Ghumandev (घुमनदेव)

घुमनदेव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर


येथील 1 स्थान - हे स्थान घुमनदेव गावाच्या दक्षिणेकडे टाकळी-भोकर रस्त्याच्या लगतच मंदीरात आहे.


जाण्याचा मार्ग :

घुमनदेव हे गाव, भोकर कमालपूर मार्गावर भोकरहून ईशान्येस 5 कि.मी. आहे व कमालपूरहून नैऋत्येस 3 कि.मी. आहे. घुमनदेवला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

हे स्थान घुमनदेव गावाच्या दक्षिणेस टाकळी व भोकर सडकेच्या कडेला उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे घुमनदेवाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात डोंबेग्रामहून घुमनदेवला आले. त्यांना येथे आसन झाले. त्यानंतर ते येथून भामाठाणला गेले. (स्था. पो. उ. को. प्र.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


घुमनदेवचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –
  • Ghumandev : घुमणदेवीं आसनः तस्करभय कथन :।।:
  • एकु दीं गोसावी घुमणदेवां बिजें केलें: तेथ धाब्यावरि आसन जालें: नावेक आसन होतें: मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ए स्थानी चोर असति गाः इकडौनि चोरी करूनि या स्थाना येतिः आतां येतिः एथौनि निगीजेः’’ मग गोसावी तेथौनि बिजें केलें :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि डोमेग्राम येथुन घुमणदेव येथे प्रथमच आले. येथे स्वामींचे आसन जालें…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: