Hiradpuri (हिरडपुरी)

हिरडपुरी, ता. पैठण, जि. औरंगाबाद


येथील 4 स्थाने - हिरडपूरी येथे एकाच ठीकाणी 4 स्थाने आहेत. हिरडपूरी गावाच्या नैऋत्येकडे 2 कि.मी. अंतरावर गोदावरी नदीच्या काठावर श्री गांधले यांचे शेतात नवीन मंदीरात आहेत.


जाण्याचा मार्ग :

हिरडपुरी हे गाव, पैठण-शहागड मार्गावर पैठणहून आग्नेयेस 27 कि.मी. आहे. व शहागडहून वायव्येस 14 कि.मी. आहे. नवगाव ते हिरडपुरी 11 कि.मी. हिरडपुरीला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. नवगाव-हिरडपुरी मार्गावरील टाकळी अंबड येथे महानुभाव मठ आहे.


स्थानाची माहिती :

1. प्रात:पूजा तथा आरोगणा स्थान :

हे स्थान हिरडपुरी गावाच्या नैर्ऋत्येस चार फर्लाग अंतरावर ओढ्याच्या पश्चिमेस व गोदावरी नदीच्या उत्तरेस श्री. नामदेवराव गांधले यांच्या शेतात उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे ब्रह्मनाथाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात हिरडपुरीहून आंगलेगव्हाणला आले. येथे सकाळचा पूजावसर झाला. आरोगणा झाली. गुळळा, विडा झाला. मग थोडी विश्रांती घेऊन सर्वज्ञ येथून नवगावला गेले. (पू. ली. 556, स्था. पो.)

हे स्थान आंगलेगव्हाणच्या हद्दीतील आहे; परंतु पूर्वीचे गाव गोदावरी नदीच्या महापुरामुळे ओसाड झाले. सध्या हे स्थान हिरडपुरी गावाच्या हद्दीत असल्यामुळे या स्थानाचा हिरडपुरी येथील स्थानांमध्ये समावेश केला आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. वसती स्थान :

हे स्थान हिरडपुरी गावाच्या पश्चिमेस अर्धा फाग गुळंज गावाकडे जाणाऱ्या पायमार्गावर बैलगाडी रस्त्याच्या उत्तर बाजूस पूर्वाभिमुख देवळशत आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे गोवर्धनाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : 1) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात बळेगावहून हिरडपुरीला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. 556, स्था. पो.)

2) नागदेव उपाध्ये यांच्या उपहाराचा सर्वज्ञांनी येथे स्वीकार केला. (पू. ली. 554)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


3. आसन स्थान :

हे स्थान वसती स्थान देवळाच्या दक्षिणेस पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : 1) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूना येथे आसन होते. त्या वेळी नागदेव उपाध्ये बळेगावहून सर्वज्ञांच्यासाठी उपहार घेऊन आले. मग त्यांनी सर्वज्ञांचे श्रीचरण प्रक्षाळण केले. (पू. ली. 320, तु. प्र, स्था. पो.)

2) सर्वज्ञांनी येथेच महाजनांना गृहस्थधर्माचे निरूपण केले. (पू. ली. 555, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


4. परिश्रय स्थान :

हे स्थान वसती स्थान देवळाच्या पाठीमागे पूर्वाभिमुख देवळात आहे.(स्था.पो.)


अनुपलब्ध स्थान :

1, पिवळदरडी आसन स्थान.


हिरडपुरीची एकूण स्थाने : 5


  • Purvardha Charitra Lila –
  • Hiradpuri : गृहस्थधर्म निरूपणः हिरण्यपुरिंये गोवर्धनी वस्ति :।।:
  • उपाध्ये भाजनें घेउनि जातातीः तवं अवघे बळ्हेग्रामीचे महाजन महालखुमीचियां देउळीं बैसले असतिः तवं तयातें गोसावियांपासौनि येतां देखिलें: आणि उपाध्यातें पुसिलें: ‘‘गोसावी कव्हणी ठाइं राज्य करीत असति?’’ उपाध्यीं म्हणितलें: ‘‘ना गोसावी गोवर्धनी असतिः’’ महाजनीं म्हणितलें: ‘‘गोसावियांसि कैसा अवसरू असे?’’ उपाध्यीं म्हणितलें: ‘‘नाः गोसावी आसनी बैसले असतिः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘उठाः या चालाः जावों: गोसावियांतें काही पुसों:’’ म्हणौनि गोसावियांपासी अवघे आलेः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें तेधवा गोसावियांसि आंगणी आसन असेः भक्तिजने गोसावियांजवळी बैसले असतिः महाजनीं गोसावियांतें पुसिलें: ‘‘जी जीः गोसावी आम्हांसि संन्यासधर्म निरूपावे जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘संन्यासधर्मा तुम्हा काइ प्रयोजन? जें हुनि असा तेंचि कां चर्चा ना? तुम्हीं गृहस्थधर्म कां पुसा नाः जे हुनि असा तेथचें काही पुसाः मां संन्यास कां?’’ महाजनीं म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ ‘‘जी जीः तरि गोसावीं आम्हासि गृहस्थधर्म निरूपावे जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हां गा जनः याजनः अध्ययनः अध्यापनः दानः प्रतिग्रहः ऐसें तुमचें नित्यक कर्म केलेया काइ होए? आणि न केलेया काइ होए? ऐसें याचेचि तवं परिज्ञान नाहीं: मां ग्रहस्थधर्मा क्यें असे ठावो?’’ म्हणौनि गोसावी गृहस्थधर्म निरूपिलेः याउपरि तिहीं म्हणितलें: ‘‘जी जीः गृहस्थधर्म जरि ऐसेः तरि संन्यासधर्म तें कैसें असति? हें सांवेयांचि अवघड जीः याची आम्हीं सोयेही नेणों जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बपेयाः एसणालीं फळें एणेंचि पाविजतिः एव्हडालीं फळें तें काइ एर्‍हवींचि?’’ मग तिहीं दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: निगालें: तवं जानोपाध्यें बळ्हेग्रामीहुनि गोसावियांपासी येत असतिः महाजन वाटे बोलत तोखत जात असतिः तवं उपाध्ये भेटलेः ‘‘जानोः जानोः श्रीचांगदेवराऊळ गोसावी साक्षातु वंकनाथुः आणि सत्यामायः’’ एकीं म्हणितलें: ‘‘हें सत्य मां: हें श्रीचांगदेवराऊळ गोसावी काइं तें तू जाणसि?’’ ऐसें तें तोखो लागलें: उपाध्यीं म्हणितलें: ‘‘आरेः काइसा तुझा वंकनाथ? काइसी तुझी सत्यादेवी? गोसावी साक्षात इश्वरः’’ मग उपाध्ये आलेः तें उपाध्यीं गोसावियांपुढें सांघितलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तें तयांचें पर कीं गाः तयापरतें तयातें काही जाणणें असें:’’ मग गोसावियांसि गोवर्धनीं वस्ति जालीः गोसावी उदेयांचि परिश्रयासि बिजें केलेः परिश्रयोसारूनि गोसावी आंगलगव्हाणासि बिजें केलें :।।:
  • (टिप – स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पांचाळेश्वरला आले स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. परत स्वामीं पांचाळेश्वर-बळेगाववरुण हिरडपूरीला आले तेव्हाची ही लीळा. पूढे स्वामीं नवगाव-पैठण-जोगेश्वर/संगमेश्वरकडे निघाले…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Hiradpuri : गोवर्धनी उपाध्यांचा उपहारः आरोगणा :।।: (हिरडपूरी)
  • मग गोसावी हिरण्यपुरिंये गोवर्धनासि बिजें केलें: तेथ चौकीं आसन असेः मग तें उपहार घेउनि आलेः गोसावियांसि बाहीरि देउळाचां दक्षिणीली कोनी आसन जालें: बाइसीं चरणक्षाळण करूं आदरिलें: तवं सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइ राहाः आजी एथचे यजमान करीतिः’’ मग नागदेवोभटीं केलें: मागौते गोसावियांसि चौकीं आसन जालें: पूजावसर जालाः बाइसीं ताट केलें: भक्तिजनां ठाए केलें: ‘‘बाइः यांसि वाढाः’’ तवं तिहीं म्हणितलें: ‘‘जी जीः मज आइसासि तुळसी वाणें असतिः जानो जेविलः’’ जानोपाध्यें म्हणितलें: ‘‘जी जीः मीं जेवीन जीः मज वाढावेः’’ उपाध्यांसि ठाओं केलाः नागदेवभटीं दंडवतें घातलीं: मग गोसावियांसि सपरिवारीं आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः नागदेवभटांसी आज्ञा दिधलीः तयासरिसे उपाध्येंही भाजनें घेउनि निगालेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बटिकाः तुम्हीं राहाः तुम्हीं एथचें कीं:’’ तवं उपाध्यीं म्हणितलें: ‘‘जी मीं यातें बोळउनी मागुता येइनः’’ मग श्रीचरणां लागौनि दोघै निगाले :।।:
  • (टिप – स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पांचाळेश्वरला आले स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. परत स्वामीं पांचाळेश्वर-बळेगाववरुण हिरडपूरीला आले तेव्हाची ही लीळा. पूढे स्वामीं नवगाव-पैठण-जोगेश्वर/संगमेश्वरकडे निघाले…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Hiradpuri : पीवळदरडी आसन :।।: (हिरडपूरी)
  • नावेक गोसावियांसि पीवळदरडीसि आसन जालें: नाथोबा पुसिलें: ‘‘जी जीः पीवळदरडी म्हणिजे काइ?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘मंडळीकाः ये दरडी माती पीवळी म्हणौनिः’’ मग तैसेचि बीजें केलें :।।:
  • (टिप – स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पांचाळेश्वरला आले स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. परत स्वामीं पांचाळेश्वर-बळेगाववरुण हिरडपूरीला आले तेव्हाची ही लीळा. पूढे स्वामीं नवगाव-पैठण-जोगेश्वर/संगमेश्वरकडे निघाले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: