Gopalchavdi (गोपाळचावडी)

गोपाळचावडी (लिंबगाव) ता.जि. नांदेड


येथील 1 स्थान - गोपाळचावडी येथे मोठे मंदीर आहे. (गोपाळचावडी गाव व गोपाळचावडी स्थान वेगवेगळे आहेत)
गोपाळचावडी स्थानावर जाताना रोडचे बाजुला एक नवीन मंदीर आहे परन्तु ते निर्देशरहीत आहे. 


जाण्याचा मार्ग :

गोपाळवाडी हे ठिकाण, पूर्णा-नांदेड मार्गावरील गोपाळचावडी थांब्यापासून दक्षिणेस 600 मीटर आहे. पूर्णेहुन पूर्वेस गोपाळचावडी 17 कि.मी. आहे व नांदेडहुन पश्चिमेस 17 कि.मी. आहे. परभणी ते गोपाळचावडी 47 कि.मी. मनमाड हैदराबाद लोहमार्गावरील लिंबगाव रेल्वे स्थानकापासून नैर्ऋत्येस 3 कि.मी. अंतरावर गोपाळचावडी हे ठिकाण आहे. ढाकेफळहन रांजणी रेल्वेस्थानकामार्गे लिंबगावला जाता येते. ढाकेफळ ते रांजणी रेल्वेस्थानक 14 कि.मी. आहे. गोपाळचावडी येथे जाण्यासाठी एस.टी.बस सेवा उपलब्ध आहे. तसेच नांदेडहून लिंबगावला सिटी बस सेवा उपलब्ध आहे. गोपाळचावडी येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. आरोगणा स्थान :

हे स्थान उत्तराभिमुख देवळात आहे.


लीळा : लिंबगाव, नाळेश्वर, कलमुला, पिंपळा या चार गावांच्या सीमांचे हे ठिकाण. येथे पाण्याचीही सोय असल्याने चारीही गावचे गोपाळ या ठिकाणी गाई-गुरे चारावयासाठी घेऊन येत असत. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू एकांकामध्ये या मार्गाने जात होते. त्यावेळी येथे गोपाळ रानभेरीचा खेळ खेळत होते. सर्वज्ञ गोपाळांना म्हणाले, “आम्ही आपल्यामध्ये खेळण्यास यावे काय?” गोपाळ म्हणाले, “यावे जी” मग सर्वज्ञ गोपाळांच्यामध्ये रानभेरीचा खेळ खेळू लागले. ज्या गोपाळांच्या पाठीवर सर्वज्ञ बसायचे, त्या गोपाळास सखानंद मिळत असे. अशा प्रकारे सवे गोपाळांच्या पाठीवर सर्वज्ञ बसले. सर्वांना सुखानंद दिला. मग गोपाळांनी आपआपल्या शिदोऱ्या सोडल्या. त्यातील चांगले चांगले पदार्थ निवडले, सर्वज्ञांना आरोगणा दिली सर्व गोपाळांनीही सर्वज्ञांच्या सोबत भोजन केले. त्यानंतर सर्वज्ञ येथून निघून गेले. (पू.ली. 52, स्था.पो) चारी गावच्या गोपाळांचे गाई-गुरे राखण्याचे हे सार्वजनिक ठिकाण, म्हणून याला ‘गोपाळचावडी’ असे म्हणतात,

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

गोपाळचावडी मंदिर परिसर

गोपाळचावडीचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila – 52
  • Gopalchavdi : गोपाळांतु खेळू :।।: गोपाळ सुखश्रवणें संन्यासिया भेटी : विद्याप्रदान:।।: 
  • गोपाळांतु खेळु गोसावी मार्गे बीजें करितातिः तवं गोपाळ राणेभेरीयांचा’ खेळु खेळत होतेः गोसावीं तेथ बीजें केलें: “हां गा गोपाळ होः हे तुम्हांआंतु खेळों ऐओं?” तीही म्हणीतलें: “या का जीः” सर्वज्ञ म्हणीतलें: “हें राणे होइलः तुम्ही भेरी होआः” “जी जीः” गोसावीं तेयांतु खेळों आदरिलेंः तवं गोसावीयांचेया गडेयावरि पेणा आलाः हे जाउनि तेयांचीये पाठीवरि बैसलेः आणि तेयांसि स्तीति जालीः पेणा’ उतरलाः परि तो पाठीवरौनि नुतरीः एरें म्हणीतलेंः “हा रेः पेणा उतरला तरि तुं का पाठीवरौनि नुतरसि?” “आरेः माझीये पाठी देओ बैसलाः की मज सुख आनंदु होतु असेः” तवं एकें म्हणीतलेंः “आगा देवाः माझीये पाठीवरि बैस कांः” आणि हे तेयाचीये पाठीवरि बसलें तेयासि सुखचि जालेंः मां आणी म्हणीतलें “माझीये पाठीवरि बैस कांः’ म्हणौनि हाचि खेळु प्रवर्तलाः ऐसें आवघीयांचीए पाठीवरि आरोहण केलेंः आवघयांसि सुख आनंदु दीधलाः मग गोसावीं बीजें करूं आदरिलेंः गोपाळी गोसावीयांतें वीनवीलेंः “जी जीः गोसावी आरोगण करावीः मग गोसावीं बीजें करावेंः” मग आवघां मोटा सोडिलीयाः गोपाळी काला केलाः “एई गा देवाः जेउंः” आपुलालीये मोटेचा बरवा बरवा पदाधु नीवडीलाः मग गोसावीयांसि वोळगविलाः गोसावीयांसि आरोगण जालीः अवघे गोसावीयांचीये पांती जेविलेः मग हे तेथौनि नीगालेंः।। मग ते एकमेकांप्रति सुखानंदु म्हणौनि अनुमोदों लागलेः एरू म्हणेः “आगाः माझीए पाठीवरि देओ बैसलाः मां मज सुखानंदु काइ होए गाः” तवं मार्गे सन्यासी एक जात होते तेहीं आइकिलें मग तेही म्हणीतलें: ‘काइ पां आनंदु सुख? तें हे केवि जाणति? ए गोवळरूएं: गोरूवें राखतिः अनंदु” हे ब्रह्मवाचाः हा सबदु वीद्वांसाचाः हा सबदु हे गोवळे केवि जाणति?” मग तेयांतें ते पुसतिः “हा गाः गोवळे होः सुखानंदु काइसा गा?” तेही म्हणीतलेंः “आगाः आम्हांआंतु देवो एक आलाः आमसी खेळीनलाः आमचीए पाठीवरि बैसलाः तो जेयाचीये पाठीवरि बैसे तेया सुखानंदु होएः आम्हांआंतु जेविलाः आम्हां सुखानंदु. दीधलाः मग गेलाः” तेहीं पुसिलेंः “तो देवो कवणीकडे गेला?” “ना एणेंचि मागेंजातातिः” तैसेचि ते तेणें मार्गेनीगालेः तवं एका वृक्षाखालि हे आसनी बैसलें होतेंः तीही एउनि दंडवत घातलेंः श्रीचरणां लागले आणि तेयां स्तीति जालीः सर्वतें म्हणीतले :”ते अद्यापि द्रावडदेसी आचारीए’ होउनि वर्तत असतिः”।।

Gopalchawadi & Naleshwar Sthan Darshan by Sarang Dhar || Jay Krishni Mahanubhav ||



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: