Hatnoor (हातनूर)

हातनूर, ता. कन्नड, जि. औरंगाबाद


येथील 1 स्थान - हे स्थान विटखेड गावाच्या पश्चिमेकडे मराठी शाळे जवळ मंदीरात आहे.


जाण्याचा मार्ग :

हातनूर हे गाव, औरंगाबाद – धुळे राज्यामार्गावर कन्नडहून दक्षिणेस 12 कि.मी. आहे. व वेरूळहून किंचित् वायव्येस 18 कि.मी. आहे. औरंगाबाद ते हातनूर 45 कि.मी.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान हातनूर गावाच्या पश्चिमेस गावालगतच मराठी शाळेच्या वायव्येस पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे नरसिंहाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात वेरूळहून हातनूरला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. 377, स्था.पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून कन्नडला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


हातनूरचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –
  • Hatnur : हातनौरीं वसति :॥:
  • हातनौरांआंतु वायव्यें नरसिंहाचे देउळ पुर्वामुखः चौकी गोसावीयांसि आसन जालेः बाइसीं श्रीचरण प्रक्षाळिले : पूजावसर केला : आरोगणा जाली: गुळुळा जाला: विडा जाला: मग तेथ वसति जाली :॥:
  • (टिप – येथे हे पहील्यांदा येने… स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे १५ दिवस वास्त्व्य(अवस्थान) होते. त्यानंतर स्वामी हातनुरला आले व कनाशीकडे निघाले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: