Ghogargaon (घोगरगाव)

घोगरगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर


येथील 1 स्थान - हे स्थान घोगरगांव गावाच्या पूर्वेस गावा लगतच ओढ्याच्या पलीकडे देवळात आहे.


जाण्याचा मार्ग :

घोगरगाव हे गाव, अहमदनगर सोलापूर मार्गावर अहमदनगरहून 36 कि. मी. आहे. मांडवगण ते घोगरगाव 11 कि. मी. आहे. मांडवगणहून आग्नेयेस घोगरगाव (खिडकेवाडीमार्गे) 7 कि. मी. आहे. हा पायमार्ग होय. मांडवगणहून घोगरगावला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. घोगरगाव येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान घोगरगावच्या पूर्वेस गावा लगतच ओढ्याच्या पलीकडे न्यू बँक ऑफ इंडिया समोर अहमदनगर-सोलापूर मार्गाच्या उत्तर बाजूस पूर्वाभिमुख देवळात आहे. देवळाच्या सभामंडपाला पूर्वाभिमुख, उत्तराभिमुख, दक्षिणाभिमुख अशी तीन दारे आहेत. मुख्य प्रवेशद्वार दक्षिणाभिमुख आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात एकदा व उत्तरार्ध काळात एकदा असे एकूण दोन वेळा घोगरगावला आले. दोन्हीही वेळेस ते मिरजगावहून घोगरगावला आले. दोन्हीही वेळेस त्यांचे येथे एक-एक रात्र वास्तव्य होते. दोन्हीही वेळेस ते येथून मांडवगणला गेले. (पू.ली.351, उ.ली.272,स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


घोगरगावचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: