Galnimb-Uttar (गळनिंब-उत्तर)

गळनिंब-उत्तर, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद


येथील 1 स्थान गळनिंब लिफटच्याजवळ आहे.

सदर स्थानांवर जाण्याकरीता विशिष्ठ रस्ते असे नाहीत. कारण ही स्थाने पैठणच्या नाथसागराच्या बुडीत क्षेत्रात येतात. खरे तर येथे पूर्वी मंदीरे होती, काही आजही उपलब्ध आहेत. मात्र स्थानांवर जानारे रस्ते फक्त पाउस ज्या वर्षी कमी होइल त्या वर्षी मोठी गाडी, बैलगाडी, पायदळ, व लहान अवैधरित्या मासेमारी करणार्या लहान नावेतुन अवैधपणे जावे लागते... किंवा ...

असे असले तरी बरीच मंडळी येथे जातात. त्यासाठी MahanubhavDarshan.Com द्वारे सदर स्थानांवर जाण्याकरीता Nevigation द्वारे विशिष्ठ स्थान GoogleMaps वर निर्देशीत करण्यात आले आहे. गरजुंनी त्याचा उपयोग अवश्य करावा.... किंवा ... त्यासाठी नाथसागरातील महानुभाव तीर्थस्थान या पेजवर भेट द्यावी...

इ.श्री योगेंद्रदादा शेवलीकर,M.A. M.Phil. जाळीचा देव यांच्या मो.क्र. 7385901015 वा 8605275481 यावरुन जान्याचे रस्ते समजुन घ्यावे. योगेंद्रदादा यांनी त्या त्या गावात विशिष्ठ ओळखी करुण तेथील संपर्क क्रमांक मिळवलेले आहेत.)


जाण्याचा मार्ग :

औरंगाबाद-नगर राज्यमार्गावर औरंगाबाद – प्रवरासंगम दरम्यान भेंडाळा गाव आहे. तेथून नवे गळनिंब, आगरवाडगाव नवे, येथे जावे. तेथून गळनिंब लिफटकडे जावे. लिफटचा रस्ता विचारून घ्यावा. लिफटजवळ स्थान आहे.

टीप : पायी प्रवास करणाऱ्या साधकाला नदीच्या उत्तर काठावरून दक्षिण काठावर जाण्यासाठी होडी किंवा चप्पु उपलब्ध आहेत.


स्थानाची माहिती :

सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी त्यांच्या उत्तरार्ध काळात टोके गव्हान येथून गळनिंब येथे आले. त्यावेळी येथे महालक्ष्मीचे मंदिर होते. त्या मंदिराच्या चौकातील हे वसती स्थान होय.

1. वसती स्थान :

हे स्थान गळनिंब लिफटच्याजवळ, देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे महालक्ष्मीचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात टोकेगव्हाणहून गळनिंबला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (उ. ली. 311, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून दुसऱ्या गळनिंबला गेले. येथील दोन स्थाने अनुपलब्ध आहेत.

दुसरे गळनिब (गळनिंब-दक्षिण) हे नदीपलीकडे आहे, ते स्थान अहमदनगर जिल्यात येते म्हणून आम्ही ते तिथे दिले आहे, पण तुम्ही या लिंक वर क्लिक करून त्या पेजवर डायरेक्ट जाऊ शकता.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


विद्यापीठ स्थानपोथी : गळनिंबा महालक्ष्मीए वस्ति ।। माहालक्षमीचे देउळ पूर्वामूख ।। अंगणि निंबू । रीगता उजवयाकडे ग्रहो दवडणें ।। जगतीचा दारवठा पूर्वामूख ।। पसीमे परीश्रए ।।

विद्यापीठ स्थानपोथी : गंगे: उत्तरे चिए गळनिंबा: महालक्ष्मीयेचा चौकी वसलीः।। देऊळ गावा नैऋत्य पूर्वाभिमुखः उंबरवटुः ||: जगतीचा दारवठा पूर्वाभिमुखः।। पश्चिम परीश्रयेः ।। दारवंढेया आंत उजवया हाता अंगनी निंबु तयातळी आसनः मग ग्रहो दवडनेः || हिराइसे अंगनी उभया ठकौनी ग्रहो दवडनेः स्थाने।।


अनुपलब्ध स्थान :

1) महालक्ष्मिच्या देउळाअंगनी भुतानंदानिनादे ग्रहो दवडणे स्थान.

2) देउळाच्या पश्चिमेचे परिश्रय स्थान.


गळनिंबची एकूण स्थाने : 3


  • Purvardha Charitra Lila –
  • Galnimb (Uttar) : महालखुमीए वस्ति :।।: (गळनिंबा(उत्तर) ता. गंगापूर)
  • मग गोसावियांसि तियें महालक्ष्मीएचां देउळीं वस्ति जालीः बाइसीं नेमु सारिलाः गावीचां लोकां आश्चर्य जालें: मग तियें दिउनी तेथ भलेतेंही राहे :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि पेहरासंगम येथुन मार्ग क्रमण करित गळनिंबा(उत्तर) ता. गंगापूर येथे आले. स्वामींना येथे वस्ति(एक रात्र वास्तव्य) झाली…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Galnimb (Uttar) : गळनिंबा भूतानंदा स्तीतिः निनादें ग्रहो दवडणें :।।: (गळनिंबा(उत्तर) ता. गंगापूर)
  • तेथौनि गोसावी गळनिंबेयासि बिजें केलें: तेथ महालखुमीएपुढां निंब होताः तयातळी आसन जालें: विळीचां वेळीं देउळाचां आंगणीं उभे राहिलें: तिये निंबी ग्रहो होतेः तें माणुसांतें तेथ वसों नेदीतिः भलतेया लागेः भूतानंद कै गोसावियांचिया दरीसना आलीं होतीं तें नेणिजेः तियें सरिसीं असतिः गोसावी तयातें म्हणितलें: ‘‘भूतानंदाः ये निंबी दोनि ग्रहो असतिः हाक देयाः आणि हा निंब पांपरा हाणाः मग जातीः’’ तिया म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ आणि तयां स्तीति जालीः हाक दिधलीः निंब पांपरां हाणितलाः तियें हाकेसरिसी ग्रहींही आटासू देउनि किंकळी दिधलीः हांक दिधलीः आणि तें निगाले :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि पेहरासंगम येथुन मार्ग क्रमण करित गळनिंबा(उत्तर) ता. गंगापूर येथे आले. स्वामींना येथे वस्ति(एक रात्र वास्तव्य) झाली…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: