Ghogargaon (घोगरगाव)

घोगरगाव, ता. नेवासा, जि. अहमदनगर


घोगरगांव गांवाच्या पूर्वेकडच्या नाल्याच्या काठावरील मंदीरात हे 1 स्थान आहे.


जाण्याचा मार्ग :

टाकळीभानहून ईशान्येस घोगरगाव 5 कि.मी. आहे व जुने घोगरगाव 7 कि.मी. आहे. जुने घोगरगावपर्यंत जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान जुन्या घोगरगावच्या वायव्येस गोदावरी नदीच्या दक्षिण काठी महादेवाच्या पूर्वाभिमुख देवळापुढे चौकात नंदीच्या डाव्या (दक्षिण) बाजूस आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात टाकळीहून नेवाशाला गेले व तेथून रात्री घोगरगावला आले. गावाबाहेर उभे राहून भक्तजनांना सुनेभुंकी करायला लावली. त्यानंतर सर्वज्ञ येथे आले. या ठिकाणी पहूड झाला. सकाळी पूजावसर झाला. मग ते येथून डोंबेग्रामला गेले. (उ.ली.215,स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1. सोंडीवरील आसन स्थान.

2. परिश्रय स्थान.

3. नदीच्या घाटावरील आसन स्थान.


घोगरगावची एकूण स्थाने : 4


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: