Gangapur (गंगापूर)

गंगापूर, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद


येथील 1 स्थान - हे स्थान गंगापूर गांवाच्या दर्ग्यापासून 1 कि.मी. अंतरावरच आहे. 


जाण्याचा मार्ग :

गंगापूर हे गाव, अहमदनगर-औरंगाबाद मार्गावरील कायगावपासून किंचित् वायव्येस 8 कि.मी. आहे. (1) औरंगाबाद ते गंगापूर 43 कि.मी, (2) अहमदनगर ते गंगापूर 80 कि.मी. (3) नेवासा ते गंगापूर 24 कि.मी. (4) जुने जामगाव ते गंगापूर 7 कि.मी. गंगापूरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

गंगापूर गावाच्या ईशान्येस दर्गा आहे. त्या दर्याच्या ईशान्येस अर्धा फर्लाग अंतरावर वीजेच्या खांबापासून आग्नेयेस 13 फूट अंतरावर हे स्थान आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात जामगावहून गंगापूरला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. 389 ख प्र.) दुसऱ्या दिवशी ते येथून फुलशिवऱ्याला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


गंगापूरचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –
  • Gangapur : मार्गी पदुमनाभी भेटिः गांडापूरीं गांगापूरां वस्ति :।।:
  • पदुमनाभीदेवाची संबंधीये तयातें राखो लागलीः गोसावियांपासी जाइल म्हणौनिः तवं पदुमनाभीदेवीं दुर्गा सोल लाविलीः वोहनीचिये पाठीवरि पाये देउनि सोलयासोलया दुर्ग उतरलेः मग गोसावियांतें टाकीत आलेः तवं गोसावी गांगापूरां बिजें करीत असतिः मार्गी पदुमनाभीदेवां भेटि जालीं: पानेपोफळे ओळगवीलेः दंडवते घातलीं: श्रीचरणां लागलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बटिकाः आले मां:’’ तेही म्हणितलें: ‘‘होः जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुमची मातापिताः जोगनायक निकेनि असति?’’ तेही म्हणितलें: ‘‘जी जीः निकेनि असतिः’’ गोसावी पुसिलें: ‘‘बटिकाः कैसेनि आलासि?’’ मग कैसेयापरि निगालेः तें गोसावियांपुढा सांघितलें: ‘‘जी जीः तें मज बाहीरि निगो नेदेतिः दारवंठां राखणें घातलीः तेयांसि निरोपु दिधला होताः जे निगो नेदावें: मग मी वोहनीतें म्हणेः ‘वाहिनी ओः ऐसें इए पापिये मज गोसावियांपासी असो नेदीतिः मज गोसावियांविन नसवेः तेव्हेळी जीः मीया दुर्गासि सोल लाविलीः वोहनीचिये पाठीयेवरि पाय देउनि चढलाः आणि सोलया सोलया उतरला जीः’’ मग मागौतें लुगडें वोढुनि घेतलेः धावणें येइल म्हणौनि अव्हांटें चालें: ऐसा आलों जीः गोसावियांचिया कृपाकरौनि यां चरणारविंदासी भेटि जालीः’’ ऐसें हरीखैजत गोसावियांसरिसे गोष्टि करीत जात असतिः गोसावी उगेयाचि आइकीलेः मग गोसावियांसि तेथ नृसिंहीं वस्ति जाली :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात भिंगार येथे १५ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. त्यानंतर स्वामी पिंपळगाव-पापविनासिनि-सोनैये-भालगाव-भालगाव-बगडी-जांबगववरुण येथे आले…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Gangapur : मार्गी पदुमनाभी मनोरथें धांदुलमोक्ष कथन :।।:
  • एरे दीं मार्गी गोसावी पुढें बिजें करीत असतिः मागें बाइसें: बाइसामागे पदुमनाभीः तवं पदुमनाभी अंतःकरणी मनोरथु केलाः ‘जें मीं गोसावियांची सेवा करीतु आहें: तैसीं आमचीं घरीचीं अवघीचि गोसावियांचीं होती कां: तरि मीं गोसावियांपासी असों लाहातां:’ ऐसें अनेकधा मनोरथ करीति चालतिः तवं सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘काइ गा बटिकाः मनोरथ किजताती? बाइः येयापासील मात्राः जाडी पोतें घेयाः पोरू दवडाः’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘कां बाबा?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः पोर मनोरथ करीत असेः’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘ना बाबाः बापुडा आतांची आलाः मां आताची काइसा मनोर्थ?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः हा म्हणत असेः ‘तयां माझेया अवघेया एथीची बुद्धी होए कां: तयाही आवडी होए कां: मग मीं एथें असों लाहिनः’ ऐसें म्हणतु असेः हा दोषुः तयां बुध्दि काइ याचेनि होइल? तया बुध्दि काइसिया? तिया इतुलियां ऐसिया आसू होआविया आणि हा होआवाः तियें एथचिया बुद्धी काइ करीति? बाइः यांसि जाली तया धांदुलाची परिः धांदुलाचियां परि पोरू सकुटुंबी मोक्षा जावों पांतु असेः’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘तें कैसें बाबा?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः धांदुलु नावें कुणबी तो दुर्बळुः कुळवाडी करीः रात्रीं तयाचें पळ्हें इंद्राचा ऐरावति चरोनि जायेः एरी दिवसीं अवघे पाहिलें: तवं खादलें देखिलें: तो म्हणेः ‘दिसवडी पळ्हें कोणाचें ढोर चरोन जात असे पां?’ म्हणौनि राखों पडिलाः हातीं डांग घेउनि बैसलाः तवं तो चरों आलाः म्हणें: ‘हे कोणाचें म्हैसरूं? हें जयाचें म्हैसरूं तयाचेया घरा नेवों: मग तयासि गार्‍हाणे देवोः’ म्हणौनि हातीं पुस त्राहाटुनि धरिलें आणि डांगेचा एक घावो पाठीवरि लाविलाः तैंसाचि तो उविलाः वरि स्वर्गां गेलाः तवं इंद्रमुख्यकरौनि सभा बैसली असेः तेथ उभया ठेलाः पैल सोनया रूपेयाचियां रासी केलिया असतिः इंद्रें म्हणितलें: ‘हें मृत्यलोकीचें मानवी एथ कें आलें?’ तेणे म्हणितलें: ‘हे म्हैसरूं विका ना कां: चोरा कां द्या नाः माझे अवघें सेत खादलें: आतां मीं सिदाओ काइसेनि फेडी?’ इंद्रे म्हणितलें: ‘तुेझे सेतीं काइ होएं? काइ काइ खादलें? तेतुकें आम्हीं देउनिः तूं बोबाउं नकोः’ तेणे म्हणितलें: ‘ना बिटी दोनि होतिः तेणें मीं सिदावो फेडीं:’ इंद्रें म्हणितलें: ‘ना पैल सोनटकेया रूपटकेया आसूचियां रासी आहातिः तुझेनि नेववे तितुकें घेः’ गेलाः रगटें पसरिलें: आसू भरीलियाः तेणे म्हणितलें: ‘मीं कैसेनि जाओ?’ इंद्रें म्हणितलें: ‘ना आलासि तैसाचि जायेः’ तेणे म्हणितलें: ‘ना आला या म्हैसरूवांसरिसाः’ इंद्रें म्हणितलें: ‘तरि या म्हैसरूवाचीये पाठीवरि मोट ठेवी आणि याचें पूस धरूनि जायेः परि आपुलीये सेतीं आमचें म्हैसः चरों दे होः’ तेणे म्हणितलें: ‘हो कां:’ ते द्रव्य घेउनि आलाः तयासीं खावेया जालें: घरीं संपत्ति जालीः अवघेया जेवावेया तूपभातः तोंडी तांबुळः ऐसां असो लागलाः तवं सेजीयासाइलीया म्हणो लागलीयाः ‘सांपे हा धांदुल दादो अनारिसाः यांसि ऐसीं उब काइसी पां?’ तवं मागुते सेत केलें: पळ्हें वेचावेया जालें: मोलकैये बोलाविलीं: पळ्हें वेंचीतां तयाचीया बहिणी एकी पुसिलें: ‘हां गाः धांदलदादोः तुज ऐसीं उब काइसी? आधीं तूं दुर्बळा होतासिः आतां सेतसिवार सांभाळीसिनाः तुमतें खावया कैसेन जालें?’ तेणें मागिल अवघे सांघितलें: तेही म्हणितलें: ‘ते आतां येताये?’ तेणे म्हणितलें: ‘होः’ तेही म्हणितलें: ‘तरि ऐसीं मनुष्यें: ऐसीं रचना सांघतासी तरि आमतें ने कां?’ तेणे म्हणितलें: ‘हो कां: मजसांगाते सेतासी याः परि विळीचां माने वोः’ मग तो तयाते विळीचां सेतासी घेउनी गेलाः तवं ऐरावति आलाः पुसीं धरिलें: तेणें आपणातें कटीप्रदेशीं दृढ धरविलें: एसियेचीं एकमेकां मागें लागलीं: ऐसीं माळ जालीः इतुलेनि तेणें पाठीवरि डांगा हाणितलाः आणि तो उविलाःसर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः ऐसीं स्वर्गा जातातीः तैसी जातु कां उगीं: तियें मध्येंसीं गेलीः तवं म्हातारी एकीं म्हणितलें: ‘हां गाः धांदलदादोः स्वर्गि काइ काइ असे?’ तेणे म्हणितलें: ‘अवघें असेः’ एके म्हणितलें: ‘तेथ मजलागी अमुके जोडे? तेथ कापूस जोडे?’ धांदुलें म्हणितलें: ‘जोडेः’ तेणे म्हणितलें: ‘दामाचा किती?’ धांदुलें म्हणितलें: ‘ना इतुलाः’ म्हणौनि दोन्हीं हात सोडुनि हात पसरूनि दाखविलें: गोसावी ऐसा श्रीकरांचा अनुकारू केलाः ‘‘आणि तियें अवघीचि पडिलीं: भुमीचां ठाइं चूर्ण जालीं: तैसें पोरू धांदुल मोक्षा जावो पांतु असेः’’ हें परिसौनि समग्र भक्तिजनें हांसिलीः गोसावी हांसौनि म्हणितलें: ‘‘बाइः स्वर्गि काइ कापूस तेणें देखिला होताः आणि स्वर्गि काइ कापूस आहे?’’ तें तवं सिधेयाचि पाटाउवाची घडीया वृक्षाची साली लागलीयाः तरि तिया पांघुरजति कीं: लटकेयातवं अवघीचि पडिलीः आत्मघातासि कारण जालीः अवघेयांचें चूर्ण जालें: म्हणौनि बाइः लटिके न बोलिजेः तैसा पोरू धांदुल मोक्षा जाओं पात असेः गोसावी इखितु हास्य केलें: भक्तिजन पदुमनाभीदेवांसी बहुत विनोद करीतिः बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः जीवाचें मयाबांधन काइ कुंठलें असे?’’ मग गोसावी इंद्रवणाचा दृष्टांत निरूपीलाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘कोवळे इंद्रवण असें: तें तोडिजे तरि तुटेः तेचि देठीं निबर जालेंया तोडिजे तरि न तुटेः ऐसांही तोडीजे तरि मुळेंसि वेली हातयासि येः तैसें उभजरठ पुरूख निरूपणाचेनि आक्रोशे करौनि भिक्षा करविजेः तरि अविद्येसि उठीः मज म्हातारपणी काही लागैलः हिरडाबेहाडाः मीठः वस्त्र घेयावा होइलः’’ :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात भिंगार येथे १५ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. त्यानंतर स्वामी पिंपळगाव-पापविनासिनि-सोनैये-भालगाव-भालगाव-बगडी-जांबगववरुण येथे आले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: