Ghatali Ghat (घटाळी-घाटातील स्थान)

घटाळी (घाटातील स्थान) ता. पातूर जि. अकोला


येथील 1 स्थान - येथील स्थान घटातील टेकडीवर आहे.


जाण्याचा मार्ग :

चिंचाळ्याहून ईशान्येस घटाळी दोन कि.मी. आहे.


स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

हे स्थान चिंचाळ्याच्या स्थानापासून ईशान्येस 2 कि. मी. अंतरावर घाटाच्या उत्तर सोंडीवर पूर्वाभिमुख देवळात आहे. स्थानाच्या भोवती आसपास घनदाट जंगल आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे पाणपोई होती.

लीळा: सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभुंना एकांकात आलेगावहून इसवीला जाताना येथे आसन झाले. त्यावेळी रामदेव ऊर्फ दादोस आले. त्यांची व सर्वज्ञांची भेट झाली. रामदेवांनी पाने व सुपाऱ्या सर्वज्ञांना अर्पण केल्या (पू. ली. 88, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


घाटातील स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila – 88
  • Ghatali  : मार्गी पव्हे आसन : दादोसां भेटि :।।:
  • विसैयेचा मागीं घार्टी पव्हे: तेथ तिसरा प्रहरी जवं गोसावियांसि आसन असे : तवं मागीलीकडौनि दादोस पानेंपोफळे घेउनि आले: गोसावियांसि दर्शन जालें: आणि मात्रा ठेउनि दंडवते घातली : श्रीचरणां लागले: समीप आले: क्षेमालिंगन दिधलें: पानेंपोफळे ओळगविली: गोसावी आरोग्य पुसिलें: तेही आपुलें क्षेम सांघितलें: मग गोसावियांसि गुळळा करूं घातला: पोफळें फोडिली: फोडी ओळगवीलिया: विडिया करौनि दिधलिया: मग गोसावियांपासौनि तया तैसी स्थिति जाली: भोगीली: भोगु सरली: मग दादोसी विनविले: “जी मज गोसावियांपासुनि स्थिति होआवी जी:” मग सर्वज्ञ म्हणीतलें: “होइल:” दादोसी म्हणीतलें : “हो कां जी:” मग दादोसासि स्थिति होए: आणि तयापासुनि आणिकासिही होए : मग गोसावी तेथौनि दादोसांसहित विसैये बीजें केलें: विसैयेजवळी गावांपूर्वे पोखरणीचिये पश्चिमीली पाळी तीन देउळे : माझारि लिंगाची देउळी तेथ आसन जालें :।।



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: