Hamrapur (हमरापूर)

हमरापूर, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद


येथील 1 स्थान - हे स्थान हमरापूर गावाच्या उत्तरेकडे दीड कि.मी.अंतरावर एका लहान टेकाडावर मंदीरात आहे. हमरापूर गावात चौकशी करून जावे लागते.


जाण्याचा मार्ग :

नागमठाणहून आग्नेयेस हमरापूर (आवलगाव मार्गे) 5 कि.मी. आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान हमरापूर गावाच्या उत्तरेस दोन फर्लाग अंतरावर रस्त्याच्या पूर्वेस लहानशा टेकडीवर पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे आदित्याचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात तपोवनहून हमरापुरला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. त्यांनी येथे वामन नावाच्या ब्राह्मणाचा उपहार स्वीकार केला.(पू.ली.289, स्था.पो.उ.खा.द.शा.प्र.) दुसऱ्या दिवशी ते येथून भामाठाणला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1) देवळाच्या उत्तरेचे परिश्रय स्थान.


हमरापुरची एकूण स्थाने : 2


  • Purvardha Charitra Lila –
  • Hamarapur : खातिगावीं आदित्यी वस्तिः वामाचां उपहारू स्वीकारू :।।: (हमरापूर)
  • गोसावी खातिगावांसि बिजें केलें: आदित्याचां देउळीं आसन असें: तवं वामन नावें ब्राम्हणु तो तेथ आलाः तेही गोसावियांतें देखिलें: गोसावियांसि दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: मग आरोगणें विनविलेः ‘‘जी जीः मीं गोसावियांसि सकळ परिवारासहित उपहार करीन जीः माझा आवारासि बीजें करावें जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एथचि आणाः’’ मग तिहीं उपहारू निफजविलाः मग तेथचि घेउनि आलेः गोसावियांसि पूजावसर जालाः गोसावियांसि ताट जालें: गोसावी ताटावरि बिजें केलें: बाइसीं दंडवते घातलीः श्रीचरणां लागलीः वामेही दंडवते घातलीं: श्रीचरणां लागलेः गोसावियांसि आरोगणाः गुळळाः विडा जालाः उरला प्रसादु तो भक्तिजनां जालाः आदित्यी वस्ति जाली :।।:
  • (टिप – स्वामींचे खातिगाव येथे हे पहील्यांदा येने.. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे पुणतांबा-हिंगुणि-पूरणगाव-धोतरा-सांगवखेड-वांजरगाव-नागमठाणवरुण खातिगाव(हमरापूर)येथेआले व बादाठान-डोमेग्राम कडे निघाले)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: