Gandhari (गांधारी)

गांधारी, ता. अंबड, जि. जालना


येथील 1 स्थाने - हे स्थान गांधारी गावाच्या पूर्वेकडे मराठी शाळे जवळ आहे.


जाण्याचा मार्ग :

गांधारी हे गाव, पैठण शहागड मार्गावरील गांधारी फाट्यापासून आग्नेयेस 2 कि.मी. आहे. पैठण ते गांधारी फाटा 38 कि.मी. शहागड ते गांधारी फाटा 3 कि.मी. डोमलगाव फाटा ते गांधारी फाटा 3 कि.मी. डोमलगावहून आग्नेयेस गांधारी पायमार्गे 3 कि.मी. आहे. गांधारी फाट्यापर्यंत जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. प्रात:पूजा आरोगणा स्थान :

हे स्थान गांधारी गावाच्या पूर्व विभागी मराठी शाळेजवळ पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे देऊळ होते. त्या देवळाच्या पटीशाळेवरील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात शहागडहून गांधारीला आले. प्रथम त्यांनी घाण्यापाशी उभे राहून घाणा अवलोकन केला. मग त्यांना येथे आसन झाले. सकाळचा पूजावसर झाला. दहीकरंब्याची आरोगणा झाली. गुळळा, विडा झाला. नंतर सर्वज्ञांनी थोडा वेळ विश्रांती घेतली. त्यानंतर ते येथून डोमलगावला गेले. (पू.ली. 528,स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)



गावाच्या पश्चिमेस दोन फर्लाग अंतरावरील सडकेच्या दक्षिणेची दोन स्थाने निर्देशरहित आहेत.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थाने :

1. चरणचारी उभे राहुन घाणा अवलोकणे स्थान

2. काटीतळील आसन स्थान


गांधारीची एकूण स्थाने : 2


  • Purvardha Charitra Lila – 528
  • Gandhari : घाणदरिये प्रातःपूजाः आरोगणा :।।:
  • उदेयांचि गोसावी परिश्रया बिजें केलें: तैसेचि बाइसातें बोलावू धाडिलेः परिश्रयोसारूनि तैसेचि गोसावी घाणदरिये बिजें केलें: तेथ पूर्वाभिमुख धाबें: पुढां पटिशाळ होतीः उभेयाची घाणा अवलोकिलाः घाणेयापासी आंगणी कांटी होतीः तेथ आसन जालें: घाणेयासि डावेया हातां देउळीः तेथ गोसावियांसि उदेयाचां पूजावसरू जालाः मग दहीकरंबा आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः मग नावेक पहूड जालाः उपहूड जाला :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पूरीं( पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य( अवस्थान) होते. तेथुन स्वामी संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य (अवस्थान) होते. तेथुन स्वामी नंदापूर (नांदौर) ला आले. येथे स्वामींचे १५ दिवस वास्तव्य (अवस्थान) होते. पूढे स्वामी नंदापूर (नांदौर)-बागपिंपळगाव-खामगाव-शहागडवरुण गांधारीला आले. पूढे स्वामीं पांचाळेश्वरकडे निघाले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: