Hartala (हरताळा)

हरताळा, ता मुक्ताईनगर .जि. जळगांव


येथील 1 स्थान - हे स्थान हराताळा गावाच्या पूर्वेकडे 1 कि.मी.अंतरावर तलावाच्या काठावर आहे.


जाण्याचा मार्ग :

हरताळे हे गाव, भुसावळ-मुक्ताईनगर मार्गावरील हरताळे फाट्यापासून दक्षिणेस 2 कि.मी. आहे. मुक्ताईनगर ते हरताळे फाटा 5 कि.मी. भुसावळ ते हरताळे फाटा 27 कि.मी. चांगदेव ते हरताळे 7 कि.मी. हरताळे येथे जाण्यासाठी एस.टी.बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

हे स्थान हरताळे गावाच्या पूर्वेस दोन फलांग अंतरावर तळ्याच्या ईशान्य काठी पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात दुधळेगव्हाणहून हरताळ्याला आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. गुळळा, विडा झाला. (पू.ली. 440 ख.प्र.) त्यानंतर ते येथून टाकळीला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


देवळाच्या पाठीमागचे तळ्यालगतचे देवळातील स्थान निर्देशरहित आहे.


हरताळ्याचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila – 420
  • Hartala : मार्गी व्याघृ पाठीं येणें :।।: / मार्गी व्याघ्रा स्तीति :।।:
  • उदेयाचां पूजावसर जालेयानंतरे गोसावी चांगदेवींहूनि सावळदेवाकडें बिजें करितां मार्गी गुल्म संकुळांतुनि व्याघ्रें गोसावियांतें देखिलें: आणि बाहीरि निगालाः आणि गोसावी अमृतदृष्टी अवलोकीलाः तेणें दृष्टरोखातें सांडिलें: आणि आनंदनिर्भर स्तीति जालीः सत्वातें पावलाः साउमा आलाः बाइसें ‘बाबाः बाबा वाघुः’’ म्हणौनि गजबजों लागलीः ‘‘जी जीः वाघु आलाः’’ म्हणौनि भक्तिजनें भियालीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘भियानाः येवो द्याः हा कोण्हाचें काही न करीः’’ मग गोसावी तो श्रीकरें स्पर्शिलाः ‘‘भीया तें याचां ठाइं नाहीं कीः’’ मग गोसावी सामोरें बिजें केलें: तो पाठीपाठी उगाचि येवो लागलाः मग बाइसीं तयाचीए पाठीवरि आपुली वस्त्रें घातलीः भक्तिजनें आपुलिया कंथा घातलियाः पाठींपाठीं आलाः गावां एकाचां आखरीं पावलेः आणि गोसावी उभे राहिलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘लोकु देखैल आतां राहिजो महात्माः’’ बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः एणें दृष्टरोख सांडिलाः हा कोण्हाचें काही न करी तरि येवो कां दीजे ना?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः हा आतां कव्हणासि उपद्रो न करीः परि याचें स्वरूप भयानक देखौनि लोकु यांसि उपद्रो करीलः’’ गोसावी समीप बिजें करौनिः अनुज्ञा दिधलीः ‘‘महात्माः जाः खेळाः’’ मग तो शरीरस्वभावो देहावधी विसरौनि गेला :।।: (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात कनाशी-भडेगाव-पाचोरा-सेंदुर्णींवरुन आले चांगदेवपूरिला 5 दिवस वास्त्व्य(अवस्थान) झाले. त्यानंतर स्वामी नागापूर-हरताळ्यावरुन गावाबाहेर आले. पुढे स्वामी सावळदबार्यासच्या दिशेने निघाले…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Hartala : हरताळां वसति :॥:
  • गोसावी चांगदेवपूरिहुनि बीजें केलेंः हरताळां तळेयाचीये उत्तरीलीये पाळीये तुंबापासी झाडातळी आसन जालेः गुळुळा जाला: विडा जाला: तेथची पूजावसर जाला : आरोगणा जाली: मग लिंगाच्या देउळी वसति जालीः तया नांव हरतळेश्वरः उदयाचा पूजावसरु जालेयानंतरे गोसावी तेथौनि बीजें केलें :॥: (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात कनाशी-भडेगाव-पाचोरा-सेंदुर्णींवरुन आले चांगदेवपूरिला 5 दिवस वास्त्व्य(अवस्थान) झाले. त्यानंतर स्वामी नागापूर-हरताळ्यावरुन गावाबाहेर आले. पुढे स्वामी सावळदबार्यासच्या दिशेने निघाले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: