Galnimb (Dakshin) (गळनिंब-दक्षिण)

गळनिंब-दक्षिण, ता. नेवासा, जि. अहमदनगर


येथील 1 स्थान गळनिंब लिफटच्याजवळ आहे.

सदर स्थानांवर जाण्याकरीता विशिष्ठ रस्ते असे नाहीत. कारण ही स्थाने पैठणच्या नाथसागराच्या बुडीत क्षेत्रात येतात. खरे तर येथे पूर्वी मंदीरे होती, काही आजही उपलब्ध आहेत. मात्र स्थानांवर जानारे रस्ते फक्त पाउस ज्या वर्षी कमी होइल त्या वर्षी मोठी गाडी, बैलगाडी, पायदळ, व लहान अवैधरित्या मासेमारी करणार्या लहान नावेतुन अवैधपणे जावे लागते... किंवा ...

असे असले तरी बरीच मंडळी येथे जातात. त्यासाठी MahanubhavDarshan.Com द्वारे सदर स्थानांवर जाण्याकरीता Nevigation द्वारे विशिष्ठ स्थान GoogleMaps वर निर्देशीत करण्यात आले आहे. गरजुंनी त्याचा उपयोग अवश्य करावा.... किंवा ... त्यासाठी नाथसागरातील महानुभाव तीर्थस्थान या पेजवर भेट द्यावी...

इ.श्री योगेंद्रदादा शेवलीकर,M.A. M.Phil. जाळीचा देव यांच्या मो.क्र. 7385901015 वा 8605275481 यावरुन जान्याचे रस्ते समजुन घ्यावे. योगेंद्रदादा यांनी त्या त्या गावात विशिष्ठ ओळखी करुण तेथील संपर्क क्रमांक मिळवलेले आहेत.)


जाण्याचा मार्ग :

अ) औरंगाबाद प्रवरासंगम गाव संपताच उजवीकडे वरखेड फाटागळनिंब गाव- डावीकडे कमानीतून सरळ नदिकडे उंचावर जूने गळनिंब गाव येथे देवस्थान आहे. नवे गळनिंब ते जूने गळनिंब अडीच कि. मी. अंतर आहे.

ब) अहमदनगर – नेवासा फाटा खडका फाटा सलाबतपूर गळनिंब. खडका फाटा ते गळनिंब 15 कि.मी. तसेच नेवासा ते गळनिंब २० कि.मी. अंतर आहे.

क) टोक्यामधून गळनिंब परीसर.

जूने गळनिंब नाथसागरात बुडाले असून नवीन गळनिंब गावाचे पुनर्वसन झाले आहे. जून्या गावाच्या उत्तरेस नदीच्या दक्षिण काठावर एका उंच टेकडीवर (गडीवर) हे छोटेसे मंदिर आहे.


स्थानाची माहिती :

सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी उत्तरार्ध परिभ्रमण काळात पहिले (उत्तर) गळनिंब येथून दुसरे (दक्षिण) गळनिंब येथे आले. तेव्हा येथे मठ होता

1. वसती स्थान :

हे स्थान जुने गळनिंब गावाच्या (आज वोस असलेले) उत्तर विभागी गोदावरी नदीच्या दक्षिण काठावर देवळात आहे. या ठिकाणी स्वामींचा एक रात्र मुक्काम झाला.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात पहिल्या गळनिंबहून दुसऱ्या गळनिंबला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. दुसऱ्या दिवशी ते येथून कोळेश्वराकडे गेले. (उ.ली.312 स्था.पो.)

पहिले गळनिब (गळनिंब-उत्तर) हे नदीपलीकडे आहे, ते स्थान औरंगाबाद जिल्यात येते म्हणून आम्ही ते तिथे दिले आहे, पण तुम्ही या लिंक वर क्लिक करून त्या पेजवर डायरेक्ट जाऊ शकता.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


विद्यापीठ स्थानपोथी : दुसरी गळनिंबा गावांतु मढी वस्ति || मढ उतराभिमूख ||

विद्यापीठ स्थानपोथी : दुसरिये गळनिंबामढी वस्तीः मढु गावा उत्तर विभागी: उत्तराभिमुखः उंबरवट: जगतीचा दारवंढा पूर्वाभिमुखः तिकडेची परीश्रयः || स्थाने ४: ||0||


चे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: