाहीं?’’ तिहीं म्हणितलें: ‘‘सतसारिलें म्हणिजे काइः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘नाः गोसावी आरोगणा केली म्हणौनिः’’ तिया म्हणितलें: ‘‘मग गोसावी आरोगणा केली तरि सतसारावें कां:’’ तेहीं म्हणितलें: ‘‘नाः गोसावी कोण जाणे काइ ऐसें म्हणौनि नेणिजैतिः भितरीं नेवों नकोः बाहीरिचि ठेवीः’’ ऐसां वेळां दोनि उरोधिलेः महादाइसीं म्हणितलें: ‘‘कैसें गोसावी काइ? गोसावी ईश्वरू आणि काइ?’’ तिहीं म्हणितलें: ‘‘होए होएः घेयाः गोसावी ईश्वरू होतिः मी काइं नव्हें म्हणतें: परि काइ म्हणौनि नेणिजैतिः’’ तिया म्हणितलें: ‘‘कैसें काइ म्हणौनि नेणिजे?’’ ऐसा घटीका दोनि विवादु जालाः मग महादाइसें ताट ठेउनि निगालीं: उदेयांचि तिकवनायक तें गोसावियांचिया दरीसना आलेः भावें दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलें: बैसलेः तवं हळुचि महादाइसीं नेत्र तांबुनि म्हणितलें: ‘‘घेइं: काइ घेवों तुझेया भावाचेः’’ मग तिकवनायकें गोसावियांपुढें मागिल अवघेचि सांघितलें: आणि म्हणितलें: ‘‘जी जीः गोसावी काइ म्हणौनि सांघावे जीः’’ यावरि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः नायक म्हणति असति तें साच कीं: हें काइ? ऐसें हें काइ जाणति? हें काइ ब्राम्हण कीं क्षेत्री? कीं वैश्या? कीं शूद्र? कीं आणिक काहीः हें नेणिजे कीं बाइः नायक म्हणत असति तें साचः’’ ऐसें गोसावीहीं वेळां दोनि म्हणितलें: आणि तिकवनायकासि जैत आलेः तेणें म्हणितलें: ‘‘मिया म्हणितलें तें सत्य जालें कीं:’’ ऐसें म्हणौनि बाहे आफळौनि निगालेः मग महादाइसीं म्हणितलें: ‘‘हे काइ जी? गोसावी ऐसें कैसें म्हणितलें? ऐसें काइ जी? गोसावी इश्वरः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः इश्वर तो तुम्हांसिचि कीं: तें यातें इश्वर ऐसें काइ जाणीति? बाइः हें मनुष्या सारिखें नटलें असेः मनुष्याचें आहारविहार स्वीकरिले असतिः म्हणौनि एर लोक काइ जाणें? जैसा कव्हणी एकु कुणबी आउत वाहात होताः तवं पास परिसासि लागलीः तें सुवर्णाची जालीः तेधवा आणिकें लोखंडे घेउनि तो परिस ठाउका करूं बैसलाः तवं परिस ठाउका नव्हेचिः जेतुके प्राक्तन तेतुकेचि देवता दिधलेः तैसा इश्वर यांसि ठाउका काइसेनि होइल?’’ मग महादाइसें उगीचि राहिली :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : तथा(महादाइसा) श्राद्ध प्रश्नु :।।:
  • एकु दिसीं महादाइसीं पुसिलें: ‘‘हां जीः श्राद्ध केलेयां पीतरां पावे?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तयांसि न पवेः’’ महादाइसीं पुसिलें: ‘‘जी जीः तरि काइ होए जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जो क्रिया करी तयांसि तियें क्रियेचें गोमटें होएः’’ महादाइसीं पुसिलें: ‘‘तरि करीत असति तें घे कव्हण?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘पीतर अधिष्ठात्री देवता जे असे तें घे बाइः परि करितेया निष्ठा होआवीः पीतर देवतेसि अधिष्ठानी तोखु पावेः’’ ऐसें गोसावी महादइसाप्रति श्राद्धाचे ज्ञान केलें: मग तें श्रीचरणां लागली :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : तथा(महादाइसा) देहांतर प्रश्नु :।।:
  • एकु दिसीं महादाइसीं पुसिलें: ‘‘जी हा जीव मरेः मग काइ होए जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः जीव काइ मरत असे? जीव मरैल मग कें जाइल?’’ महादाइसीं पुसिलें: ‘‘हां जीः तरि हा जीव या देहाहुनि कैसेनि जाए?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः या देहापाठी आणिक देह ओडविजेः जैसी कां तृणजळुकाः पुढीली पाइं एक धरी मग एक सोडीः तैसें जाए बाइः समान वाायेसि लिंगदेहाचें उत्क्रमण यातें मृत्यु बोलिजेः’’ महादाइसीं म्हणितलें: ‘‘जी तें कैसे?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः स्थुळीहुनि समान वायु लिंगदेहाचें उत्पाटन करी यातें मृत्यु बोलिजे की बाइः प्राणः अपानः व्यानः उदानः समानः नागः कुर्मः कृकलीः देवदत्तः धनंजयः हें दसवायु देही असति बाइः’’ :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : महादाइसां परिसु दृष्टांतु कथन :।।:
  • वायनायक आणि कुटुंबीची महादाइसां भकतिः ‘रूपै वायां गेलीः’ एकु दीं तें महादाइसीं गोसावियांपुढें सांघितलें: ‘‘जी जीः कुटुंबीचीं आणि वायनायक ऐसें म्हणतिः जे रूपै वाया गेलीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तुम्हीं तयांचेया अवघेया विषयव्यवहाराचेया उपयोगा न वचाः तरि म्हणति आणि काइ? बाइः तुमचेनि जें तयां गोमटें तें काइ बाइ तें जाणत असति?’’ महादाइसीं गोसावियांतें पुसिलें: ‘‘जी मीं आधी मासोपवास करीः एकादसी करीः कृछचांद्राण करीः एकवतें करीः ऐसें अवघे करीः तै लोक म्हणेः ‘वायनायकाचिया कन्या कुळ उधरिलेः आणि पुत्र तो जुआरी जालाः तेणें कुळ बुडविलें:’ आणि आतां लोक ऐसें म्हणती जे ‘आपलो तें जुआरी जालेः आणि रूपैयाही वायनायकाचें कुळ बुडविलें कीं: महात्मेया पाठीं निगौनि गेलीः’ तैसेचि वायनायक म्हणति जीः ‘दोघीं लेंकुरवीं माझें कुळ बुडविलें: दोघेंही वायां गेलीः’’ मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः वायनायकासि जालीः तया कुणबीची परिः’’ महादाइसीं म्हणितलें: ‘‘ते कैसें जी?’’ यावरि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः कव्हणी एक कुणबी आउत वाहात होताः तयाचि पास परिसीं लागलीः तें सोनयाची जालीः परि तो तें सोनें नेणेः ऐसा आउत वाहातचि असेः तवं पास वांकलीः म्हणौनि आउत सोडौनि घरा घेउनि आलाः पास ठेउनि चिंतावला बैसलाः तवं कोण्हे एकें जाणतेनि तें सोनें जालें देखिलें: परि परिस ठाउका नव्हेचिः जैसा तया कुणबीयासि लाभ जालाः तैसें तुमचेनि तयासि जो लाभ जाला तो तें नेणतिः’’ मग गोसावी परिसाचां दृष्टांतु निरूपीलाः ‘‘कव्हणा एका महात्मेयाचीए आधारीए परिसु होताः तो ब्राम्हणा एकाचिया घरां वस्तिसि जाएः दारीं तीटततीटत ऐसें पाणी पडित होतें: तेणें तेयाचें वस्त्र आंबटवोले ऐसें जालें होतें: घरीचिया ब्राम्हणीं वोसरीए पीढें घातलें: पाये धूतलें: तांबीया भरूनि दिधलाः तेणें संध्या केलीः तवं तो ब्राम्हण आलाः डोइये वानेराची पेंडीः तें ठेविलीः तियें सदुर्बळे ऐसीं ब्राम्हणेः तेयातें गा एकीं दुभेः तेणें गा दुहिलीः तव तिया राळेयाचें खिचटें रांधिलेः लोणियाचां कवडा सांचिला होता तो ताविलाः मग तयातें उटिलें न्हाणिलें: मग तयासि ठावो केलाः तथां दोघाहीः तो जेविलाः सुकलींसिं पानें: घोटीं ऐसीं फोडि होतीं: तांबुळ दिधलें: तुटकी ऐसीं बाजः तियेवरि फाटकी ऐसीं वाकळ आंथुरीलीः ती निजावेया दिधलीः तयाचे पाय धुतलें: चोपडिलें: इतुकेनि तो संतोखलाः मग तेणें तया म्हणितलें: ‘तुमची जेतुली लोखंडें आहाति तेतुकी बांधौनि आमचीए बाजिबुडीं ठेवाः’ म्हणौनि तो निजैलाः मग तिया बाइलाः पासः फाळः इळाः कुर्‍हाडीः तुता बांधौनि तयाचीए बाजिबुडीं ठेविलीः तो पाहाटेचि उठिलाः आधारीएचां परिसु काढिलाः तेथ लाउनी आपण निगौनि गेलाः पहानपटीची तो ब्राम्हण उठीलाः डोइये लोखंडें ठेउनि सेतां घेउनि गेलाः वखरू जुंतीलाः तवं पास लवो लागलीः नांगरू जुंतिलाः तवं फाळ लवो लागलाः तूतेनि करौनि माती फेडीः तवं माती न फिटेः इळेनि करौनि गवत घेउं बैसलाः तवं गवत नेघवेः कुर्‍हाडी करौनि झाडें फेडूं आदरीलीः तवं कुर्‍हाडी वांकलीः ऐसां निधावलाः मग म्हणेः ‘तेणें महात्मेनि माझेया लोखंडासि कुजांतर केलें: लोखंडें नासिलीं जोगिएः घातवाप गेलीः तोंडा घासु आलाः एक एक चास सोनयांचें जाताएः ऐसें जोगिए विथापीलें: माझेया कुंटुंबाचां मुळीं इळा घातलाः माझी एकी एकी घडी सोनयांची जाति असेः’ म्हणौनि लोखंडें बांधौनि डोइए ठेउनि घरां घेउनि आलाः ‘घें घाली तोंडावरिः’ म्हणौनि दारीं लोखंडें घातलीः मग म्हणितलें: ‘‘पापिणीः पापिणीः कव्हणासि बिढार दिधलेः महात्मेनि माझेया लोखंडासि कुंजांतर केलें: आजी माझा सोनयाचां देहाडा वाया गेलाः’ ‘महात्मेनि कुजांतर केलें?’ म्हणौनि तें बाहीरि आलीः तवं विवळले असेः वरील माती फिटलीः आंतुल सोने झळझळ करीत दिसतायेः तिया देखौनि सामोरि गेलीः मग म्हणितलें: ‘महात्मेनि कुंजातर केलें कीं आमचेया दळीद्राचां मुळीं इळा घातला?’ ऐसें म्हणौनि तें भितरीं घेउनि गेलीः तयांसि परम संतोख जालाः तैसें एथौनि जें तयां गोमटें तें काइ बाइ तें जाणत असति?’’ मग श्रीचरणं लागलीः हें वायनायक गोसावियांचिये भेटिपूर्वि म्हणतिः तें एथ सांघितलें: मग यावरि दृष्टांत निरूपीला :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : तथा (लुखदेवोबा) वस्त्रपूजा उपहारू स्वीकारू :।।:
  • एकु दिसीं लुखदेवोबों भटातें पुसिलें: ‘‘गोसावियांकारणें वस्त्र घेवो?’’ भटीं म्हणितलें: ‘‘तुते काइ असे?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘ना मीं कटका गेला होतां: तेथ मज तीनि आसू आणि च्यारि दाम आलेः दोनि दाम वेचलेः तीनि आसू दोनि दाम असतिः’’ भटीं म्हणितलें: ‘‘हो कां: तरि गोसावियांलागी बरवें वस्त्र घे आणि गोसावियांचिपूरता बरवा उपहार करीः’’ तिहीं मानिलें: गोसावियांसि पूर्विली सोंडियेवरि आसन असेः मग तिहींचि गोसावियांपुढें सांघितलें: ‘‘जीजीः मीया नागदेयातें पुसिलें: तवं नागदेवो ऐसें म्हणें:’’ म्हणौनि अवघें सांघितलें: यावरि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आप्ताचें वाक्य लागेः तेणें एकाचां धर्मु सिद्धी जाये म्हणौनि आपुला सुहृदय असैल तयातें पुसावें: आणिकातें न पुसावेः स्नेहाचां कांजी जाणवें: स्नेहाचां ठाइं उचित स्फूरेः’’ ‘‘हो कां:’’ म्हणौनि श्रीचरणां लागलें: मग गोसावियांलागी बरवें वस्त्र घेतलें: गोसावियांपूरता उपहार निफजविलाः मग विळीचिये पाहारी गोसावियांसि स्वहस्तीं मर्दनामार्जने केलें: भक्ती ‘शोडशोपचारीं पूजा केलीः वस्त्र ओळगवीलें: मग गोसावियांसि ताट केलें: दंडवत घातलें: आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः तोचि फुटा आजवेर्‍ही नमस्करणीये आला :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : तथा(लुखदेवोबा) पुण्यमहात्मे नामकरण :।।:
  • एकु दीं गोसावियांचें क्षौर जालें: मग गोसावी मढाभितरीं गेलेः तवं लुखदेवोबायेही क्षौर करविलें: भितरीं गोसावियांपासी गेलेः गोसावियांसि भितरीं ओटयावरि आसन असेः गोसावी तयातें देखिलें: मग कानसुलें दाखविलें: म्हणितलें: ‘‘हां हो महात्मे जालेतिः मां क्षौर करविलें: सांघा सांघाः क्षौर कां करविलें? क्षौर कां?’’ ऐसें वेळां दोनि च्यारि म्हणितलें: ‘‘जीजीः कटकीं महारवाणीयें: डोहरवाणीएः मोचवाणीएः पाणीए पियालों: तों विटाळु जालाः तरि तीर्था जावें: मग क्षौर करावें: तरि गोसावीचि तीर्थः गोसावियांचिया ठाइं सकळ तीर्थ असतिः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तीर्थां क्षौर केलेया काइ होए?’’ ‘‘जी जीः आणिका तीर्थी करावे तें गोसावियांचा ठाइं केलेयां पुण्य होइलः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तीर्थी क्षौर केलेयां पुण्य होए?’’ तिहीं म्हणितलें: ‘‘जी जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः क्षौर केलेयां हें महात्मे जालें: तरि ऐसयां महात्मेयां नांव काइ ठेवावें?’’ बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः ठेविती तें?’’ मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुम्हीं क्षौर केलें तरि तुम्हीं पुण्यमहात्मे म्हणाः’’ ऐसें प्रसादाचें नांव ठेविले :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : लुखदेवोबा भेटिः स्थितधिक्यें अधिकारभूमि निरूपणें :।।:
  • लुखदेवोबा भटांचें माउसभाउः तें आबैसांची बहिणी गांगाइसें तयांचे पुत्रः तें गोदानालागी कटकासि गेले होतेः तेथौनि करंजाळेयासि आलेः तेथ आबैसांची बहिणी सामकोसें होतीः तयासि भेटलेः सामकोसें पाप धुतें असतिः तें पाय धुतांची लुखदेवोबों सामकोसांतें पुसिलें: ‘‘हां आइः सांपें आबैचा नागदेवो क्यें? केउता देखोना? तयाचि धांडाळें हें काही आइकीजतिनाः’’ तिहीं म्हणितलें: ‘‘ना रे बाः तें तू नेणसिः तेणें तें अवघेचि सांडिलें: तो गोसावियांचां ठाइं असेः’’ लुखदेवोबायें म्हणितलें: ‘‘गोसावी कोण?’’ तिया म्हणितलें: ‘‘ना श्रीचांगदेवोराऊळः’’ आणि लुखदेवोबाएं नाम आइकतखेवीचि तयासि निरूपम्य स्तीति जालीः लुखदेवोबों म्हणितलें: ‘‘ते क्यें राज्य करीत असति?’’ तिया म्हणितलें: ‘‘ना हिवरळीये असतिः’’ गोसावियांचे गुण सांघितलें: तयाचे अंतःकरण वेधलें: आणि वेधु संचरलाः पाहारां रात्रीं निगालेः तें श्रीमूर्तितें देखत जातिः पाहानपटीचि हिवरळीए आलेः दारवंठेंयापासी उभे असतिः तवं हाटवटिये जावेया भट बाहीरे निगालें: दारवंठां भेटलें: क्षेम जालें: भटी म्हणितलें: ‘‘हें काइ लुखदेयाः तू केधवां आलासि?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘ना मीं आतांची आलोः’’ भटीं पुसिलें: ‘‘तुजपासी काही गोसावियांसि दरीसन करावेया असे?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘ना नाहीं:’’ मग तैसेचि दोघै हाटवटिये पानेंपोफळें आणों गेलेः पानेंपोफळें माळ घेउनि आलेः गोसावियांसि पटिशाळें उजवेयाकडें ओटयावरि आसन असेः लुखदेवोबाये गोसावियांतें देखिलेः आणि मागोमति स्तीति अधिकि भरलीः हातां कंपु आलाः पानेंपोफळें माळ पुढें दरीसनां केलीं: तें विखुरलीं: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘वानरेयाः घेया गाः’’ मग भटीं गोसावियांपुढें सरिसीं ठेविलीं: लुखदेवोबा गोसावियांजवळी बैसलेः नावेक होतें: मग स्तीति पातळ जालीः कंपु गेलाः मग गोसावी पुसिलें: ‘‘हें तुम्हां दृष्ट आति?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘ना जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तरि काइ श्रुत आति?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘हो जीः याउपरि लुखदेवोबाये मागिल अवघें सांघितलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आति गाः ऐसीं एकें सुक्षेत्रें आतिः एकीं दोनि वाहिया जातिः भुइं बीया मेळापकु होएः आणि भारआतौनि पिकतिः घुमरींसीं उठीतिः ऐसिया एकी सुभूमिया असतिः तैसें एक अधिकार्ये आइतें असतिः एकें बरडें नागरवेर्‍ही उलेथवीजतिः वाफे घाते पेरजति कीं तेथ बीहीं न निगेः तैसें एक अनाधिकार्ये असतिः तनधैलें वावर असेः तें आंतु बाहीरि तनें दाटलें असेः तथा धाले असेः मग नांगरिजेः दुनिजेः कांसिया फेडिजतिः मग पेरिजेः कुंभचासी तथा भार आतौनि पिकेः ना तैसेचि पेरिजे तरि न पीकेः तैसें एकें अनधिकार्ये उपायें अधिकार्ये होतिः’’ तवं बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः यासी नामापासौनि वेध संचरला?’’ मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसें हें एथचीया नामापासौनि होए कां स्थानापासौनि होएः’’ बाइसीं पुसिलें: ‘बाबाः स्थानापासौनि होए तें कैसे?’’ याउपरि गोसावी रामीचेंया ब्राम्हणाची गोष्टि मनसीळपर्यंत सांघितलीः सांघों सरलीः ऐसीं गोसावी तयाची अधिकारप्रशंसा केलीं: मग गोसावियांसि दुपाहारचा पूजावसर जालाः आरोगणा जालीः गुळळाः विडा जालाः लुखदेवोबासि पांती प्रसाद जालाः मग गोसावियांसि पहूड जाला :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : हंसराजा भेटि :।।:
  • गोसावियांसि राजमढीं ओटयावरि आसन जालें: तवं हंसराजे परमेस्वरपूरौनि आलीः कोणासांघातें तें नेणिजेः गोसावी येतां देखिलीः आणि म्हणितलें: ‘‘हें काइ हंसराजा? तुम्हीं कैसी आलेति? आणि श्रीप्रभुचां ठाइं कव्हण असे?’’ हंसराजीं म्हणितलें: ‘‘जी मीं येइन मां सांगैनः’’ मग साउमीं आलीं: दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलीः गोसावियांजवळी बैसलीः सांगो लागलीः ‘‘जी श्रीप्रभु गोसावी अनेक आग्रह घेतिः अनेक पदार्थ मागतिः तरी मियां काइ द्यावे जी? आणि काइ करावें जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘नाहीं तें एथ सांगौनि पाठवावें कीः मां नाहीं तें एथुनि पाठवीजतें: परि ऐसें तुम्ही येवो नयेः’’ मग गोसावी आबैसातें म्हणितलें: ‘‘बाइः तुम्हीं परमेस्वरपूरां श्रीप्रभुचिये सेवेसि जाः’’ तवं आबैसीं म्हणितलें: ‘‘ना जीः मज वैजोचिये ब्राम्हणीचें बाळातपण करावें असेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘श्रीप्रभुंची सेवा तें अदृष्ट सेवा कीं: तें तुम्हासि कां घडैलः आणि कां होववैलः’’ यावरि गोसावी श्रीप्रभुंची महीमा निरोपू आदरलीः तेणें भटा महादाइसासि ऐसें जालें: ‘जे परमेस्वरपूरासि जावेः’ मग भटीं गोसावीयांतें पुसिलें: ‘‘जी तरि मीं परमेस्वरपूरासि जावों जीः’’ तें गोसावी मानिले :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : तथा(उमाइसा) तांबुळ निराकरणी दरीसना पुढार देणें :।।:
  • तैसेचि गोसावी आसनीं उपविष्ट असतिः तवं उमाइसीं श्रीमुखीचेया तांबुळा हातु वोडविलेः श्रीमुखीचें तांबुळ मागितलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः हें काम्य व्रतः एथचा वीधि ऐसा नव्हेः तुम्हां उचिष्ट तांबुळ घेओं नेः’’ मग भटांकरवी उमाइसांसि विडा देवविलाः उमाइसीं चुळीं पाणी घेतलें: मग म्हणितलें: ‘‘जी जीः मीं एकु मासोपवास गोसावियांचां ठाइं करीनः एथ मासोपवासीं बैसेनः’’ तवं बाइसें कोपलीं: ‘‘हें काइ वो जालें: पोहाणी घाणातेनि तोंडें बाबापासी उपवास सातेरया काइसिया? पैर्‍हां जाः मग उपवास कराः बाबापासी माणुसें येतिः मांदी येइलः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तुम्हीं रावंसगावांसि जाः हें तेथचि येइलः मग हें तुम्हांसि दरीसन देइलः’’ तें ‘‘हो कां जीः’’ म्हणौनि श्रीचरणां लागलीं: एथ दोनि उमाइसें: ये भटांचीं बहीणी उमाइसें: मागां वायनायक जयांसि भेटों आले तियें दुसरीं: वायनायकाची कन्याः महादाइसाची वडील बहीणः तयांचें घर हिवरळीये होतें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : भट प्रोहितद्वारें उमाइ उपहार स्वीकारू :।।: / उमाइसांचा उपहारू स्वीकारू :।।:
  • एकु दीं उमाइसें मासोपवास करावेया आइती करीतें होतीः तवं सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः मासोपवासीं बैसतां आधीं ब्राम्हणां जेउं सुइजेः मग मासोपावासी बैसिजेः’’ मग उमाइसीं आधीला दिसीं गोसावियांसि उपहारालागी विनविलें: तवं दसमीचां दिसीं रात्रीं नास्पशिर्यें जालीं: उदेयांचि गोसावियांचिया दरीसना आलीः अळगौनि दंडवत केलें: आबैसां पुढां दुःख करूं लागलीं: गोसावी आबैसातें बोलाविलें: ‘‘बाइः मासोपवासिये काइ म्हणतें असति?’’ मग उमाइसें गोसावियांपुढें सांघों लागलीं: ‘‘जी जीः मी पापिणी जीः मीया गोसावियांलागी उपहारू आपुलां हातीं निफजवावाः गोसावियांसि पूजा करावीः मियां आपुलेनि हातें गोसावियांसि आरोगणा देयांवीः तें मज दैव नाहीं जीः’’ ऐसें म्हणौनि दुःख करूं लागलीं: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘मासोपवासिये हो पैर्‍हाचें पैर्‍हा असिजेः हात पोळीजेः धुआं डोळे भरीजेतिः हें निकें? तेयापसी ऐसेचि याजवळीके आराइजेः हें देखे तें ओखटे? वृद्धाबाइसें उपहार करीतिः नागदेवो तुमचिया वरिया पूरोहितद्वारें पूजा करीतिः एथौनि तुमची पूजा स्वीकरिजैलः दुःख कां करितें असा? दुःख न कराः’’ तिया म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ गोसावियांसि विहरणा जावेयाचीं प्रवृत्ति होतीः तें भंगलीः गोसावी विहरणा न वचतीचिः मग उमाइसें प्रधान करौनि गोसावी निरूपण केलें: तवं आबैसीं उपहारू निफजविलाः भटीं गोसावियांसि आसन रचीलें: पूजा केलीः बाइसीं ताट केलें: भक्तिजनासि ठाय केलेः उमाइसीं दंडवतें घातलीं: भक्तिजन अनुक्रमे बैसलेः गोसावियांसि आरोगणा जालीः भक्तिजनासि जेवणें जालीं: उमाइसां पांती जेवण जालें: गोसावियांसि गुळळा जालाः विडा जाला :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : तुळसिया भेटिः वृंदावन करणें: आंगुळीव्यथाहरण :।।: / तुळसिया आंगुळीव्यथा हरणें :।।:
  • मग तुळसिये आलेः पानेपोफळे ओळगवोनि दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलें: श्रीमूर्ति अवलोकीत पुढां बैसलेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुम्हीं म्हणे वृंदावन करूं जाणां?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हो काः तरि वेगु कराः हें भंगलें वृंदावन असे तें तुम्हीं कराः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ मग तें वृंदावन करू लागलें: भक्तिजनें दगड आणूं आणूं देतिः एकु खणु निर्वाळीलाः दुसरा दिसी दुसराः तिसरां दिवसीं तिसरा निर्वाळीतां चिरा उचलितां तुळसियाचें बोटावरि पडिलाः तेणें आंगोळी रगडिलीः तेणें तयांसि मुर्छा आलीः तें पडिलेः ‘‘तुळसिया पडिलाः तुळसिया पडिलाः तुळसियासि मुर्छा आलीः’’ म्हणौनि भक्तिजनें बोबाइलीं: व्यापारू राहिलाः एकीं गोसावियांप्रति सांघितलें: तेव्हेळीं गोसावियांसि पाटसरेयावरि आसन असेः गोसावी तेथ बिजें केलें: आणि तेयातें श्रीकरें स्पर्शिलेः श्रीमुखीची पीकी घातलीः तांबुळ बांधलें: कृपादृष्टी अवलोकिलेः आणि तयाचि व्यथा हरलीः सावध जालें: आणि मागुते व्यापार करूं लागलेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आतां व्यापारू पूरो द्या गाः’’ मग गोसावियांसि पटिशाळेवरि आसन जालें: भक्तिजन बैसलेः गोसावियांपासी तुळसिये बैसले असतिः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘काइ गा दुखवलेति?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘ना जीः तें दुख गोसावी अवघे हरीले कीं:’’ तुळसियें वृंदावनाचे तीन खण तीं दिसां निर्वाळीलेः पहारूचि दी व्यापारू करीतिः ऐसें वृंदावन केलें: मग गोसावी तयासि पाठवणी दिधलीः मग प्रवृत्तिविशेषें गोसावियांसि तेथ आसन होए :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : तुळसियातें बोलाउं धाडणें :।।:
  • तुळसियासि कै गोसावियांचें दरीसन जालें होतें हें नेणिजेः एकु दिसीं गोसावियांसि वृंदावन करावाची प्रवृत्ति जालीः तेथ आंगणीं भंगलें वृंदावन होतें: तें देखौनि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एथ वृंदावन करावेः’’ तवं एकी भक्तिजनी ‘‘जी जीः तुळसिया वृंदावन बरवे करूं जाणें: तो टेंभुरणीयेसि असेः’’ ऐसें गोसावियांपुढा सांघितलें: मग गोसावी भट बोलाउं धाडिलेः ‘‘वानरेयाः तयातें बोलावाः जाः’’ भटीं म्हणितलें: ‘‘जीजीः’’ मग भट तयातें आणावेया टेंभुरणीसि गेलेः तेथ तुळसियातें म्हणितलें: ‘‘तुमतें गोसावी वृंदावन करावेया बोलाविलें असेः’’ तिहीं म्हणितलें: ‘‘आमचां घरीं आजी श्राद्धः आजीचां दिसु राहाः मग पाहे जावों:’’ भटीं म्हणितलें: ‘‘तुम्हीं पाहे याः मीं आजी जाइनः’’ तैसेचि भट तियेची दिसीं दीहांचीया दीहा विळूनि मागुते आलेः गोसावियासिं दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलें: उठितां म्हणितलें: ‘‘जी जीः आजी तयातें श्राद्धः तें उदेयां येतिः’’ :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : आपलो भेटि :।।:
  • आपलो तें महादाइसाचे भाउः अवघां दिसु जूं खेळत असतिः एकु दिसी आपलोयें जूं हारविलें: जुआरीं बोकणा बांधलाः द्रव्य देउनि सोडविलें: मग तें घरासि आलेः तवं घरीची अवघें कोपुं लागलीः तयाचीया माता म्हणितलें: ‘‘घरांतुल थाळा नुरेः तांबीया नुरेः वाटे नुरेः अवघा वीळ खेळत अससिः जाये कां ऐसाः एकाधीएकडें निगोनिः ना तरि जैसी रूपै गेलीः जैसा आबैचा नागदेव गेला श्रीचांगदेवराऊळां गोसावियांपाठीं: तैसा एकु दी तू जा कीं?’’ तैसीचि तयां स्तीति जालीः आणि तैसेचि निगालेः ते अहोरात्रें गोसावियांचिया दरीसनासि आलेः गोसावियांसि उदेयाचां पूजावसर जाला असेः सर्वांगीं चंदनः लल्हाटीं चंदनाचां आडाः श्रीकंठीं पुष्पाची माळः ऐसें सपूजीत गोसावी पूर्विलीये सोंडियेवरि चरणचारी उभे असतिः आपलोयें गोसावियांतें देखिलें: दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलें: महादाइसीं काउरवाउरें देखौनि पुसों आदरिलें: ‘‘का रे बाः तू ऐसा? गावीची अवघी निकेनि असति कीं? हा रे जासि ना काः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः हा जू खेळीन्नलाः जू हारविलेः याची माता यांसि कोपलीः हें मायेसि भांडौनि आले असतिः’’ महादाइसें भियालीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तैसें काही नाहीं: हा तान्हैला असेः भुकैला असेः आधी याचा माथां सिंपाः मग पाणी पेयो सूआः हें ने वोलांडीति परि पाणी न पीतिः जेउं सूआः पाठीं गोष्टि पुसाः महादाइसीं तयाचा माथा सिंपीलाः उदक आणिलें: तें न पीयेतीचिः तें म्हणतिः ‘‘मीं गोसावियांचें चरणोदकावांचैनि न पीयें:’’ मग गोसावियांसि सोंडियेवरि आसन रचीलें: गोसावी आसनी उपविष्ट जालें: महादाइसीं चरण प्रक्षाळिलेः मग तें चरणोदक पियालेः तापोशांती जालीः मग महादाइसांपुढें सांघो लागलें: ‘‘मी जूं खेळिनलाः मज जुवारीं बोकना बांधलाः मग घरासि आलाः तवं बाइया म्हणितलें: ‘जाए जाए ऐसाः जैसी रूपै गेली श्रीचांगदेवोराऊळापासीः जैसा आबैचा नागदेव गेला तैसा तूंही जाए का?’ आणि मज स्तीति जालीः मीं निगालाः तो अहोरात्रें आलाः’’ ऐसें तिहीं अवघें सांघितलें: यावरि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः पूर्वि हेही जुं खेळेः हें जूं जिंके परि हारवीनाः’’ याउपरि गोसावी जूतक्रीडेची गोष्टि सांघितली :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : महादाइसा श्रमनीवृति करावेया अनोज्ञा :।।: / तथा श्रमहरणीं महादाइ अनुज्ञा :।।:
  • मग तैसेचि भट भागले म्हणौनि नारायणाचेया देउळा गेलेः तेथ पाठी घातलीः मागिलाकडौनि महादाइसें गेलीं: तयांचीये पाठीवरि पाप देतें असतिः नावेक सांज पडिली होतिः तवं गोसावी लघुपरिहारासि बिजें केलें: परिश्रय सारूनि तैसेचि तेथ बिजें केलें: महादाइसीं गोसावियांतें देखिले आन भियालीं: शंको लागलीः सामोरि आलीं: दंडवतें घातलीं: गोसावियांचिया श्रीचरणां लागलीः महादाइसीं गोसावियांतें पुसिलें: ‘‘जी जीः नागदेवो भागला असेः तरि याची पाठ मज रगडूं येइल जी? ऐसें करूं ये?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘करूं येः आपुलेया सिनलेया भागलेयाचें करूं येः श्रमनिवृत्ति किजेः एकत्र खानपान किजेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः दिवा लावाः’’ ‘‘जी जीः’’ मग महादाइसीं दीवा लाविलाः मग गोसावियांसि तेथ आसन रचीलें: मग गोसावियांसि तेथ आसन जालें: गोसावी महादाइसांकरवी भटांची बरवी श्रमनिवृत्ति करविलीः तेणें भटांचा श्रम निःशेषु गेलाः सुखी जालें: मग गोसावी राजमढासि बिजें केलें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : तथा (महादाइसाचा) उपहारू स्वीकारू :।।:
  • महादाइसीं गोसावियांतें विनविलें: ‘‘जी मज मांद्य पडिले असेः दपनि नाहीं जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एथ माषान्न प्रधान करौनि उपहार करा मग होइलः’’ एकु दीं महादाइसीं गोसावियांतें उपहारालागी विनविलेः गोसावी विनती स्वीकरिलीः महादाइसीं वडे प्रधान करौनि उपहार निफजविलाः गोसावियांसि पूजावसरू जालाः बाइसीं ताट केलें: भक्तिजना अवघेयां ठाए केलेः गोसावी आसनी उपविष्ट जालें: गोसावी अवघेयां ठायाकडें अवलोकिलें: महादाइसीं अवघां ठाइं वडे वाढिलेः आपुलां ठाइं न वाढीतिचिः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः यां अवघां ठाइं वडा असेः एथ नाहीं तें काइ?’’ तवं महादाइसीं म्हणितलें: ‘‘जी मीं द्वारावतिये गेलियें होतियें: तेथ मज वात सूळ उपनला तियें दिउनी मज उडिदान्न न साहेः’’ मग गोसावी आपुलीये ताटिचा वडा आपुलेनि श्रीकरें तेयांसि वाढिलाः आणि महादाइसीं गोसावियांचा ठाइं आणिक वडा वाढिलाः मग आरोगणा करीता गोसावी महादाइसांते अवलोकीलें: तवं महादाइसा वडा जेविती असतिः आणि बाइसाते सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘यासी काही वाढा नाः’’ बाइसी आणिक वडा वाढिलाः ऐसें गोसावी वेळा दोनी पडिताळिलें: गोसावियांसि आरोगणा जालीः अवघेयां जेवणें जालीः गोसावियांसि गुळळा जालाः विडा जालाः मग महादाइसां वडा साहेः तियें दिउनी महादाइसासि उडिदान्नः तथा भलेते अन्न साहेः दपनि जालें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : अवतार प्रतिभिज्ञा करणें :।।: तथा प्रसन्नताकार्य निरूपण :।।:
  • पूर्वि महादाइसीं पुसिलें होतें: ‘‘जी जीः गोसावी कव्हणाचे पुत्र?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हें गुजराते प्रधानाचें कुमरूः’’ मग द्वारावतिहिुनि आलेयां एथ मागौतें पुसिलें: ‘‘जी जीः गोसावी म्हणितलें होतें: ‘बाइः द्वारावतिये जातां तरि तेथ श्रीचांगदेवोराऊळ गोसावियांची गुंफास्थानें पहावीः नमस्करावीः तरि मीं तेथ गेलियें होतियें:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘मां तिया तुम्हीं नमस्करीलीया?’’ महादाइसीं म्हणितलें: ‘‘हो जी नमस्करीलीयाः जी येहीला दिसीं तीर्थ उपवास केलाः गोमतिये आंघोळी केलियाः पारणेयाचां दिसीं: जेथ श्रीचांगदेवराऊळांचीया पाताळगुंफा असति तेथः उपवासींचि गेलीयेः आधीं तेथ सडेसंमार्जन केलेः चौकरंगमाळीका भरीलियाः मग चार्‍ही गुंफा नमस्करीलीयाः तिया दोनि पूर्वाभिमुखः दोनि उत्तराभिमुखः भटीं पुसिलें: ‘‘जी जीः परमेस्वर आणि परमेस्वराचां संबंध या दोहीची उपासना एकचि कीं भिन्न असे?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘भिन्न असेः’’ भटीं पुसिलें: ‘‘जी जीः तें कैसी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘वानरेयाः परमेस्वर भज्यः संबंध वंद्यः’’ भटीं पुसिलें: ‘‘हो कां जीः तरि संबंध वंद्य तो कां जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘वानरेयाः जिया प्रसन्नता परमेस्वर सकळ जीवातें रक्षितां उद्धरितां होएः सकळ जीवातें एकें वेळें आपुलालिया प्रतीति दृश्य होएः जैसे मालखंडा श्रीक्रष्णचक्रवर्ति सकळ लोकीं देखिलेः आणि जिया प्रसन्नता परमेश्वरू सर्व देवताचक्राचां शोधकः वेधकः बोधकः द्रावकः प्रकाशक होएः म्हणौनि प्रसन्नता ऐसां एकु धर्मु इश्वरीचि आतिः जेथ जेथ प्रसन्नता स्फूरे तो संबंध व्यक्तः व्यक्तें संबंधीं अव्यक्त प्रसन्नता परमेश्वरु निक्षेपीतिः मग आपुला संबंध देतिः म्हणौनि संबंध वंद्यः’’ मग भट ‘‘हों कां जीः’’ म्हणौनि श्रीचरणां लागलें: पुढति महादाइसीं म्हणितलें: ‘‘जीः उत्तरामुखें गुंफेचा द्वारीं पुरूख एक बैसले होतें जीः तयांचीये नायकपुडिये आंतुनि सोनियाचिया सरीया निगतिः तोंडीहुनि रूपेयाचिया सरीया सरीया ऐसिया निगतिः हा जीः तरि तें काइ जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तें तयाची लाळ तथा श्वासउस्वासः तें तयाचीया देहीचिया धातबद्ध सरीया जालीयाः’’ तिया म्हणितलें: ‘‘जी जीः मग मियां तयातें पुसिलें: ‘बा आपणेयां नांव काइ?’ तेहीं म्हणितलें: ‘आम्हा नांव महादेवोमुनिः’ मियां पुसिलें: ‘आपण कव्हणाचीयां अनुग्रहितां?’ तेहीं म्हणितलें: ‘ना आम्हीं अनंतमुनिचें:’ मियां पुसिलें: ‘ते कव्हणाचें अनुग्रहितः’ तेहीं म्हणितलें: ‘ना तें श्रीचांगदेवोराऊळा गोसावियांचें:’ मियां पुसिलें: ‘श्रीचांगदेवोराऊळीं कव्हणी परि बिजें केलें तें तुम्ही जाणा?’ तेहीं म्हणितलें: ‘ना तें आम्ही नेणोः’ मियां पुसिलें: ‘तरि तुमचे अनंतमुनि काइ म्हणति?’ तेहीं म्हणितलें: ‘ना पुरूखु आणि विद्या महाराष्ट्रीं असेः तें विद्या तेचि ब्रम्हविद्याः ऐसें म्हणतिः’ मियां पुसिलें: ‘तुम्हीं काइ म्हणा?’ तेहीं म्हणितलें: ‘ना आम्हीं अनंतु अनंतु ऐसें म्हणोः’ याउपरि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः श्रीचांगदेवो राऊळीं कव्हणी परि बिजें केलें: तें तो केवी जाणेः तें कव्हणींचि नेणें: तें तुम्हां एथौनि सांघिजैलः’’ याउपरि गोसावी कामाखेची गोष्टि सांघितलीः पूर्विलीये गोष्टि तवं महादाइसांसि ऐसें उमटलें जें ‘द्वारावतिकार श्रीचांगदेवराऊळ गोसावी तेचि आमचे गोसावीः’ रात्रीं निद्रास्थानां गेलीं: वृंदावनावरि बैसलीः घरीचीं अवघीं असतिः मग आबैसातें अवघी गोष्टि सांघितलीः आणि म्हणितलें: ‘‘आबैः आबैः द्वारावतिकार श्रीचांगदेवराऊळ गोसावी तेचि आमचे गोसावीः’’ आबैसीं म्हणितलें: ‘‘हे काइसेयातवं?’’ महादाइसीं म्हणितलें: ‘‘आमचे गोसावी गुजरातेचेया प्रधानाचे कुमरः हें तवं प्रकटचि कीं: आणि द्वारावतिकार श्रीचांगदेवराऊळीं कामाख्यानिमीत्यें पूर त्यजिलें: तेही गुजरातेचेया प्रधानपुत्राचे पतित उठविलें: म्हणौनि तेचि तें वोः’’ आबैसीं म्हणितलें: ‘‘होए वो रूपैः तेचि तें वोः’’ तयां सुख जालें: तें घरीचां ब्राम्हणीं ऐकिलें: तया आश्चर्य जालें: उदेयांचि गोसावियांचिया दरीसना आलीं: तयातें देखौनि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तैसां स्थानीं तैसिया तैसिया गोष्टि तिया न किजेति कीं: हां गाः हें तुमचें रहस्य कीं: मां आपुलें रहस्य तें आणिकांप्रति प्रकटिजेना कीं:’’ महादाइसीं म्हणितलें: ‘‘हां जीः तें गोसावी केवी जाणति?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जाणिजे ऐसें हेतुधातुतवं:’’ महादाइसीं म्हणितलें: ‘‘हां जीः हेतुधातु कैसेनि जाणिजे?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जाणिजे तुम्हांतु उठिता बैसतां:’’ महादाइसीं म्हणितलें: ‘‘जी तरि आम्हीं काही देखोनाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः पाठीचा वास काइ दिसत असेः’’ मग महादाइसां विस्मयो जालाः महादाइसीं म्हणितलें: ‘‘आबैः आबै आम्हीं जें रात्रीं बोलिलो तें कीं गोसावी जाणीतलें:’’ मग आबैसांहीं विस्मयो जाला :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : महादाइसां भेटि :।।:
  • महादाइसें द्वारावतिहिुनि पाडळीयेसि आलीं परि गोसावी कव्हणी ठाइं राज्य करीत असति ऐसें चोजवलें नाहीं: मग आइकीलें: जें गोसावी हिवरळीये राज्य करीत असतिः मग एकु मोलकै करौनि गोसावियांचिया दरीसना निगालीं: तवं वायनायकेंही मोलकै करौनि बोलाउं पाठविलाः तो मोलकै महादाइसासि वाटें भेटलाः महादाइसीं लक्षिलें: मग पुसिलें: ‘‘आलेयाः तू कोणी ठाउनी येत अससि?’’ तेणें म्हणितलें: ‘‘आइः मीं हिवरळीएहुनि ति असें:’’ तिया म्हणितलें: ‘‘आतां तूं क्यें जात अससि?’’ तेणें म्हणितलें: ‘‘पाडळी गावं तेथ जात असें:’’ तिया म्हणितलें: ‘‘कां जात अससि?’’ तेणें म्हणितलें: ‘‘ना वायनायकुः तयाचि लेंक रूपाइसें: तयातें बोलाउं जात असेः’’ तिया म्हणितलें: ‘‘कां कां?’’ तेणें म्हणितलें: ‘‘तयांचें गुरु आले असतिः’’ महादाइसीं म्हणितलें: ‘‘चालाः तियें आम्हींचिः’’ ऐसीं एरएरां भेटि जालीः मग यांचिये डोइचें पोते घेतलें: तें तयांचीये हातीं दिधलें: तें एरू मोलकै मागुता पाठविलाः आणि निगालीः महादाइसें गोसावियांचिया दरीसना आलीः गोसावियांसि उजविएकडें पटिशाळे पाटसरेयावरि आसन असेः महादाइसांसि गोसावी बैसलेयांचि क्षेमाळिंगन दिधलेः महादाइसीं दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलीः गोसावियांजवळी बैसलीं: गोसावियांपुढें वाटे मोलकै भेटलाः तें सांघितलें: याउपरि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तें तुम्हासि कैसेनि स्फूरलें?’’ तिया म्हणितलें: ‘‘जी जीः तें गोसावीचि स्फूरविलेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसें होएः’’ :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : वायनायका भेटिः स्तीतिः नामकरण :।।:
  • वायनायक उमाइसांसि भेटावया रावसगावींहुनि हिवरळीये तिकवनायकाचिया वाडेयासी आलेः उमाइसें वायनायकांचें पाय धूत होतीं: एकु पावो धुतलाः एकु धुआवा असेः तेतुला मानीं वायनायकें म्हणितलें: ‘‘आबैसे देखोंना?’’ उमाइसीं म्हणितलें: ‘‘रूपैचें गुरु श्रीचांगदेवराऊळ गोसावी आले असति? तेथ गेली असेः’’ नामश्रवण जालें आणि तैसीचि स्तीति जालीः आणि वायनायकें म्हणितलें: ‘‘रूपैचें गुरु श्रीचांगदेवराऊळ आले असति? कव्हणी ठाइं आले असति?’’ उमाइसीं म्हणितलें: ‘‘ना राजमढीं असतिः’’ आणि पाय धुतें आसतिः तो पावो आसूडिला आणि तैसेचि तें निगालेः हाटवटियेसि गेलेः पानेपोफळें: फुलें: माळ घेतलीः गोसावियांचिया दरीसनांसि येत असतिः धोत्रीं अवघें घेतले असेः संभ्रमें धोत्र वरूतें करीतिः तवं लोकु पुसेः ‘‘हे काइ वायनायको?’’ तें म्हणतिः ‘‘ना रूपैचें गुरु श्रीचांगदेवोराऊळ आले असतिः तयांसि भेटों जात असों:’’ संभ्रमें धोत्र वरूतेचि करीतिः तैसेचि गोसावियांचिया दरीसनासि आलेः गोसावियांसि पटिशाळे पूर्विलाकडें रीगतां डावेया हातां पाटसरेयावरि आसन असेः तें संभ्रमें आडचि गोसावियां उजुचि येत होतें: गोसावी ‘‘नायकोः ऐसें याः ऐसें याः’’ म्हणौनि श्रीकरें पाइरियाकडें दाखविलें: मग पाइरीांवरूनि आलेः पानेपोफळें दरीसन केलीः फुलें: माळ ओळगवीलीः दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलें: गोसावियांपासी बैसलेः पालखति घातलीः आणि स्तीति सुभर जालीः भोगिलीः भंगलीः गोसावियांचीये श्रीमूर्तिकडें पाहात म्हणों लागलें: ‘‘जी जीः रूपै गोसावियांचे गुण सांघे तें थोडेः सांघेतिः परि तें सांघो नेणतिः सांघोनि नासीति जीः गोसावियांचां ठाइं दिसत असति तें बहुत जीः तें सांघो नेणेः’’ मग गोसावी तयातें पुसिलें: ‘‘आपणेया नांव काइ?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः वामनुः मातें वामनु वायां वायां ऐसें म्हणतिः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसें तरि तुम्हां नांव वामनाचार्य म्हणाः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः रूपै द्वारावतीहुनि आली तें अखंड गोसावियांची वाट पाहेः गोसावी कव्हणीं ठाइं राज्य करीत असति? ऐसें जाणेंनाः तरि तियेतें बोलाउं धाडूं?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘नायकोः तुम्हां दरीसन जालें: तरि तुमचीये लेंकीसि होआवें कीं: धाडाः’’ मग तेहीं एकु मोलकै करौनि धाडिला :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : भटां भेटि :।।:
  • गोसावी करंजखेडीहूनि भटः इंद्रभट कटकां दानासि पाठविलेः मग भट हिवरळीयेसि आलेः गोसावियांसि भेटि जाली :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : बाइसीं वनदेवो पुसणें :।।: / बळीपु भक्ति कथन :।।:
  • एकु दीं उदेयाचा पूजावसरू जालेयानंतरें गोसावी विहरणा वनदेवां बिजें केलें: आंतु नासी उत्तरीलीकडें गोसावी उभे राहिलेः लिंग अवलोकीत होतेः तेथ हारी तीन लिंगें होतीं: तें बाइसीं देखिलीं: तवं गोसावी मढावरि बिजें केलें: तेथ बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः ये तीनि लिंगे एकत्रें काइसीं?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः हा वनदेवः’’ बाइसीं पुसिलें: ‘बाबाः वनदेव म्हणिजे काइ?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः एकु हिवंजु कोळीः एकु बळीपु गौवळीः हिवंजु कोळी तो महादेवाचा अवतारूः बळीपु गौवळी तो जीउः तयां दोघां मैत्रः तें दोघै पारधीसि जातिः पारधी करौनि येतिः मग जेवीतिः एकु दीं पारधी गेलेः पारधी करौनि आलेः बळीपें म्हणितलें: ‘हिवंजाः मीं तूजसरिसा जेवीनः’ तेणें म्हणितलें: ‘मी कोळीं: तू गवळीः मजसरिसा कैसा जेवीसि?’ तेणें म्हणितलें: ‘होसि कां ना परि मीं तुजसरिसा जेवीनचिः’ ऐसा आग्रह घेतलाः तवं हिवंजें म्हणितलें: ‘माझा शब्द उरोधीसिना तरि मजसरिसा जेवीः उरोधीसि तरि तेव्हेळीचि मीं जाइनः’ तेणें मानिलें: ‘हो कां:’ मग दोघै एकत्र जेविलेः मागौते तें एकु दिसीं पारधी गेलेः पारधी करौनि आलेः उत्तम पारधी लागलीः एतुकेनि हिवंजें तिन्ही भाग केलेः तें तेथ गुप्तवेषें पार्वती होतीः बळीपें म्हणितलें: ‘हे तीनि वांटे कोणासि?’ हिवंजें म्हणितलें: ‘हा तुजः हा मजः हा आपणेयासिः’ तेणें म्हणितलें: ‘हा मजः हा तुजः हा आपणेयां तो कोणा?’ मागौतें तेणें म्हणितलें: ‘हा मजः हा तुजः हा आपणेयासिः’ मागुतें तेणें म्हणितलें: ‘हा मजः हा तुजः हा आपणेयासि तो कोणा?’ मागुतें तेणें म्हणितलें: ‘हा मजः हा तुजः हा आपणेयासिः’ मागुतें तेणें म्हणितलें: ‘हा मजः हा तुजः हा आपणेयासि तो कोणा?’ ऐसें वेळा तीनि उरोधिलें: मग बळीपें म्हणितलें: ‘जोः कोळी तें कोळीचि कीं: मासाकारणें आळुकेंचिः’ ऐसें निष्ठुरें उत्तरें म्हणितलें: आणि हिवंजा अदृश्य जालाः आणि बळीपासी अवस्था प्रकटलीः ‘हिवंजा कोळीयाः दांगटा कोळीयाः’ ऐसें म्हणौनि झाडां खेवें देः ऐसिया नव अवस्था प्रकटलिया झाडा एकातळी पडिलाः निजैलाः डोळेयांचे वाट गरगरा भवो लागलेः डोळे पांढरे केलें: दाहावीं अवस्था प्रकटावीः तवं देवता प्रत्यक्ष जालीः ‘बळीपाः बळीपाः हें काइः’ तेणें म्हणितलें: ‘तू कोण?’ तिया म्हणितलें: ‘नाः मीं हिवंजु कोळीः’ मग तेणें खांदावरि हात घातलेः तथा गळा हात घातलेः तवं हिवंजें म्हणितलें: ‘मागः प्रसन्न जालाः’ तेणें म्हणितलें: ‘ना आतां मियां आणि तुआं ऐसयांचि असावें:’ तेणें म्हणितलें: ‘असौनिः’ यावरि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तो भक्तु होएः परि तें देवता नव्हेः’’ बाइसी पुसिलें: ‘‘कां बाबा?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तेणें नुरउनी आपणपें उमटविलें: देवतीं तयाचा निर्वाळा पाहिलाः परि तयाचीए भक्तिअनुरूप तयासि जे फळ देयावें तें तीते नाहीं: बाइः चैतन्यादि फळें आणि साधनें च्युतिमंतें: मग चैतन्याचीयापस्य विश्वरूपेंचें केंतुलें: विश्वरूपेंचीयापस्य अष्टबहीरवांचें केतुलें: अष्टबहीरवांचीयापस्य शेषशायाचें केतुलें: शेषशायाचेंयोंसि ब्रम्हादिकांचें केतुलें: ब्रम्हादिकांचीयापसि इंद्रादिकांचें केतुलें: इंद्रादिकांचीयापसि गंधर्वादिकांचे केतुलें: गंधर्वादिकांचीयापसि अष्टदेवोनीचें केतुलें: अष्टदेवोनीचीयापसि कर्मभूमीचें केतुलें: मां कर्मभूमीचीयां परिवारांतुल एकी देवतां तिते काइ असे मां काइ देइलः बाइं: तो हा वनदेवोः त्रिधा लोकी प्रतिष्ठिला असें: तें हेः एकी हिवंजाची स्थापनाः एकीं बळीािची स्थापनाः एकीं पार्वतीची स्थापनाः तिघाचिया तीनि स्थापनाः तियें ये तीनि लिगें:’’ ऐसीं गोसावी वनदेवाची कथा सांघितलीः मग गोसावी मढा बिजें केलें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : वनदेवीं देवां: सीक्षां भेटि :।।:/ वनदेवीं आबैसां: उमाइसां भेटि :।।:
  • मग एरी दिसीं गोसावी उदेयाचि विहरणा वनदेवाचेया देउळा बिजें करितां मार्गी दादोसीं विनविलें: ‘‘जी जीः मीं गावांतु वाहाणा सांदू जाइनः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘महात्मे हो गावांत जात असाः मां कव्हणी भेटैल तरि हें आलें ऐसें कव्हणांइ सांघो नकोः’’ दादोस तिकवनायकाचेया घरासि गेलेः तवं तेथ आबैसें: उमाइसें तया भेटावया आली होतीः तयासि खेंवें दिधलीं: ‘‘दादो बैसाः’’ म्हणौनि बैसों घातलें: तयांचे पाप धुतलेः मग आबैसीं पुसिलें: ‘‘दादोः तुम्हीं आलेति तरि काइ गोसावी बिजें केलें असे?’’ तें हासेति परि सांगतिनाः मागुतें म्हणतिः ‘‘दादोः सांघा ना कां:’’ हांसति परि सांगतिनाः ऐसें तीनि वेळ पुसिलें: परि तें न सांघेतिः मग आबैसीं म्हणितलें: ‘‘उमैः हें जाती आणि मागिलीकडुनि यां मागामांगां आम्हीं जावों: गोसावी बिजें केलें असेः’’ दादोसीं उमाइसांतें म्हणितलें: ‘‘उमाएः तुमतें काही सिदोरि असेः तरि सुआः’’ तिया म्हणितलें: ‘‘भातुचि आहेः’’ तेही म्हणितलें: ‘‘आणाः’’ मग तिहीं दधिभातु सिदोरिये सुदलाः लोणीचें घातलें: तें घेउनि गोसावियांचिया दरीसना निगालेः गोसावी आधीं वनदेवांतु बिजें केलें: मात्रा ठेवविलीः मग देउळावरि बिजें केलें: गोसावी देउळावरि उभे होतेः तवं दादोसः आबैसें: उमाइसें आलीं: तयाते येत देखिलें: आणि उतरलेः भेटि जालीः दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलें: गोसावी पुसिलें: ‘‘बाइः हें एथ आलें ऐसें महात्मेनि सांघितलें?’’ तिहीं म्हणितलें: ‘‘ना जीः आम्हीं दादोसातें पुसिलें: ‘दादोः तुम्हीं आलेति तरि काइ गोसावी बिजें केलें असे?’ तें हांसति परि सांघतिनां:’’ म्हणौनि अवघें सांघितलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हांसणें तेंहीं एक सांघणेचि कीं:’’ मग गोसावी लिंगाचिये पसिमीली पूर्वाभिमुख देउळीये बीजें केलें: तेथ आसन जालें: गोसावियांसि पूजा जालीः दधिभाताची आरोगणा जालीः गुळळाः विडाः पहूड जाला :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : हिवरळीये राजमढीं वस्ति :।।:
  • गोसावियांसि उदेयाचां पूजावसर जालेयानंतरें तेथौनि गोसावी हिवरळीयेसि बिजें केलें: गावां वाव्य कोनीं रामनाथीं आसन जालें: बाइसीं श्रीचरण प्रक्षाळिलेः गुळळा विडा जालाः राजमढीं वस्ति जाली :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Jalna : राजमठीं अवस्थान :॥:
  • मग सर्वद्यें म्हणितलेंः येथें अभ्यागते आलींः आतां ग्रामांतर न किजेः मग विळीचां वेळी गोसावी राजमठासि बीजें केलेंः पश्चिमीलिकडे आंतु उत्तरिली भीति पूर्वपश्चिम ओटाः तेथ अवस्थान जालेः मास एक :॥:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींची हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति झाली. व वनदेव येथुन परत आल्यावर १ महिना वास्तव्य (अवस्थान) झाले. मधे काजळा येथे १ दिवस वसति झाली व परत स्वामि जालन्याला आले. त्यानंतरची ही लीळा…)

या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: