Ghotan (घोटण)

घोटण, ता. शेवगाव, जि. अहमदनगर


येथील 1 स्थान - हे स्थान घोटन गावाच्या पूर्वेकडे जवळच मळएगिरीच्या (महादेवाच्या) मंदीरातील चौक म्हणजे हे स्थान होय.


जाण्याचा मार्ग :

घोटण हे गाव, शेवगाव पैठण मार्गावर शेवगावहून ईशान्येस 11 कि. मी. आहे व पैठणहून नैर्ऋत्येस 18 कि. मी. आहे. चापडगावहून वायव्येस घोटण पायमार्गे 10 कि. मी. आहे. चापडगावहून घोटण (शेवगाव मार्गे) 26 कि. मी आहे. घोटणला जाण्यासाठी एस.टी.बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान घोटण गावाच्या पूर्वेस गावालगतच मळएगिरीच्या (महादेवाच्या) पश्चिमाभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात खिर्डीहून घोटणला आले. त्यावेळी त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते (पू. ली. 305 ख प्र.) व उत्तरार्ध काळातही खिर्डीहूनच घोटणला आले. त्यावेळीही त्यांचे येथे एकच रात्र वास्तव्य होते. (स्था. पो.) दोन्हीही वेळेच्या एक-एक दिवसांच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ येथून चापडगावला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1. देवळाच्या पूर्वेचे परिश्रय स्थान.


घोटणची एकूण स्थाने : 2


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: