Gopalchondhi (गोपाळचोंढी)

गोपाळचोंढी – गांव गोपाळचावडी (सिडको) ता.जि. नांदेड


येथील १ स्थाने - गोपाळचोंढी येथे जुने मंदीर आहे व मंदीरामागे विहीरीचे अवशेषही आहेत .(गोपाळचावडी गावात स्थान आहे)
फरक लक्षात घ्या. (गोपाळचावडी गाव व गोपाळचावडी स्थान वेगवेगळे आहेत)
1. गोपचोंढी नावाचे हे स्थान गोपाळचावडी या गावात आहे जे नांदेड वरून 7 कि.मी. आहे. व (गोपाळ चोंढीये लपवणें)
2. गोपाळचावडी नावाचे स्थान लिंबगाव गावाच्या बाहेर आहे जे नांदेड वरून 17 कि.मी. आहे. (गोपाळांतु खेळू)
3. नाळेश्वर चे स्थान नाळेश्वर गावाच्या बाहेर आहे. (गोपाळ सुखश्रवणें संन्यासिया भेटी:विद्याप्रदान)


जाण्याचा मार्ग :

गोपाळचावडी (सिडको) हे ठिकाण नांदेडहन दक्षिणेस 7 कि.मी. आहे. तेथे जाण्यासाठी सिटी बस सेवा उपलब्ध आहे. तसेच नांदेड-नर्सी मार्गावरील तुपा फाट्यावरूनही गोपाळचावडीला जाता येते. तुपा फाट्यापर्यंत जाण्यासाठी नांदेडहून एस.टी. बस सेवा तथा सिटी बस सेवा उपलब्ध आहे. गोपाळचावडी येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. स्थानाजवळच महानुभाव आश्रमही आहे.


स्थानाची माहिती :

1. गोपाळ चोंढीए लपविणे स्थान :


हे स्थान नांदेड शहरातील गोपाळचावडी या विभागात एम.आय.डी.सी. च्या दक्षिणेस उत्तराभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभुंना एकांकामध्ये येथे विहिरीच्या काठी आसन होते. त्यावेळी गावातील गोपाळ गाई,गुरे पाणी पाजण्यासाठी विहिरीवर
घेऊन आले. प्रत्येक गोपाळ आपली शिदोरी, काठी, घोंगडे, पावा, वाहाणा ठेवून विहिरीत पोहण्यासाठी जाई. असे सर्व गोपाळ विहिरीत पोहण्यासाठी उतरले आणि अदृश्य झाले. गाई,गुरांनी पाणी पिले. गोठाणात बसल्या. तेथून रानात गेल्या. रानातून आपापल्या घरी गेल्या. गावातील लोक म्हणू लागले, “गाई,गुरे आली; पण गोपाळ का आले नाहीत! तरी चला, आपण त्यांचा शोध घेण्यास जाऊ या.” असे म्हणून सर्वजण गोपाळांचा शोध घेण्यास निघाले. संपूर्ण रानात फिरले; परंतु गोपाळांचा शोध लागला नाही. मग विहिरीजवळ आले. सर्वज्ञ येथे बसलेलेच होते. या ठिकाणी गोपाळांचे सर्व साहित्य पाहून त्यांनी सर्वज्ञांना विचारले, “येथे गोपाळ होते का?” सर्वज्ञ म्हणाले, “होते”. “कुठे आहेत ते?” लोकांनी विचारले, तेव्हा सर्वज्ञांनी विहिरीकडे बोट दाखविले. लोक म्हणाले, “तरी ते दिसत नाहीत!” सर्वज्ञ म्हणाले, “आपापल्या गोपाळाचे नाव घेऊन बोलवा.” मग ते सर्वजण आपापल्या गोपाळाचे नाव घेऊन बोलावूलागले. त्याबरोबर एक एक गोपाळ पाण्यातून वर येऊन आपापले साहित्य घेऊन निघून जाई. ते लोक त्यांना विचारत, “तुम्ही कोठे होता?” गोपाळ म्हणायचे, “आम्ही सर्वज्ञांच्यापाशी होतो.” हा सर्व प्रकार पाहून सर्व लोक आश्चर्यचकित झाले. (पूर्वार्ध लीळा 53, स्थान पोथी)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


गोपचोंडी मंदिर ड्रोन दृश्य
ज्या विहिरीत स्वामींनी गोपाळ मुलांना लपविले होते ते विहीर

गोपाळचोंढीचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila – 53
  • Gopalchondhi : गोपाळ चोंढीये लपवणें :।।: गोपाळ चोंढीये प्रकाशणें :।।: 
  • गोसावियांसि गावीं एकी अरण्यामाजी वीहिरीसि रवणीये आसन असेः चोंढी ऐसीं वीहिरीः तेथ गोपाळः गाइ पाणिया घेउनि आलेः जो ये तो आपुलें घोंगडें: डांगः पावाः मोहरीः वाहाणाः जाळीः पागोटे ऐसें अवघें फेडुनि ठेवीः आणि चोंढयेआंतु उदकामध्यें पव्हावेया उडी घालीः तो अदृश्य होएः यापरि अवघेचि जालें: गाइ हळी पाणी पियालाः गोठाणी बैसलीयाः गोठाणीहुनि आपसेयाची राना गेलियाः विळीचां आपसेयाची गावांतु आलीयाः आपुलेया घरां गेलियाः तवं गोपाळ सवें नाहीं: घरोघरीं अवसरी करीतिः गांवीचीं माणुसें एर एरांतें शोधीत आलीं: एर एरातें पुसेः ‘‘हां गाः तुमचा गोपाळु आला?’’ एर म्हणेः ‘‘नाः नाहीं आलाः’’ ऐसा अवघां नाहीं म्हणितलें: ‘‘हां गाः गाइ आलीयाः गोपाळ न येतीचि तें कां:’’ ‘‘तरि चालानाः गोपाळाचीए सुधी जावों:’’ मग तें अवघेचि गोपाळाचीए सुधीं निगालेः रानवन हिंडीनलेः परि गोपाळ न देखतीचिः मग अवघे शोधीत तेथ आलेः तवं तेथ गोसावियांतें आसनीं उपविष्ट देखिलें: आणि तयांचीं अवघीं उपकरणें कांठीं: डांगाः कांबळेः जाळीः मोहरीः पावेः वाहाणाः ऐसें देखिलीं: तयांचीयां पांघुरणाचे पुंजे देखिलें: मग तिहीं पुसिलें: ‘‘हां जीः एथ गोपाळ पव्हत होतें कीं?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘होतेः’’ तिहीं पुसिलें: ‘‘जीः तें क्यें असति?’’ गोसावी वीहिरीउजू श्रीकरें दाखविलें: आणि म्हणितलें: ‘‘एथ असतिः’’ भितरीं रीगौनि पाहिलें: परि न देखतिः तिहीं पुसिलें: ‘‘जी जीः तरि काही देखिजेनाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आपुलालेया जयाचें जें नांव तें घेउनि बोलावाः तो तो निगैलः’’ मग तें बोलाउं लागलेः जो जेयाचा तो तेयाचेनि नांवें पाचारीः ‘‘सांगेया’’ म्हणतिः आणि तो उदकांतुनि निगेः ‘‘सांयां:’’ आणि तो निगेः ‘‘म्हायंा:’’ तो निगेः ‘‘कायंा:’’ तो निगेः ‘‘रामेयाः’’ तो निगेः ‘‘नाया’’ तो निगेः ‘‘सामेयाः’’तो निगेः ‘‘कामेयाः’’ तो निगेः ‘‘गामेयाः’’ तो निगेः जो निगे तो डांग घेः कांबळेः मोहरीः पावाः पागोटेः वाहाणाः जाळी ऐसें आपुलें अवघें घेः आणि धाव घेः मग जायेः आणिकातें बोलावीतिः तेही तैसेचि निगतिः यापरि अवघेचि निगालेः जो निगे तयातें तें पुसतिः ‘‘आरे तू कोठे होतासि?’’ तो म्हणेः ‘‘मी या गोसावियांपासी होतोः’’ तें म्हणतिः ‘‘तरि हें गोसावी बाहीरि असति कीः’’ गोपाळ म्हणतिः ‘‘ना मां: गोसावी आम्हाचिपासी होतेः’’ ऐसें अवघेयातें पुसिलें: तयां अवघेयां लोका आश्चर्य जालें: मग गोसावी तयातें म्हणितलें: ‘‘आपुले आंवघे गोपाळ सांभाळाः मग तेही दंडवत केलें: गोसावियांतें विनविलें: गावांतु नेलें: पूजा केलीः आरोगणा दिधलीः मग पहूड जालाः उपहूड जालाः मग प्रभातें बिजें केलें: महादाइसीं पुसिलें: ‘‘जी जीः तें क्यें होते?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘अवगळां एकीं धरिले होतेः’’ :।।: (हें गोष्टि प्रतिष्ठानीं धाइ सलदीं लपवणें: या प्रसंगावरि गोसावी बाइसाप्रति सांघितलीः तथा एळापूरीं बाइसाप्रति सेवाळेवीहिरीवरि अनुवादिलीः।।:)

Gopchondi Sthan Darshan by Sarang Dhar || Jay Krishni Mahanubhav ||



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: