Hingoni (हिंगोणी)

हिंगोणी, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद


येथील 1 स्थान - हिंगोणी गावाच्या पूर्वेकडे वैजापूर रोडच्या बाजुच्या मंदीरात हे स्थान आहे.


जाण्याचा मार्ग :

हिंगोणी हे गाव, पुणतांबा – वैजापूर मार्गावर पुरणगावहून उत्तरेस 5 कि.मी. आहे व वैजापूरहून किंचित् नैर्ऋत्येस 13 कि.मी. आहे. हिंगोणीला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान हिंगोणी गावाच्या पूर्वेस वैजापूर सडकेच्या पूर्व बाजूस आग्नेयाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पुणतांब्याहून हिंगोणीला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. 283, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून धोत्र्याला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


हिंगोणीचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –
  • Hingoli : ठाकुरोपद्रवीं हिंगुणीये प्रयाण/वस्ति :।।:
  • गोसावी विळीचां वोताकडें परिश्रया बिजें केलें: तवं तियें वोतीं पुश्चळनिमीत्यें ठाकुर उपद्रविला देखिलाः गोसावी बाइसातें तेथौनिचि बोलाउं पाठविलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जाः गाः भोजया बाइसातें बोलावाः’’ आलीं: बाइसीं म्हणितलें: ‘‘कां बाबा?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः मात्रा घेयाः’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘एवढेया वेळा काइ बाबा? स्थान बरवें असेः’’ गोसावी ठाकुराचा उपद्रो दाखविलाः तेंही भक्तिजनीं म्हणितलें: ‘‘तरि आम्हासी काइ?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एथ एसणीं हिंसा वर्तलीः आतां एथौनि हें स्थान सोपद्रव जालें: हिंसा वर्ते तियें स्थानीं महात्मेया असो नयेः’’ बाइसीं मात्रा आणिलीः गोसावी बाहिरवाहिरें हिंगुणीये बिजें केलें: तेथ गावांपूर्वे धाबे होतें: तया धाबां वस्ति जाली :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पुणतांब्यावरुण हिंगुणी येथे आले व पुरणगाव-डोमेग्राम कडे निघले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: