Gevrai (गेवराई)

गेवराई, ता. गेवराई, जि. बीड.


येथील स्थान हे गेवाराइ शहराच्या नगरपालीका पार्कमधे असलेल्या मंदीरात हे 1 स्थान आहे.


जाण्याचा मार्ग :

गेवराई हे शहर, मलकापूर सोलापूर राज्यमार्गावर बीडहून उत्तरेस 32 कि.मी. आहे, व शहागडहून दक्षिणेस 12 कि.मी. आहे. (1) बागपिंपळगाव ते गेवराई 3 कि.मी. (2) शेवगाव ते गेवराई 64 कि.मी. (3) जालना ते गेवराई 71 कि.मी. (4) औरंगाबाद ते गेवराई 96 कि.मी. गेवराई येथे जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान गेवराई बसस्थानकापासन एक फाग अंतरावर बाजारतळाजवळ असलेल्या नगरपालिका उद्यानात पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे जोगेश्वरीचे देऊळ होते. त्या देवळात चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात आगरनांदुरहून गेवराईला आले. या ठिकाणी संध्याकाळचा पूजावसर झाला. व्याळी झाली. मग रात्रभर येथेच मुक्काम झाला. (पू. ली. 561 ख. प्र. स्था. पो.) दुसऱ्या दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यावर ते येथून बागपिंपळगावला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

(1) देवळापुढील पटीशाळेतील आसन स्थान

(2) देवळाच्या पूर्व पटीशाळेतील आसन स्थान.

(3) देवळाच्या उत्तरेचे परिश्रय स्थान.

(4) देवळाच्या वायव्येचे लहान देवळातील आसन स्थान.

(5) पिंपळगाव मार्गीचे माळावरील आसन स्थान.


चे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila – 522
  • Gevrai : गेउरवाविये जोगेस्वरिये वस्ति :।।:
  • तेथौनि गोसावी गेउरवाविये बिजें केलें: तेथ जोगेस्वरीये पटिशाळेसि उजविएकडें आसन जालें: बाइसीं चरणक्षाळण केलें: पूजावसरू भितरीं चौकीं जालाः आरोगणाः गुळळाः विडा जालाः वस्ति जालीं :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेथुन स्वामी संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य(अवस्थान)होते. तेथुन स्वामी नंदापूर(नांदौर)ला आले. येथे स्वामींचे १५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. तेथुन स्वामी गेवराइला आले. तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 523
  • Gevrai : पिशाचीका निर्गमनीं/अनुवर्जनी प्रत्युत्तर देणें :।।:
  • एरी दी गोसावियांसि भितरीं चौकीं उदेयाचां पूजावसर जालेंयानंतरें गोसावी आंगीटोपरें लेउनी आंगणीं आसनीं उपविष्ट असतिः तवं पिशी एकीं आलीः हाती वनें: भितरीं गेलीः देवतेचिये डोइयेवरि वनें ठेविलेः दिवेयाचेनि तेलें आपुलें तोंड माखिलेः डोइ उजू केलीः कोळसेयाचें काजळ केलें: तें काजळ डोळां सुदलें: देवतेचें सेंदुर कपाळीं लाविलें: निर्मालकु डोइये खोविलाः आणि ऐसीं मसखैजेः खोबैजेः स्वीकारता गोसावियांतें म्हणितलें: ‘‘देवन्होः मीं तुमतें बोळवीत येइनः तुम्हा सांघातें येइनः द्या पोतें:’’ आणि ऐसीं मुरकैजेः खोबैजेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः द्या पोतें: जाडी वोपाः’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘हो कां बाबाः’’ मग बाइसीं जाडीपोतें दिधलें: गोसावी बिजें केलें: तें पुढें पुढें चालेः आणि मागुती उभी राहेः नावेक खोबैजेः फुरकुटैजेः गोसावी समीप येति आणि ऐसीं खोबैजेः गोसावी श्रीनेत्रें खुणावींति आणि मागुती पुढें जायेः आणि उभी राहेः मुरूकुटैजेः फुरकुटैजेः ऐसीं आधीएकीं वाट आलीः निराश देखौनि मग म्हणितलें: ‘‘देवन्होः आतां मीं नयेः आपुले घेया पोतें: मीं राहीनः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘कां न या?’’ तिया म्हणितलें: ‘‘ते मियां तुमतें झाकविलें: तथा चाळविलें कीं:’’ गोसावी इखितु हास्य केलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘कोणें कोणां चाळविलें: कोणें कोणातें झांकविलें तें जाणिजैल कीं: तुम्हींचि मरतें आलेतिः आतां तुम्हींचि मरतें जालः’’ मग भक्तिजनी पींपळापासी मात्रा घेतलीं: तिया म्हणितलें: ‘‘देवन्होः आतां मीं जाइनः’’ गोसावी अनुज्ञा दिधलीः मग तें गेली :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेथुन स्वामी संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य(अवस्थान)होते. तेथुन स्वामी नंदापूर(नांदौर)ला आले. येथे स्वामींचे १५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. तेथुन स्वामी गेवराइला आले. तेव्हाची ही लीळा…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: