Gadana (गदाना)

गदाना, ता. खुलाताबाद, जि. औरंगाबाद


येथील 1 स्थान - हे स्थान गदाना गावाच्या पश्चिमेकडे गावालगतच उंच टेकडीवर आहे, याला वनदेवाचे मंदीर म्हनुण ओळखतात.


जाण्याचा मार्ग :

गदाना हे गाव, खुलताबाद फुलंब्री मार्गावर खुलताबादहून ईशान्येस 9 कि.मी. आहे. व फुलंब्रीहून नैर्ऋत्येस 17 कि.मी. आहे. वेरूळ लेणी ते गदाना 12 कि.मी. गदाना येथे जाण्यासाठी एस.टी.बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. शाळेच्या पाठीमागे महानुभाव आश्रम आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान गदाना गावाच्या वायव्येस डोंगरावर उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे वनदेवाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात फुलंब्रीहून गदान्याला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. 178, स्था.पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून वेरुळला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


देवळाच्या पूर्व भिंतीतील स्थान, त्या लगतचे स्थान व देवळाबाहेरील उत्तर बाजूचे पूर्वाभिमुख देवळातील स्थान ही तिन्हीही स्थाने निर्देशरहित आहेत.


अनुपलब्ध स्थान :

(1) देवळाच्या उत्तरेचे परिश्रय स्थान.


गदान्याची एकूण स्थाने : 2


  • Purvardha Charitra Lila –
  • Gadana : गद्याना वनदेवीं वस्ति :।।:
  • गांवांपसिमे सोमनाथाचें देउळः तेथ आसन जालें: तें रचमचेचें स्थानः म्हणौनि गोसावी गावापसिमे डोंगरावरि माथां वनदेवो पूर्वामुखः तेथ वनदेवाचीया देउळासी बिजें केलें: चैकी गोसावियांसि आसन जालें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हे बळीपाचें दैवत मां:’’ परि भक्तिजन उगेचि होतेः बाइसीं श्रीचरण क्षाळण केलें: विडा ओळगवीलाः उपहारू निफजविलाः पूजावसर जालाः आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा ओळगवीलाः पहूड जालाः उपहूड जालाः मग तेथचि गोसावियांसि वस्ति जालीः हें मार्गरूढी :।।:
  • (टिप – येथे स्वामी पहिल्यांदा आले. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे डोडविहीरा-राजौर-फुलंबरी वरुण आले व पुढे वेरुळ्कडे गेले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: