Indala (इंदला)

इंदले, ता. जि. अमरावती


इंदेले गावाच्या पश्चिमेस 1 कि.मी. अंतरावर अमरावती मार्गाच्या दक्षिणेकडे टेकाडावर हे स्थान आहे. श्रीगोविंदप्रभूबाबांचे दांडी खालवण्याचे हे स्थान आहे असे काहींचे मत आहे.


जाण्याचा मार्ग :

इंदाला हे स्थान अमरावती कुऱ्हा मार्गावर अमरावती शहरापासून 9 कि.मी आहे. स्थानाजवळ श्रीप्रभू आश्रम सुद्धा आहे.


स्थानाची माहिती :

1. दांडी खालावणे स्थान :

इंदले गावाच्या पश्चिमेस 1 कि.मी. अंतरावर अमरावती रस्त्याच्या दक्षिणेस टेकडीवर देवळात पूर्वाभिमुख स्थान आहे. श्रीगोविंदप्रभूचे दांडी खालाविण्याचे हे स्थान आहे, असे बोलले जाते.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


इंदाला चे स्थान : 1


  • Govind Prabhu Charitra Lila – 238
  • Indala : वडातळी दांडी खालावणेः॥:
  • वडजंबेचीया वडातळी दांडी खालाविली. तेथ आसन झाले: मग गोसावी वडजंबेचीया देवळांतू बीजे केले: वडजंबेसी खेळू केला: आवो मेली: हा कानु: हा नाकः हा डोळा: हा हात: हा पावो: ऐसी व्यतीक्र मे नाव ठेविलीः पूढती अनुक्रमे ठेविली: जया अवयवाचे जे नाव ते तयासी ठेविती:  तीए दिसी वडजंबेसी तथा नांदगावासी वसती जाली:



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: